राज्यातील पत्रकारांना लसीकरण करा : महादेव जानकर
मुबंई : राज्यातील पत्रकार, मिडिया सेलच्या प्रतिनिधींना प्राधान्याने लसीकरण करून देण्याबाबत मुख्यमंत्री मा.उद्धव ठाकरे यांच्याकडे राष्ट्रीय समाज पक्षाचे संस्थापक अध्यक्ष माजी मंत्री आ. महादेव जानकर यांनी पत्राद्वारे विनंती केली आहे.
श्री. जानकर यांनी पत्रात म्हटले आहे की, राज्यामध्ये कोरोना व्हायरसने थैमान घातले असून रोज शेकडो लोक मृत्युमुखी पडत आहेत. अशातच पत्रकार, मीडिया सेलचे प्रतिनिधी हे बातमीदारीसाठी कायमच घराबाहेर पडत असतात. त्यातच त्यांचा असंख्य रुग्णालय व कोरोना बाधित लोकांच्या नकळत संपर्कात गेल्याने त्यांना तसेच त्यांच्या कुटूंबाना संसर्गाचा धोका निर्माण होऊ शकतो. तरी तमिळनाडू, मध्यप्रदेश, ओडिसा, पश्चिम बंगाल, आंध्रप्रदेश, या राज्याप्रमाणे पत्रकारांना सुद्धा अत्यावश्यक सेवेचा दर्जा देऊन त्यांचे लसीकरण करण्याबाबत तात्काळ निर्णय घेण्यात यावे.
No comments:
Post a Comment