Sunday, April 6, 2025

औरंगजेबाने उध्वस्त केलेल्या अयोध्येतील श्रीराम मंदिराचा पुण्यश्लोक अहिल्यादेवी कडून जीर्णोद्धार..!

औरंगजेबाने उध्वस्त केलेल्या अयोध्येतील श्रीराम मंदिराचा पुण्यश्लोक अहिल्यादेवी कडून जीर्णोद्धार..!


औरंगजेब बादशहाने सत्तेच्या बळावर धर्मांध होवून हिंदू धर्माची आस्था केंद्र बाटवून ती नष्ट करण्याचा प्रयत्न केला.औरंगजेबापुर्वी अलाउद्दीन खिलजी,मोहम्मद घोरी यांनी भारतातील धार्मिक आस्था केंद्राची लुट करुन ती उध्वस्त केली,मंदिरे पाडली,धर्मग्रंथ जाळले,पुजा-यांचा शिरच्छेद केला,मंदिरे बाटवली या कारणाने देशातील बारा ज्योतिर्लिंग,सप्तपुरी,चारधाम पुजा काहीकाळ थांबली औरंगजेबाने निधन होतात छत्रपती शाहु राजांनी, थोरले श्रीमंत बाजीराव पेशवे यांच्या माध्यमातून संपूर्ण हिंदुस्थान ताब्यात घेण्यासाठी मोहीमा काढल्या,खंडित झालेला भारत नव्याने उभा करण्यासाठी मराठ्यांच्या फौजा जरी पटक्याखाली दिल्लीच्या दिशेने निघाले.

सुभेदार मल्हारराव होळकर यांनी मुघल बादशहाच्या माळव्यात तिरला आणि आमझेरा लढाईत विजय मिळवला,भोपाळ जिकंले 

मुघल सुभेदार दयाबहादुर,दुसरा जयसिंगानंतर 

श्रीमतांनी मल्हाररावांना माळवा दिला.माळव्याचे सुभेदार म्हणून मल्हारराव होळकर यांची कारकीर्द सुरू झाली स्वराज्याच्या विस्ताराबरोबर त्यांनी हिंदुस्थानच्या नकाशावर असलेल्या शिवालये,

राममंदिर,विष्णुपद मंदिराच्या मुक्तीची योजना आखली होती.

मल्हाररावांच्या पुत्रवधू पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांनी औरंगजेबाने उध्वस्त केलेली सर्व मंदिरे पुन्हा नव्याने उभी करण्यासाठी बुध्दीचातुर्य आणि सासरे मल्हारराव होळकर यांच्या दरा-याचा उपयोग केला.माळव्याच्या बाहेर असलेल्या सर्व शासकांना पत्र लिहले आणि स्वतःच्या खाजगी दौलतीतुन होळकर टाकीच्या माध्यमातून चारधाम, सप्तपुरी, बारा ज्योतिर्लिंगासह हजारो मंदिरे नव्याने उभी राहिली. औरंगजेब, खिलजी, घोरीने पाडलेल्या मंदिराच्या मुळ स्थापत्य शैली प्रमाने त्या मंदिरांचा जीर्णोद्धार केला तेथील परंपरा सुरू केल्या.पुजारी नियुक्त केले त्यांना वर्षासने बहाल केली,मंदिराच्या पुजा अर्चेसाठी इनाम जमिनी दिल्या.आज जे धार्मिक आस्थेचे केंद्र फुललेले दिसतात त्यापाठीमागे पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांचे लोककल्याणकारी कार्याचा वारसा पहायला मिळतो.

भारदस्त देवालय,गर्भगृहातील तेजस्वी देव,लखलखणारे कळस,अस्मितेचे ध्वज,धार्मिक पुजा अर्चेने तेजोमय झालेल्या मंदिराकडे बघितल्यास अहिल्यादेवींची शिवमय मुर्ती डोळ्यासमोर आपसूकच उभी राहते.प्रत्यक्षात रामराज्याची माळव्यात स्थापना करुन अहिल्यादेवींनी भक्तीचे सामर्थ्य सिध्द केलेले आहे. देवाचे देवपन आणि राजाचे राजेपन फक्त अहिल्यादेवींनी जपले.पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांनी भारतात  राममंदिरे बांधली ती पुढील प्रमाणे -


(१) श्री राम मंदिर,अयोध्या

 (२)श्री.त्रेताराम मंदिर अयोध्या

 (३) श्री.रामचंद्र मंदिर जगन्नाथपूरी

 (४) श्री.राममंदिर चित्रकुट

 (५) श्रीराम मंदिर -पंढरपूर

 (६) अहिल्याराम मंदीर संगमनेर 

(७) अहिल्याराम मंदिर - नाशिक 

(८) श्री राममंदिर -आलमपुर .

(९)श्रीराम मंदिर नांदुर मध्यमेश्वर

(१०)श्री राम मंदिर, महेश्वर

भारताची धार्मिक आस्थेचे जतन करणाऱ्या पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या जयंती त्रिशताब्दी सोहळ्याचे हे वर्षे असुन इथली धार्मिक आस्था संपवू पाहणाऱ्यांना अहिल्यादेवींनी आपल्या लोककल्याणकारी कामातून उत्तर दिलेले आहे जे अजरामर असून त्यांचा भारतीयांना अभिमान वाटतो.

श्रीरामनवमी निमित्ताने हार्दिक शुभेच्छा...!!!!

-श्री.रामभाऊ लांडे

अभ्यासक

होळकर राजघराणे, इंदौर.

-9421349586

No comments:

Post a Comment

विश्वाचा यशवंत नायक माहे : जून 2025

विश्वाचा यशवंत नायक माहे : जून 2025