माण तालुका पंचायत समितीवर राष्ट्रीय समाज पक्षाचा झेंडा
सभापतीपदी रासपच्या लतिका वीरकर विराजमान
दहिवडी : आबासो पुकळे
माण तालुका पंचायत समितीच्या सभापती राष्ट्रीय समाज पक्षाच्या सौ. लतिका बबनशेठ विरकर यांची बहुमताने निवड झाली. लतिका वीरकर यांच्यासाठी रासपचे ज्येष्ठ नेते बबनदादा वीरकर यांनी संख्याबळ तयार करण्यासाठी प्रयत्न केले. आठ सदस्य वीरकर यांच्या बाजूने होते. वरकुटे म्हसवड गणातून राष्ट्रीय समाज पक्षाच्या लतिका बबन विरकर यांनी दणदणीत विजय मिळवला होता. सातारा जिल्ह्यात राष्ट्रीय समाज पक्षाचे पंचायत समिती मध्ये खाते उघडणाऱ्या त्या पहिल्या महिला उमेदवार ठरल्या. जिल्ह्यामध्ये राष्ट्रीय समाज पक्षाच्या पहिल्या महिला पंचायत समिती सभापती होण्याचा मान त्यांना मिळाला आहे. त्यांच्या निवडीबद्दल राष्ट्रीय समाज पक्षाचे संस्थापक अध्यक्ष महादेवजी जानकर, राष्ट्रीय अध्यक्ष एस एल अक्किसागर, ज्येष्ठ नेते बबनदादा विरकर, माजी जिल्हाध्यक्ष मामुशेठ वीरकर, एड. विलास चव्हाण, सातारा जिल्हा महिला आघाडी जिल्हाध्यक्ष पूजाताई घाडगे, प्रा. सचिन होनमाने सर यांच्यासह अनेकांनी अभिनंदन केले आहे.
No comments:
Post a Comment