Monday, May 31, 2021

महाराणी अहिल्याबाई होळकर यांच्या जयंतीचा भाजप, मोदी, शहा ना विसर

 महाराणी अहिल्याबाई होळकर यांच्या जयंतीचा भाजप, मोदी, शहा ना विसर



सामाजिक - राजकीय विचारवंत सुदर्शन अक्किसागर यांचा 'मोदी, शहा'वर हल्लाबोल


मुंबई : आबासो पुकळे

भारता सारख्या विशाल भूप्रदेशावर आदर्श राज्यकारभार करणाऱ्या महाराणी अहिल्याबाई होळकर यांच्या जयंतीचा देशाच्या कानाकोपऱ्यात जयजयकार केला जात असताना देशात सत्ताधारी असलेल्या भाजप पक्षाच्या अधिकृत ट्विटर अकाउंट वर साधा नामोल्लेख देखील केला गेला नसल्याने आश्चर्य व्यक्त केले जात आहे. तर दुसरीकडे प्रधानमंत्री नरेंद्र मोदी, गृहमंत्री अमित शहा, PMO india यांचे ऑफिशियली अकाउंट वर देखील सायंकाळपर्यंत तरी महाराणी अहिल्यादेवी होळकर यांना अभिवादन करणारे पोस्ट प्रसारित केली नसल्याचे निदर्शनास आले आहे. यावरूनच सामाजिक - राजकीय विचारवंत सुदर्शन अक्किसागर यांनी भाजप, मोदी - शहा यांच्यावर हल्लालाबोल चढवला आहे.

श्री. अक्किसागर यांनी म्हटले आहे की, गेल्यावर्षीप्रमाणे  याहीवर्षी देशाचे प्रचारमंत्री यांना महारानी अहिल्याबाई होळकर जयंती दिन आठवले नाही. सत्यतेसाठी त्यांचे ऑफिशियल ट्विटर अकाउंट पहावे. मागील वर्षीही असेच दिसले. नुकतेच काही दिवसांपूर्वी एका वृत्तवाहिनी'त महारानी अहिल्याबाई होळकर व देशाचे प्रचारमंत्री यांच्यात थेट अनेक बाबतीत चक्क 'समानता' दाखवीले होते हे निषेधार्ह होते. सर्वात वेदनादायक म्हणजे आमचेच काही विद्वान व समाजकारणी मंडळी हे असे समानता दाखविणारी बातमी जसे काय हे गौरवाची बातमी म्हणून ते शेअर करत होते. कळत नव्हते की येथे कोण कोणास फसवतो की कोण स्वता:हुन येथे फसवून घेतोय. असे आपलेच काहिंचे बळीचे चेहरे पाहिले की राग येतोच. असो, आणि हेहि आता तसे काही नवे राहिलेले नाही. आता याचीहि सवय झालेली आहे. हे मात्र येथे खेदानेच सांगावेसे वाटते.

आरएसएस, बीजेपी अमित शहा, वाराणसी येथून निवडून येणारे प्रधानमंत्री नरेंद्र मोदी व पीएमओ इंडिया ऑफिशियल ट्विटर अकाउंट पाहिले असता  सांयकाळ'पर्यंत तरी पुण्यश्लोक, महारानी अहिल्याबाई होळकर जयंती दिनाची आठवण मात्र यांना होताना दिसली नाही.  आता यांचे धर्म संस्कृती आदिचे नुसते उपदेश ऐकून किळस आला आहे. महाराणी अहिल्याबाई होळकर यांच्या विचारांच्या लोकांनी 'मन की बात'  न ऐकण्याचेच ठरविले आहे. नुकतेच काही दिवसांपूर्वी मोदी व शाह यांना सावरकर जयंती आठवते, पण चोंडी या गावी येणारे अमित शहा व मोदी यांना आज महारानी अहिल्याबाई होळकर जयंती आठवण झाली नाही. बिहार विधानसभा निवडणुक डोळ्यासमोर ठेऊन काही विद्वान मंडळी एका वृत्त वाहिनीतिल होळकर व मोदी समानता दाखविनारे व्हीडिओ शेअर करित मोदीचें गुणगान करित होते, त्यांच्या बुध्दीची कीव करावीशी वाटते. आरोग्यमंत्री डॉ.  हर्षवर्धन व भाजपचे ऑटीसेलचे अमित मालवीय यांनी महाराणी अहिल्याबाई होळकर यांची तुलना नरेंद्र मोदीशी केल्याने श्री. अक्किसागर यांनी संताप व्यक्त केला आहे.



No comments:

Post a Comment

चागंले संस्कार टिकविण्यासाठी वाचन संस्कृतीची गरज : डॉ. शंकर स्वामी वडेपुरीकर

चागंले संस्कार टिकविण्यासाठी वाचन संस्कृतीची गरज : डॉ. शंकर स्वामी वडेपुरीकर ‌पु.अहिल्यादेवी वाचनालयात " वाचन संकल्प महाराष्ट्राचा...