रासपतर्फे रन्नौद येथे महात्मा फुले, डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादन
रन्नौद (१३/४/२५) : राष्ट्रीय समाज पक्ष तर्फे गायत्री परिसर रन्नौद येथे महात्मा ज्योतिबा फुले, डॉ भीमराव आंबेडकर यांची संयुक्त जयंती साजरी करण्यात आली. मुख्य अतिथि मध्य प्रदेश राज्य प्रभारी प्राणसिंह पाल, प्रदेश महासचिव रामविलास किरार, प्रदेश उपाध्यक्ष डी. एस चौहान, प्रदेश सचिव मोहरसिंह केवट, शिवपुरी जिला अध्यक्ष मोहब्बतसिंह पाल आदी उपस्थित होते. महामानवांचे विचार पुढे घेऊन गेले पाहिजे. मां गायत्री मंत्र म्हणून दीप प्रज्वलनाने कार्यक्रमाची सुरूवात केली.
मान्यवरांनी महात्मा फुले, बाबासाहेब आंबेडकर यांच्या विषयी मनोगत व्यक्त केली. रन्नौद नगर ते डॉक्टर भीमराव आंबेडकर पार्क येथील पुतळ्यास पुष्पमाला अर्पण करत कार्यक्रम पार पडला. यावेळी ज्ञानसिंह पाल दतिया, सुखपाल यादव, मिठ्ठनलाल वंशकार, सोनू पुरोहित, रामजीलाल बघेल, के.पी. परिहार भगवतसिह बघेल, बृजेश प्रजापती यांच्यासह शेकडो नागरिक उपस्थित होते.
No comments:
Post a Comment