Sunday, April 27, 2025

राष्ट्रीय समाज पक्षाची हाक ३१ मे चलो दिल्ली ! तालकटोरा मैदान !!

राष्ट्रीय समाज पक्षाची हाक ३१ मे चलो दिल्ली ! तालकटोरा मैदान !!

महाराणी अहिल्याबाई होळकर यांच्या त्रिशताब्दी जयंती निमित्त रासपची 'स्वराज महारॅली'

मुंबई  : महाराणी अहिल्याबाई होळकर यांच्या त्रिशताब्दी जयंती निमित्त राष्ट्रीय समाज पक्षाचे संस्थापक राष्ट्रीय अध्यक्ष महादेव जानकर यांच्या नेतृत्वाखाली राष्ट्रीय समाज पक्ष तर्फे 'स्वराज महारॅली'चे आयोजन करण्यात येणार आहे. राष्ट्रीय समाज पक्षाने ३१ मे चलो दिल्ली तालकटोरा मैदान अशी हाक दिली आहे. महाराणी अहिल्याबाई होळकर यांची देशातली पहिली जयंती साजरी करून महादेव जानकर यांनी नवा इतिहास रचला आहे. महाराणी अहिल्याबाई होळकर यांचा धार्मिक चेहरा पुढे आणला गेला, परंतु सर्वजण कल्याणकारी राजकीय चेहरा जाणीवपूर्वक लपवला गेल्याचे दिसते. अहिल्याबाई होळकर यांनी सर्व धर्मियांसाठी देशभरात कार्य केलेले केले, असे  राष्ट्रीय समाज पक्षाचे संस्थापक सदस्य सिद्धप्पा अक्कीसागर यांनी सांगितले. राष्ट्रीय कार्यकारणीच्या मार्गदर्शनात देशभर राष्ट्रीय समाज पक्ष स्वराज महारॅलीचे आयोजन व नियोजन करत असल्याचे सांगण्यात येत आहे. राष्ट्रीय समाज पक्षाचे सर्वेसर्वा महादेव जानकर विविध ठिकाणी उपस्थित राहून, महारॅलीस मार्गदर्शन करणार आहेत. होळकरशाहीच्या पराक्रमाची साक्ष देणाऱ्या तालकटोरा मैदान दिल्ली येथे स्वराज्य महारॅलीचा समारोप होईल. रासप आयोजित महाराणी अहिल्याबाई होळकर यांच्या जयंती निमित्त स्वराज्य महारॅलीस देशभरातील प्रतिष्ठित मान्यवर मंडळींना आमंत्रित करण्याचे सुतोवाच महादेव जानकर यांनी एका मराठी वृत्तवाहिणीशी बोलताना दिले आहेत. जास्तीत संख्येने दिल्लीची महारॅली यशस्वी करण्यासाठी आतापासूनच कार्यकर्त्यांनी तयारी चालू करावी, असे आवाहन रासपचे महाराष्ट्र राज्य प्रदेश अध्यक्ष काशिनाथ शेवते यांनी केले आहे.

No comments:

Post a Comment

विश्वाचा यशवंत नायक माहे : जून 2025

विश्वाचा यशवंत नायक माहे : जून 2025