Friday, April 25, 2025

चौंडीतून रासपा 'स्व'राज महारॅलीस प्रारंभ ! आज सातारा जिल्ह्यात महारॅली दाखल होणार !!

चौंडीतून रासपा 'स्व'राज महारॅलीस प्रारंभ ! आज सातारा जिल्ह्यात महारॅली दाखल होणार !!

मुंबई |आबासो पुकळे (२५/४/२०२५) : चौंडी येथून ३१ मे चलो दिल्ली ! तालकटोरा मैदान की ओर !! असा नारा देत, राष्ट्रीय समाज पक्षाचे संस्थापक/ राष्ट्रीय अध्यक्ष महादेव जानकर यांच्या मार्गदर्शनात महाराणी अहिल्याबाई होळकर यांच्या त्रिशताब्दी जयंतीनिमित्त राष्ट्रीय समाज पक्षाने स्वराज महारॅली काढली आहे. 'राष्ट्रीय समाज नायक' महादेव जानकर यांच्या जन्म दिवसाचे औचित्य साधून राष्ट्रीय संघटक बाळकृष्ण लेंगरे मामा, गोविंदराम शुरनर, महाराष्ट्र रासपचे प्रदेशाध्यक्ष काशिनाथ शेवते, राज्य महासचिव ज्ञानेश्वर सलगर यांनी महाराणी अहिल्याबाई होळकर यांच्या   जन्मभूमी चौंडी तालुका जामखेड जिल्हा अहिल्यानगर येथून 'स्व'राज महारॅलीस उत्साहपूर्ण वातावरणात प्रारंभ केला. 

महामानवांच्या शक्तीस्थळ, प्रेरणास्थळांना अभिवादन करत, दि. २० एप्रिल रोजी स्वराज महारॅली फुलेवाडा पुणे येथे आली होती. पुणे जिल्ह्यात ठीक ठिकाणी नागरिकांनी स्वराज महारॅलीचे जोरदार स्वागत केले. राष्ट्रीय समाज पक्षाचे स्वराज महारॅली आज सातारा जिल्ह्यात दाखल होणार आहे, अशी माहिती रासपचे पश्चिम महाराष्ट्र संपर्कप्रमुख विनायक (मामा) रुपनवर यांनी 'विश्वाचा यशवंत नायक'शी बोलताना दिली. महारॅली समवेत रासपचे पश्चिम महाराष्ट्र अध्यक्ष किरणजी गोफणे, सोलापूर जिल्हाध्यक्ष अनिल शेंडगे विराजमान आहेत. आज फलटण तालुक्यातील गोखळी, खटके वस्ती, तामखडा, गुणवरे, बरड, कुरवली पाटी, राजुरी, आंदरुड, जावली, मिरवडे, वडले, दुधेभावी, भाडळी, तीरकवाडी, सोनवडी, कोळकी, फलटण शहर, फरांदवाडी, वाठार निंबाळकर फाटा, मिरगाव, निंभोरे, सुरवडी, बडेखान, नांदल, काळज, डोंबाळवाडी आदी गावात भेट देऊन सायंकाळी तरडगाव येथे मुक्काम करणार आहे. फलटण तालुक्यात स्वराज महारॅलीचे जंगी स्वागत करावे, असे आवाहन फलटण तालुका अध्यक्ष महादेव कुलाळ, तालुका उपाध्यक्ष मनोहर कचरे, युवक तालुकाध्यक्ष सुनील सोनवलकर यांनी केले आहे.










No comments:

Post a Comment

विश्वाचा यशवंत नायक माहे : जून 2025

विश्वाचा यशवंत नायक माहे : जून 2025