दि. कुर्ला नागरिक सहकारी बँक अध्यक्षपदी महेंद्र बनगर
कुकुडवाड (प्रतिनिधी) दि. २५ : दि.कुर्ला नागरिक सहकारी बँक. लि. मुंबईचे अध्यक्षपदी महेंद्र (शेठ) वसंत बनगर यांची निवड झाली. महेंद्र बनगर यांचे मुळगाव माण तालुक्यातील बनगरवाडी(म्हसवड) आहे. व्यवसायानिमत्त ते मुंबईला स्थायिक झाले आहेत. श्री. बनगर यांच्या निवडीमुळे माण तालुक्यात आंनद व्यक्त केला जात आहे.श्री. महेंद्र बनगर यांची दि. कुर्ला नागरिक सहकारी बँकेच्या अध्यक्षपदी निवड झाल्यानंतर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, रासपचे संस्थापक अध्यक्ष माजी मंत्री आ. महादेव जानकर, आ. मंगेश कुडाळकर, आ.जयकुमार गोरे, माजी सनदी अधिकारी प्रभाकर देशमुख, माणदेशी महिला बँकेच्या अध्यक्षा चेतना सिन्हा, सागर जानकर यांनी भ्रमणध्वनीद्वारे अभिंनंदन करून पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या.
No comments:
Post a Comment