शंभू महादेवाच्या पुजेचा मान होळकरांना...!!
शिखर शिगंनापुर येथील शंभू महादेवाची चैत्र महिन्यात यात्रा असते चैत्र महिण्यातील एकादशीला होळकर राजे घोड्यावर बसुन शिगंणापूरला येतात शिंगणापूरच्या वेशीवर त्यांचे ग्रामस्थांच्या तसेच संस्थानच्या वतीने वाजत गाजत स्वागत करण्यात येवून त्यांना थेट मंदिरात दर्शनासाठी सन्मानाने घेवून जातात. शंभू महादेवाचे पुजारी असलेले बडवे महाराज होळकर राजांच्या हस्ते शंभू महादेवास अभिषेक करतात पारंपरिक पध्दतीने पुजा अर्चा आणि दर्शन झाल्यानंतर होळकर राजास संस्थानकडुन भोजन महाप्रसाद दिला जातो थोरले सुभेदार मल्हारराव होळकर यांचेपासुन ते सुभेदार काशीराव होळकर यांचेपर्यंत होळकर राजघराण्यांच्या वतीने शंभू महादेवाची पुजा करण्यात येत होती.
सुभेदार काशीराव होळकर यांचे सासरे सरदार काळुजी बाबा गावडे अत्यंत शुर आणि पराक्रमी होते काशीराव होळकर यांनी आपल्या सासरे काळुजी बाबा यांना शंभू महादेवाच्या पुजेचा मान दिला होळकर राजघराण्यांच्या वतीने दरवर्षी काळुजी गावडे व नंतर काळुजी बाबा यांच्या पुत्रपौत्रादी यांच्या वंशपंरपरेनुसार पुजा करण्यात यावी यासाठी कासेगाव परगण्यातील बोहाळी गावातील काही जमीन बडवे यांना बहाल केली.
तेंव्हा पासून सरदार काळुजी बाबा गावडे यांच्या घराण्यातील लोक इंदौरच्या होळकर महाराजांच्या वतीने घोड्यावर बसुन शिखर शिंगणापूर येथे दरवर्षी मानाच्या पूजेसाठी येतात. सरदार गावडे घराणे माळेगाव ता.शेवगाव जि.अहिल्यानगर येथील असुन माळव्यात त्यांना बशीपिंपरी नामक जहागीर आहे.
पायवेस घालुन पुजा करण्याची परंपरा आहे यावर्षी दि.8 रोजी शिखर शिगंगणापुर येथे शंभू महादेवाची पुजा गणेश गावडे यांच्या हस्ते संपन्न झाली.इंदौरच्या राजाची स्वारी दाखल होताच यात्रेसाठी जमलेले लोक मोठमोठ्याने राजे आले-राजे आले असे ओरडतात मंदिराकडे जात असतांना त्यांच्या वर फुलांचा वर्षाव करण्यात येतो.छत्रपती शाहु महाराज यांच्या पासून सुभेदार मल्हारराव होळकर यांना मान मिळाला होता. होळकरांच्या शिरावर छत,चामर,चौरी धरल्या जाते.पुण्यश्लोक अहिल्यादेवींनी शिगंनापुर येथे दोन बारवा तसेच मंदिर परिसरात बांधकाम केल्याची नोंद पुजारी बडवे यांनी लिहलेल्या पुस्तकात वाचायला मिळते.
आमदार गोपीचंद पडळकर आजच्या पुजेला गणेश गावडे यांच्या समवेत पुजेसाठी मानकरी म्हणून उपस्थित होते.एकादशीच्या चार दिवस आधी शंभू महादेवाचा विवाह संपन्न होतो या विवाहासाठी दुरदुरवरुन भाविक भक्त कावड आणतात वेगवेगळ्या घराण्यांना शंभू महादेवाचा मान असुन लाखो लोक दर्शनासाठी उपस्थित असतात. छत्रपती शिवाजी महाराज यांचे कुलदैवत असलेल्या शंभू महादेवाच्या पुजेचा मान इंदौरच्या होळकरांना असुन होळकरांच्या वतीने मानकरी म्हणून माळेगावचे सरदार गावडे घराणे दरवर्षी मानाच्या पुजा करण्यासाठी घोड्यावर स्वार होवून येतात.
शंभू महादेवाच्या चैत्र महिण्यातील यात्रेचा मान तब्बल 50 घराण्यांना असून वेगवेगळ्या जातीतील लोक गुण्यागोविंदाने आपपल्या परंपरेनुसार शंभू महादेवाची सेवा करतात.धनगर समाजातील माळेगावचे सरदार गावडे,माळशिरचे वाघमोडे पाटील,सांगोल्याचे शेंडगे देशमुख, म्हसवडचे सनगर पाटील,सांगोल्याचे राऊत,नातेपुतेचे चांगन आदी घराणे मानकरी आहेत.
-श्री.रामभाऊ लांडे
अभ्यासक
होळकर राजघराणे, इंदौर
9421349586
No comments:
Post a Comment