Sunday, April 27, 2025

महाराष्ट्र प्रदेश मुंबई राष्ट्रीय समाज पक्ष कार्यालयात महादेव जानकर यांचा वाढदिवस साजरा

महाराष्ट्र प्रदेश मुंबई राष्ट्रीय समाज पक्ष कार्यालयात महादेव जानकर यांचा वाढदिवस साजरा 

मुंबई(१९/४/२५) : राष्ट्रीय समाज पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष महादेव जानकर यांचा 57 वा वाढदिवस राष्ट्रीय समाज पक्ष मुंबई कार्यालयात साजरा करताना राष्ट्रीय खजिनदार मोहन माने.

आधुनिक भारताचे राष्ट्रपिता महात्मा फुले यांना राष्ट्रीय समाज पक्ष तर्फे अभिवादन

आधुनिक भारताचे राष्ट्रपिता महात्मा फुले यांना राष्ट्रीय समाज पक्ष तर्फे अभिवादन

सातारा (११/४/२५) : राष्ट्रीय समाज पक्षाच्यावतीने सकाळी ११ : ०० वाजता कटगुण ता- खटाव जि. सातारा येथे महात्मा ज्योतिराव फुले यांच्या जयंतीनिमित्त पुतळ्यास महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष काशिनाथ शेवते, राज्य महासचिव ज्ञानेश्वर सलगर, ऋषिकेश बिचुकले अभिवादन करताना.



मुंबई (११/४/२५) : राष्ट्रीय समाज पक्षाच्या प्रदेश कार्यालयात क्रांतीसुर्य महात्मा ज्योतिबा फुले यांच्या जयंतीनिमित्त अभिवादन करताना राष्ट्रीय समाज पक्षाचे संस्थापक/राष्ट्रीय अध्यक्ष महादेव जानकर, कुलाबा विधानसभा उमेदवार जीवाराम बघेल उपस्थित होते.

महादेव जानकर यांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यास केले अभिवादन..!

महादेव जानकर यांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यास केले अभिवादन..!

छत्रपती संभाजी नगर (१४ एप्रिल २०२५) : महामानव डॉ बाबासाहेब आंबेडकर जयंती विनम्र अभिवादन करताना महादेव जानकर, सुरेश कटारे


पुणे : येथे भारतीय घटनेचे शिल्पकार,महामानव, विश्वरत्न, क्रांतीसुर्य, बोधीसत्व, परमपुज्य, डाॅ.बाबासाहेबआंबेडकर यांच्या जयंती निमित्त अभिवादन करताना रासप पदाधिकारी


अकोल्यात राष्ट्रीय समाज पक्षातर्फे महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती साजरी

अकोल्यात राष्ट्रीय समाज पक्षातर्फे महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती साजरी

अकोला (१४/४/२५) : राष्ट्रीय समाज पक्ष अकोला जिल्ह्याच्या वतीने महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती अकोला जिल्हा कार्यालय येथे साजरी करण्यात आली. राष्ट्रीय समाज पक्षाचे विदर्भ महासचिव मा. गणेशजी मानकर, जेष्ठ पत्रकार पी. टी. धांडे यांच्याहस्ते मेणबत्तीच्या दिव्य प्रकाशात महामानव बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेचे पूजन करून पुष्पहार अर्पण करण्यात आला. यावेळी अकोला जिल्हाध्यक्ष केशव मुळे यांनी आजच्या तरुण पिढीने चौकात डीजे लावून, जयंती साजरी केल्यापेक्षा चौका-चौकात वाचनालंय उभारून जयंती साजरी करावी, तरच बाबासाहेब यांना शुभेच्छा अर्पण होतील आणि खऱ्या अर्थाने जयंती साजरी होईल, असे मत व्यक्त केले. यावेळी युवा सामाजिक कार्यकर्ते अंकुश बाळापूरे, राजू डोंजेकर, संजू मस्के, उमेश मोहरकर, रोशन बारखडे व इतर मान्यवर उपस्थित होते.

परभणीत नोटांचा हार गळ्यात घालून महादेव जानकर यांचा वाढदिवस साजरा

परभणीत नोटांचा हार गळ्यात घालून महादेव जानकर यांचा वाढदिवस साजरा 

परभणी (१२/४/२५) : राष्ट्रीय समाज पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष माजी मंत्री महादेव जानकर यांचा ५७ वा वाढदिवस परभणी जिल्ह्याच्यावतीने साजरा करण्यात आला. यावेळी जिल्ह्याच्यावतीने एक लाख रुपयाचा नोटांचा हार घालून त्यांचा सत्कार करण्यात आला. यावेळी मराठवाडा अध्यक्ष अश्रूबा कोळेकर, जिल्हाध्यक्ष अशोक हाके यांच्यासह रासप पदाधिकारी उपस्थित होते. यावर्षीचा प्रथम वाढदिवस कार्यक्रम करण्याचा मान परभणी जिल्ह्याने पटकावला, त्याबद्दल परभणी जिल्हा पदाधिकारी आणि कार्यकर्ते यांचे राष्ट्रीय समाज पक्ष महाराष्ट्र राज्याच्या वतीने प्रदेश अध्यक्ष काशिनाथ शेवते यांनी हार्दिक अभिनंदन केले आहे.

छत्रपती संभाजीनगरमध्ये महादेव जानकर यांचा वाढदिवस साजरा

छत्रपती संभाजीनगरमध्ये महादेव जानकर यांचा वाढदिवस साजरा 

छत्रपती संभाजीनगर (१५/४/२५ : राष्ट्रीय समाज पक्ष छत्रपती संभाजीनगर जिल्ह्याच्यावतीने राष्ट्रीय समाज पक्षाचे संस्थापक अध्यक्ष महादेवजी जानकर यांच्या 57 व्या वाढदिवसानिमित्त 57 हजार रुपयांचा हार घालून सन्मान करण्यात आला.

यावेळी संभाजीनगर जिल्हाध्यक्ष रमेश(भाऊ)काटकर, प्रकाश दिलवाले, शहराध्यक्ष सुरेश कटारे, जिल्हा संपर्कप्रमुख सतीश पल्हाळ, गंगापूर तालुकाध्यक्ष ज्ञानेश्वर वैद्य, कन्नड युवक आघाडी तालुकाध्यक्ष अनिल देठे, सिल्लोड तालुका अध्यक्ष भरत भोजने, सिल्लोड युवक आघाडी तालुकाध्यक्ष आजिनाथ दांगोडे, गजानन नारळे, पैठण विधानसभा अध्यक्ष भाऊसाहेब सोनवणे, पैठण युवक तालुकाध्यक्ष कृष्णा जाधव, तालुका कार्याध्यक्ष पैठण शिवाजी जाधव, जिल्हा सरचिटणीस गणेश शिंदे, युवक जिल्हा उपाध्यक्ष संतोष सोनवणे, जिल्हा कार्याध्यक्ष भानुदास रिटे, सरपंच आडगाव सरक, विकास रिठे व अन्य जिल्ह्यातील पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

रासपतर्फे रन्नौद येथे महात्मा फुले, डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादन

रासपतर्फे रन्नौद येथे महात्मा फुले, डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादन 

रन्नौद (१३/४/२५) :  राष्ट्रीय समाज पक्ष तर्फे गायत्री परिसर रन्नौद येथे महात्मा ज्योतिबा फुले, डॉ भीमराव आंबेडकर यांची संयुक्त जयंती साजरी करण्यात आली. मुख्य अतिथि मध्य प्रदेश राज्य प्रभारी प्राणसिंह पाल, प्रदेश महासचिव रामविलास किरार, प्रदेश उपाध्यक्ष डी. एस चौहान, प्रदेश सचिव मोहरसिंह केवट, शिवपुरी जिला अध्यक्ष मोहब्बतसिंह पाल आदी उपस्थित होते. महामानवांचे विचार पुढे घेऊन गेले पाहिजे. मां गायत्री मंत्र म्हणून दीप प्रज्वलनाने कार्यक्रमाची सुरूवात केली.  

मान्यवरांनी महात्मा फुले, बाबासाहेब आंबेडकर यांच्या विषयी मनोगत व्यक्त केली. रन्नौद नगर ते डॉक्टर भीमराव आंबेडकर पार्क येथील पुतळ्यास पुष्पमाला अर्पण करत कार्यक्रम पार पडला. यावेळी ज्ञानसिंह पाल दतिया, सुखपाल यादव, मिठ्ठनलाल वंशकार, सोनू पुरोहित, रामजीलाल बघेल, के.पी. परिहार भगवतसिह बघेल, बृजेश प्रजापती यांच्यासह शेकडो नागरिक उपस्थित होते.

रासपची लढाई शोषित बहुजनांच्या उत्थानासाठी : महादेव जानकर

रासपची लढाई शोषित बहुजनांच्या उत्थानासाठी : महादेव जानकर 

राष्ट्रीय समाज पक्ष तर्फे युवा संघर्ष निर्धार परिषदेचे 

पुणे (२०/४)२५) : आमची राजकीय लढाई शोषित राष्ट्रीय बहुजन समाजाच्या उत्थानासाठी आहे, त्यासाठी राजकीय सत्ता महत्वाची आहे. सत्तेच्या चाव्या राष्ट्रीय समाजाच्या हातात येण्यासाठी कायम संघर्ष करत राहू, असा निर्धार  राष्ट्रीय समाज पक्षाचे संस्थापक/राष्ट्रीय अध्यक्ष महादेव जानकर यांनी व्यक्त केला.

सावित्रीबाई फुले सभागृहात राष्ट्रीय समाज पक्ष आयोजित युवा संघर्ष निर्धार परिषदेत श्री. जानकर बोलत होते. यावेळी प्रहार संघटनेचे अध्यक्ष बच्चू कडू, रासेफचे राष्ट्रीय अध्यक्ष एस. एल. अक्कीसागर, राष्ट्रीय संघटक गोविंदराम शुरनर, बाळकृष्ण लेंगरे, राष्ट्रीय खजिनदार मोहन माने, राष्ट्रीय महासचिव कुमार सुशील, रासपचे प्रदेशाध्यक्ष काशिनाथ शेवते, स्वाभिमानी युवक संघटनेचे अमर कदम, जाधवर ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूटचे सुधाकर जाधवर, शार्दुल जाधवर, रासेफचे राष्ट्रीय उपाध्यक्ष दिगंबर राठोड, राज्य महासचिव ज्ञानेश्वर सलगर, अंकुश देवडकर आदी उपस्थित होते. या कार्यक्रमाला अनिल पवार, विक्रम ढोणे, दत्तकुमार खंडागळे, सौरभ हटकर, नितीन आंधळे या युवकांचा युवा संघर्ष योद्धा पुरस्काराने सन्मान करण्यात आला. 

श्री. जानकर पुढे म्हणाले, मी, राजू शेट्टी आणि बच्चू कडू यांनी 2009 मध्ये रिपब्लिकन डावी लोकशाही आघाडी (रिडालोस) चा प्रयोग केला होता. दिवगंत गोपीनाथ मुंडे यांनी 2014 च्या निवडणुकीपूर्वी छोट्या पक्षाचे महत्त्व ओळखून आम्हाला संधी दिली. छोट्या पक्षाच्या सहकार्यामुळे 2014 मध्ये सत्ता प्रतिवर्तन झाले. त्यानंतर आम्हाला काही काळ सत्तेत काम करण्याची संधी मिळाली. जनतेचे प्रश्न सोडवण्यासाठी आपल्या विचाराचे आमदार मोठ्या संख्येने विधानमंडळात गेले पाहिजेत, त्यासाठी संघर्ष करीत राहू. फुले शाहू आंबेडकर यांचे नाव घेणारे मतदार निवडणुकीच्या वेळेस कुठे जातात, असा बोचरा सवाल महादेव जानकर यांनी उपस्थित केला. 

बच्चू कडू म्हणाले, महाराष्ट्रातील शेतकरी, कष्टकऱ्यांचे मोठे प्रश्न आहेत. शेतकऱ्याच्या आत्महत्या होत आहेत, मात्र त्याकडे सरकारचे लक्ष नाही. जाती-जातीत भांडणे लावण्याचे काम केले जाते. हा कावा सामान्य लोकांनी ओळखला पाहिजे. आम्हाला सत्तेत सहभागी होता आले नाही, तर सत्ता सर्वसामान्यांच्या दारात नेण्यासाठी प्रयत्न करू. महादेव जानकर यांनी दिल्लीवर चाल करावी, आम्ही नागपूरला वेढा देऊ.

महादेव जानकर म्हणाले, ही एकी सत्तेसाठी नाही तर सत्यासाठी आहे. आम्ही यातून देशात राज्यात सुरू असलेल्या असंतोषाचे जनक बनणार आहोत. अहिल्याबाई होळकर यांच्या जयंतीनिमित्त 31 मे ला दिल्लीत तालकटोरा मैदानावर राष्ट्रीय समाज पक्षाच्या मेळाव्याचे आयोजन केले आहे, जास्तीत जास्त संख्येने दिल्लीच्या मेळाव्यास उपस्थित राहावे, असे आवाहन केले. अहिल्याबाई होळकर यांच्या जन्मगाव चौंडीतून काल राष्ट्रीय समाज पक्षाची स्वराज महारॅली सुरू झाली आहे, या रॅलीच्या माध्यमातून आम्ही आमच्या पक्षाची विचारधारा सर्वसामान्य जनतेपर्यंत पोहोचवू.

रासेफचे राष्ट्रीय अध्यक्ष एस एल अक्कीसागरआपल्या भाषणात म्हणाले, राजकारणात मरगळ आली असताना, सर्वसामान्य लोकांना राजकारणाबद्दल विट आली असताना, आजच्या युवा संघर्ष परिषदेच्या माध्यमातून राष्ट्रीय समाज पक्षाच्या युवकांनी लढण्याचा संघर्षाचा केलेला निर्धार कौतुकास पात्र आहे. आरएसएसने ज्या विचारधारेच्या माध्यमातून सर्वांना गुंडाळून ठेवले आहे, त्या विचारधारेला मोडीत काढण्याचे चॅलेंज एस. एल. अक्कीसागर यांनी दिले. माझ उर्वरित आयुष्य हे महादेव जानकर यांना मिळावं, कारण ते या समाजात परिवर्तन करण्यासाठी लढत आहेत, त्यामुळे त्यांना यश मिळावं असे मी निसर्ग निर्मिकाकडे इच्छा व्यक्त करतो. रासपचे राज्यसरचिटणीस अजित पाटील यांनी प्रास्ताविक केले. स्वाती गोडसे यांनी सूत्रसंचालन केले. यावेळी राज्यभरातून आलेल्या वेगवेगळ्या तालुक्यातील पदाधिकाऱ्यांनी महादेव जानकर यांना नोटांचा हार घालून सत्कार केला. वेळेअभावी उपस्थित राहून शकल्याने, राजू शेट्टी यांनी व्हिडिओच्या माध्यमातून महादेव जानकर यांना शुभेच्छा दिल्या. डोक्यावर महात्मा फुले यांची पगडी  घालून महादेव जानकर, बच्चू कडू यांचा सत्कार करण्यात आला. यशवंत सेना ते राष्ट्रीय समाज पक्ष पर्यंत महादेव जानकर यांच्यासोबत काम करणाऱ्या लोकांचा यावेळी सन्मान करण्यात आला. युवा संघर्ष परिषदसाठी आर्थिक योगदान देणाऱ्या लोकांचा मानाचा पिवळा फेटा बांधून विशेष सत्कार करण्यात आला.









डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यासाठी रासप, सपाचा नवी मुंबईत मोर्चा

डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यासाठी रासप, सपाचा नवी मुंबईत मोर्चा 


नवी मुंबई (११/४/२५) : नवी मुंबईत भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा भव्य पुतळा निर्माण करावा, या मागणीसाठी अकरा एप्रिल रोजी राष्ट्रीय समाज पक्ष, समाजवादी पार्टीच्या यांच्या संयुक्त विद्यमाने नवी मुंबई महानगरपालिका मुख्यालयावर मोर्चा काढण्यात आला.  यावेळी राष्ट्रीय समाज पक्षाचे महाराष्ट्र राज्य कार्यकारणी सदस्य भगवान, रासप महिला आघाडी नेत्या मनीषा ठाकूर, पनवेल रासप नेते मुकेश भगत, समाजवादी पार्टीचे आर एन यादव, ख्वाजामिया पटेल, आर्यन यादव मोर्चात सहभागी झाले होते. मोर्चेकऱ्यांचे निवेदन उपायुक्त किसनराव पलांडे यांनी स्वीकारत मागणीसाठी मनपा प्रशासन सकारात्मक असल्याचे त्यांनी सांगितले.

शिवपुरीत रासपची बैठक; पदाधिकारी निवडी जाहीर

शिवपुरीत रासपची बैठक; पदाधिकारी निवडी जाहीर 

शिवपुरी (२३/३/२५) : येथील वीर सावरकर उद्यानात राष्ट्रीय समाज पक्षाची बैठक पार पडली आणि नवीन पदाधिकारी निवडी जाहीर केल्या. बैठकीत पक्षाचा विस्तार, जनमानसात सर्वेसर्वा महादेव जानकर यांचे नेतृत्व तथा पक्षाची विचारधारा पोहचवणे, 31 मे दिल्ली तालकटोरा मैदानात अहिल्याबाई होळकर यांच्या जयंतीची तयारी आदी बाबत चर्चा करण्यात आली. मध्य प्रदेश प्रभारी प्राणसिंह पाल, महासचिव रामविलास किरार, प्रदेश उपाध्यक्ष एड. डी. एस. चव्हाण यांच्या आदेशानुसार प्रदेश सचिव मोहर सिंह केवट यांनी शिवपुरी जिल्हाध्यक्षपदी मोहब्बत सिंह पाल, जिल्हा सचिव पदी भूपेंद्र कुमार गुप्ता, जिल्हा उपाध्यक्षपदी सोनू पुरोहित, रामगोपाल जाटव, जिल्हा संघटनमंत्रीपदी केपी परिहार, गुना लोकसभा प्रभारीपदी राजेन्द्र धाकड, गुना लोकसभा अध्यक्षपदी रामदयाल पाल, रन्नोद शहर अध्यक्षपदी रामजीलाल पाल, रामदास साहू यांची नियुक्ती करण्यात आली. नवनियुक्त पदाधिकारी बैठकीस उपस्थित होते.

कोलारस येथे राष्ट्रीय समाज पक्षाचा कार्यकर्ता मेळावा

कोलारस येथे राष्ट्रीय समाज पक्षाचा कार्यकर्ता मेळावा


कोलारस (१९/४/२५) : कोलारस येथे राष्ट्रीय समाज पक्ष तर्फे राजमाता अहिल्याबाई होळकर जयंती, राष्ट्रीय समाज पक्षाचे संस्थापक/ राष्ट्रीय अध्यक्ष पूर्व कैबिनेटमंत्री महादेव जानकर यांच्या वाढदिवसानिमित्त कार्यकर्ता मेळाव्याचे आयोजन कोलारस लंकापूरा येथे केले होते. यावेळी सर्व पदाधिकाऱ्यांनी अहिल्याबाई होळकर प्रतिमेस पुष्पहार अर्पण केला. तसेच केक कापून महादेव जानकर यांचा वाढदिवस साजरा केला. या कार्यक्रमास उपस्थित प्राणसिंह पाल, रामविलास किरार, डीएस चौहान, मोहर सिंह केवट, सोनू पुरोहित, बादामसिंह बघेल, रणवीरसिंह रावत, अर्चना राठौर, पूजा राठौर, मिठठन लाल, वंशीकर, के पी परिहार, अनीश रघुवंशी यांच्या सह शेकडो कार्यकर्ते उपस्थित होते. राष्ट्रीय समाज पक्ष तर्फे रॅली काढण्यात आली.

ढोंगी आणि नकली पक्षापासून सावध राहावे : सिद्धप्पा अक्कीसागर

ढोंगी आणि नकली पक्षापासून सावध राहावे : सिद्धप्पा अक्कीसागर 

कुंभारी : ढोंगी आणि नकली राजकीय पक्षापासून सावध राहावे, असे आवाहन रासेफचे राष्ट्रीय अध्यक्ष एस. एल. अक्कीसागर यांनी केले. राष्ट्रीय समाज पक्ष काल, आज आणि उद्या या विषयावर दोन दिवसीय प्रशिक्षण शिबिरात पहिल्या दिवशीच्या दुपारच्या सत्रात बोलत होते.

श्री. अक्कीसागर यांनी भारतातल्या राजकीय पक्षांची वाटचाल कशी होती, हे सांगून राष्ट्रीय समाज पक्ष फुलेवादाची विचारधारा सर्वच राजकीय पक्षापेक्षा वेगळी असल्याचे निक्षून सांगितले. जो वेळेनुसार बदल स्वीकारतो, तोच काळाबरोबर चालतो, तोच अस्तित्व टिकवून ठेवतो. अन्यथा जे बदलत नाहीत, ते संपतात असा इशारा अक्कीसागर यांनी दिला. रासेफच्या राष्ट्रीय उपाध्यक्षपदी दिंगबर राठोड यांच्या नावाची घोषणा श्री. अक्कीसागर यांनी केली. भारतातील काही लोकांनी अजिंठा लेणी, गौतम बुद्ध यांच्या इतिहासाला भ्रष्ट केल्याचा घणाघात केला.

राष्ट्रीय समाज पक्षाची हाक ३१ मे चलो दिल्ली ! तालकटोरा मैदान !!

राष्ट्रीय समाज पक्षाची हाक ३१ मे चलो दिल्ली ! तालकटोरा मैदान !!

महाराणी अहिल्याबाई होळकर यांच्या त्रिशताब्दी जयंती निमित्त रासपची 'स्वराज महारॅली'

मुंबई  : महाराणी अहिल्याबाई होळकर यांच्या त्रिशताब्दी जयंती निमित्त राष्ट्रीय समाज पक्षाचे संस्थापक राष्ट्रीय अध्यक्ष महादेव जानकर यांच्या नेतृत्वाखाली राष्ट्रीय समाज पक्ष तर्फे 'स्वराज महारॅली'चे आयोजन करण्यात येणार आहे. राष्ट्रीय समाज पक्षाने ३१ मे चलो दिल्ली तालकटोरा मैदान अशी हाक दिली आहे. महाराणी अहिल्याबाई होळकर यांची देशातली पहिली जयंती साजरी करून महादेव जानकर यांनी नवा इतिहास रचला आहे. महाराणी अहिल्याबाई होळकर यांचा धार्मिक चेहरा पुढे आणला गेला, परंतु सर्वजण कल्याणकारी राजकीय चेहरा जाणीवपूर्वक लपवला गेल्याचे दिसते. अहिल्याबाई होळकर यांनी सर्व धर्मियांसाठी देशभरात कार्य केलेले केले, असे  राष्ट्रीय समाज पक्षाचे संस्थापक सदस्य सिद्धप्पा अक्कीसागर यांनी सांगितले. राष्ट्रीय कार्यकारणीच्या मार्गदर्शनात देशभर राष्ट्रीय समाज पक्ष स्वराज महारॅलीचे आयोजन व नियोजन करत असल्याचे सांगण्यात येत आहे. राष्ट्रीय समाज पक्षाचे सर्वेसर्वा महादेव जानकर विविध ठिकाणी उपस्थित राहून, महारॅलीस मार्गदर्शन करणार आहेत. होळकरशाहीच्या पराक्रमाची साक्ष देणाऱ्या तालकटोरा मैदान दिल्ली येथे स्वराज्य महारॅलीचा समारोप होईल. रासप आयोजित महाराणी अहिल्याबाई होळकर यांच्या जयंती निमित्त स्वराज्य महारॅलीस देशभरातील प्रतिष्ठित मान्यवर मंडळींना आमंत्रित करण्याचे सुतोवाच महादेव जानकर यांनी एका मराठी वृत्तवाहिणीशी बोलताना दिले आहेत. जास्तीत संख्येने दिल्लीची महारॅली यशस्वी करण्यासाठी आतापासूनच कार्यकर्त्यांनी तयारी चालू करावी, असे आवाहन रासपचे महाराष्ट्र राज्य प्रदेश अध्यक्ष काशिनाथ शेवते यांनी केले आहे.

Friday, April 25, 2025

चौंडीतून रासपा 'स्व'राज महारॅलीस प्रारंभ ! आज सातारा जिल्ह्यात महारॅली दाखल होणार !!

चौंडीतून रासपा 'स्व'राज महारॅलीस प्रारंभ ! आज सातारा जिल्ह्यात महारॅली दाखल होणार !!

मुंबई |आबासो पुकळे (२५/४/२०२५) : चौंडी येथून ३१ मे चलो दिल्ली ! तालकटोरा मैदान की ओर !! असा नारा देत, राष्ट्रीय समाज पक्षाचे संस्थापक/ राष्ट्रीय अध्यक्ष महादेव जानकर यांच्या मार्गदर्शनात महाराणी अहिल्याबाई होळकर यांच्या त्रिशताब्दी जयंतीनिमित्त राष्ट्रीय समाज पक्षाने स्वराज महारॅली काढली आहे. 'राष्ट्रीय समाज नायक' महादेव जानकर यांच्या जन्म दिवसाचे औचित्य साधून राष्ट्रीय संघटक बाळकृष्ण लेंगरे मामा, गोविंदराम शुरनर, महाराष्ट्र रासपचे प्रदेशाध्यक्ष काशिनाथ शेवते, राज्य महासचिव ज्ञानेश्वर सलगर यांनी महाराणी अहिल्याबाई होळकर यांच्या   जन्मभूमी चौंडी तालुका जामखेड जिल्हा अहिल्यानगर येथून 'स्व'राज महारॅलीस उत्साहपूर्ण वातावरणात प्रारंभ केला. 

महामानवांच्या शक्तीस्थळ, प्रेरणास्थळांना अभिवादन करत, दि. २० एप्रिल रोजी स्वराज महारॅली फुलेवाडा पुणे येथे आली होती. पुणे जिल्ह्यात ठीक ठिकाणी नागरिकांनी स्वराज महारॅलीचे जोरदार स्वागत केले. राष्ट्रीय समाज पक्षाचे स्वराज महारॅली आज सातारा जिल्ह्यात दाखल होणार आहे, अशी माहिती रासपचे पश्चिम महाराष्ट्र संपर्कप्रमुख विनायक (मामा) रुपनवर यांनी 'विश्वाचा यशवंत नायक'शी बोलताना दिली. महारॅली समवेत रासपचे पश्चिम महाराष्ट्र अध्यक्ष किरणजी गोफणे, सोलापूर जिल्हाध्यक्ष अनिल शेंडगे विराजमान आहेत. आज फलटण तालुक्यातील गोखळी, खटके वस्ती, तामखडा, गुणवरे, बरड, कुरवली पाटी, राजुरी, आंदरुड, जावली, मिरवडे, वडले, दुधेभावी, भाडळी, तीरकवाडी, सोनवडी, कोळकी, फलटण शहर, फरांदवाडी, वाठार निंबाळकर फाटा, मिरगाव, निंभोरे, सुरवडी, बडेखान, नांदल, काळज, डोंबाळवाडी आदी गावात भेट देऊन सायंकाळी तरडगाव येथे मुक्काम करणार आहे. फलटण तालुक्यात स्वराज महारॅलीचे जंगी स्वागत करावे, असे आवाहन फलटण तालुका अध्यक्ष महादेव कुलाळ, तालुका उपाध्यक्ष मनोहर कचरे, युवक तालुकाध्यक्ष सुनील सोनवलकर यांनी केले आहे.










Thursday, April 24, 2025

Belagavi village erupts in joy as youth from shepherding community clears UPSC

Belagavi village erupts in joy as youth from shepherding community clears UPSC

Beerappa is a B.Tech graduate who wanted to join the Indian army, like his elder brother, but could not attempt the officers’ recruitment examinations due to various reasons

It was an occasion of unprecedented joy for the sheep-herding community of Nanavadi village in Belagavi district of Karnataka as one of them had cleared the civil services examinations conducted by the Union Public Service Commission (UPSC).

Beerappa Siddappa Doni from Amage village in Maharashtra was visiting his relatives in Nanavadi in Belagavi district for the holidays. On April 23, his relatives heard that he had cleared the UPSC examination. Within no time, they organised a celebration on the grasslands where they graze sheep every day.

Shepherds from Nanavadi village in Belagavi district of Karnataka celebrate the success of Beerappa Siddappa Doni, a youth from the community who hails from Amage village in neighbouring Maharashtra. | Photo Credit: SPECIAL ARRANGEMENT

Beerappa got the 551st rank, as per the UPSC results that were announced on April 22.

Named after the family deity, Beerappa is a B.Tech graduate. He wanted to join the Indian army, like his elder brother who is a soldier. But he could not attempt the officers’ recruitment examinations due to various reasons. Instead, he got a job in India Post. However, he quit after a few years and started preparing for the IAS examinations. He cleared the exams in his third attempt.

He hopes to join the Indian Police Service (IPS), based on his ranking, and his choice in the examination application form.

His father, Siddappa Doni, does not know much about the civil service examinations. But he knows that his third son is bright and hard-working. “Our well-wishers tell me Beerappa will become a senior police officer. I am sure that he will be happy, as he had aspired to become an army officer,” he said.

His uncle Yallappa Gaddi, who stays in Nanavadi, was very happy that his nephew had cleared ‘what is considered the highest examination in the country’.

“We want him to be a good officer and help poor people like us. His success will inspire other young men and women from our community to appear for such examinations,” Mr. Gaddi said.

Wednesday, April 23, 2025

The inspiring story of Birdev Siddhapa Done

 The inspiring story of Birdev Siddhapa Don, an IPS officer from Yamge village in Kolhapur district's Kagal taluka. Despite facing poverty, Birdev's determination led him to achieve an All India rank of 551 in the UPSC examination.


Birdev's journey from humble beginnings to becoming an IPS officer is truly remarkable. His story serves as a testament to hard work and perseverance. The fact that he used to take his goat for walks in Bhavani Nagar, Belgaum city, adds a touching dimension to his journey.


Birdev's achievement has brought pride to his village, Yemge, and serves as an inspiration to many. His story highlights the importance of never giving up on one's dreams, regardless of circumstances.


Thursday, April 10, 2025

सिडकोच्या कारवाईमुळे आदिवासी वाडीतील शाळकरी मुलांचा आक्रोश; सामाजिक कार्यकर्ते किरण केनी यांनी केला कारवाईचा निषेध

सिडकोच्या कारवाईमुळे आदिवासी वाडीतील शाळकरी मुलांचा आक्रोश; सामाजिक कार्यकर्ते किरण केनी यांनी केला कारवाईचा निषेध







पनवेल (९/४/२५ ) :  तालुक्यातील वडघर फणसवाडी येथील आदिवासीवाडीवर सिडकोने तोडक कारवाई केली; ऐन परीक्षेच्या काळात सिडको ने उचललेल्या पावलामुळे आदिवासी वाडीतील शाळकरी मुलांचा आक्रोश पाहून सामाजिक कार्यकर्ते किरण केनी यांनी सदर प्रकाराचा निषेध केला आहे. वडघर ग्रामपंचायतच्या हद्दीत फणसवाडीतील  1980 पासून 32 घरे आहेत. इंदिरा आवास योजनेअंतर्गत हे घरे बांधली आहेत. नवी मुंबई विमानतळासाठी पर्यायी रस्ता बनवण्यासाठी आदिवासीडी येथील घरे तोडण्याची तयारी सिडकोने केल्याने लोकांमध्ये नाराजी पसरली आहे.

शंभू महादेवाच्या पुजेचा मान होळकरांना...!!

शंभू महादेवाच्या पुजेचा मान होळकरांना...!!


शिखर शिगंनापुर येथील शंभू महादेवाची चैत्र महिन्यात यात्रा असते चैत्र महिण्यातील एकादशीला होळकर राजे घोड्यावर बसुन शिगंणापूरला येतात शिंगणापूरच्या वेशीवर त्यांचे ग्रामस्थांच्या तसेच संस्थानच्या वतीने वाजत गाजत स्वागत करण्यात येवून त्यांना थेट मंदिरात दर्शनासाठी सन्मानाने घेवून जातात. शंभू महादेवाचे पुजारी असलेले बडवे महाराज होळकर राजांच्या हस्ते शंभू महादेवास अभिषेक करतात पारंपरिक पध्दतीने पुजा अर्चा आणि दर्शन झाल्यानंतर होळकर राजास संस्थानकडुन भोजन महाप्रसाद दिला जातो थोरले सुभेदार मल्हारराव होळकर यांचेपासुन ते सुभेदार काशीराव होळकर यांचेपर्यंत होळकर राजघराण्यांच्या वतीने शंभू महादेवाची पुजा करण्यात येत होती.

सुभेदार काशीराव होळकर यांचे सासरे सरदार काळुजी बाबा गावडे अत्यंत शुर आणि पराक्रमी होते काशीराव होळकर यांनी आपल्या सासरे काळुजी बाबा यांना शंभू महादेवाच्या पुजेचा मान दिला होळकर राजघराण्यांच्या वतीने दरवर्षी काळुजी गावडे व नंतर काळुजी बाबा यांच्या पुत्रपौत्रादी यांच्या वंशपंरपरेनुसार पुजा करण्यात यावी यासाठी कासेगाव परगण्यातील बोहाळी गावातील काही जमीन बडवे यांना बहाल केली.

तेंव्हा पासून सरदार काळुजी बाबा गावडे यांच्या घराण्यातील लोक इंदौरच्या होळकर महाराजांच्या वतीने घोड्यावर बसुन शिखर शिंगणापूर येथे दरवर्षी मानाच्या पूजेसाठी येतात. सरदार गावडे घराणे माळेगाव ता.शेवगाव जि.अहिल्यानगर येथील असुन माळव्यात त्यांना बशीपिंपरी नामक जहागीर आहे.

पायवेस घालुन पुजा करण्याची परंपरा आहे यावर्षी दि.8 रोजी शिखर शिगंगणापुर येथे शंभू महादेवाची पुजा गणेश गावडे यांच्या हस्ते संपन्न झाली.इंदौरच्या राजाची स्वारी दाखल होताच यात्रेसाठी जमलेले लोक मोठमोठ्याने राजे आले-राजे आले असे ओरडतात मंदिराकडे जात असतांना त्यांच्या वर फुलांचा वर्षाव करण्यात येतो.छत्रपती शाहु महाराज यांच्या पासून सुभेदार मल्हारराव होळकर यांना मान मिळाला होता. होळकरांच्या शिरावर छत,चामर,चौरी धरल्या जाते.पुण्यश्लोक अहिल्यादेवींनी शिगंनापुर येथे दोन बारवा तसेच मंदिर परिसरात बांधकाम केल्याची नोंद पुजारी बडवे यांनी लिहलेल्या पुस्तकात वाचायला मिळते.

आमदार गोपीचंद पडळकर आजच्या पुजेला गणेश गावडे यांच्या समवेत पुजेसाठी मानकरी म्हणून उपस्थित होते.एकादशीच्या चार दिवस आधी शंभू महादेवाचा विवाह संपन्न होतो या विवाहासाठी दुरदुरवरुन भाविक भक्त कावड आणतात वेगवेगळ्या घराण्यांना शंभू महादेवाचा मान असुन लाखो लोक दर्शनासाठी उपस्थित असतात. छत्रपती शिवाजी महाराज यांचे कुलदैवत असलेल्या शंभू महादेवाच्या पुजेचा मान इंदौरच्या होळकरांना असुन होळकरांच्या वतीने मानकरी म्हणून माळेगावचे सरदार गावडे घराणे दरवर्षी मानाच्या पुजा करण्यासाठी घोड्यावर स्वार होवून येतात.

शंभू महादेवाच्या चैत्र महिण्यातील यात्रेचा मान तब्बल 50 घराण्यांना असून वेगवेगळ्या जातीतील लोक गुण्यागोविंदाने आपपल्या परंपरेनुसार शंभू महादेवाची सेवा करतात.धनगर समाजातील माळेगावचे सरदार गावडे,माळशिरचे वाघमोडे पाटील,सांगोल्याचे शेंडगे देशमुख, म्हसवडचे सनगर पाटील,सांगोल्याचे राऊत,नातेपुतेचे चांगन आदी घराणे मानकरी आहेत.


-श्री.रामभाऊ लांडे

अभ्यासक 

होळकर राजघराणे, इंदौर

9421349586

Sunday, April 6, 2025

औरंगजेबाने उध्वस्त केलेल्या अयोध्येतील श्रीराम मंदिराचा पुण्यश्लोक अहिल्यादेवी कडून जीर्णोद्धार..!

औरंगजेबाने उध्वस्त केलेल्या अयोध्येतील श्रीराम मंदिराचा पुण्यश्लोक अहिल्यादेवी कडून जीर्णोद्धार..!


औरंगजेब बादशहाने सत्तेच्या बळावर धर्मांध होवून हिंदू धर्माची आस्था केंद्र बाटवून ती नष्ट करण्याचा प्रयत्न केला.औरंगजेबापुर्वी अलाउद्दीन खिलजी,मोहम्मद घोरी यांनी भारतातील धार्मिक आस्था केंद्राची लुट करुन ती उध्वस्त केली,मंदिरे पाडली,धर्मग्रंथ जाळले,पुजा-यांचा शिरच्छेद केला,मंदिरे बाटवली या कारणाने देशातील बारा ज्योतिर्लिंग,सप्तपुरी,चारधाम पुजा काहीकाळ थांबली औरंगजेबाने निधन होतात छत्रपती शाहु राजांनी, थोरले श्रीमंत बाजीराव पेशवे यांच्या माध्यमातून संपूर्ण हिंदुस्थान ताब्यात घेण्यासाठी मोहीमा काढल्या,खंडित झालेला भारत नव्याने उभा करण्यासाठी मराठ्यांच्या फौजा जरी पटक्याखाली दिल्लीच्या दिशेने निघाले.

सुभेदार मल्हारराव होळकर यांनी मुघल बादशहाच्या माळव्यात तिरला आणि आमझेरा लढाईत विजय मिळवला,भोपाळ जिकंले 

मुघल सुभेदार दयाबहादुर,दुसरा जयसिंगानंतर 

श्रीमतांनी मल्हाररावांना माळवा दिला.माळव्याचे सुभेदार म्हणून मल्हारराव होळकर यांची कारकीर्द सुरू झाली स्वराज्याच्या विस्ताराबरोबर त्यांनी हिंदुस्थानच्या नकाशावर असलेल्या शिवालये,

राममंदिर,विष्णुपद मंदिराच्या मुक्तीची योजना आखली होती.

मल्हाररावांच्या पुत्रवधू पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांनी औरंगजेबाने उध्वस्त केलेली सर्व मंदिरे पुन्हा नव्याने उभी करण्यासाठी बुध्दीचातुर्य आणि सासरे मल्हारराव होळकर यांच्या दरा-याचा उपयोग केला.माळव्याच्या बाहेर असलेल्या सर्व शासकांना पत्र लिहले आणि स्वतःच्या खाजगी दौलतीतुन होळकर टाकीच्या माध्यमातून चारधाम, सप्तपुरी, बारा ज्योतिर्लिंगासह हजारो मंदिरे नव्याने उभी राहिली. औरंगजेब, खिलजी, घोरीने पाडलेल्या मंदिराच्या मुळ स्थापत्य शैली प्रमाने त्या मंदिरांचा जीर्णोद्धार केला तेथील परंपरा सुरू केल्या.पुजारी नियुक्त केले त्यांना वर्षासने बहाल केली,मंदिराच्या पुजा अर्चेसाठी इनाम जमिनी दिल्या.आज जे धार्मिक आस्थेचे केंद्र फुललेले दिसतात त्यापाठीमागे पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांचे लोककल्याणकारी कार्याचा वारसा पहायला मिळतो.

भारदस्त देवालय,गर्भगृहातील तेजस्वी देव,लखलखणारे कळस,अस्मितेचे ध्वज,धार्मिक पुजा अर्चेने तेजोमय झालेल्या मंदिराकडे बघितल्यास अहिल्यादेवींची शिवमय मुर्ती डोळ्यासमोर आपसूकच उभी राहते.प्रत्यक्षात रामराज्याची माळव्यात स्थापना करुन अहिल्यादेवींनी भक्तीचे सामर्थ्य सिध्द केलेले आहे. देवाचे देवपन आणि राजाचे राजेपन फक्त अहिल्यादेवींनी जपले.पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांनी भारतात  राममंदिरे बांधली ती पुढील प्रमाणे -


(१) श्री राम मंदिर,अयोध्या

 (२)श्री.त्रेताराम मंदिर अयोध्या

 (३) श्री.रामचंद्र मंदिर जगन्नाथपूरी

 (४) श्री.राममंदिर चित्रकुट

 (५) श्रीराम मंदिर -पंढरपूर

 (६) अहिल्याराम मंदीर संगमनेर 

(७) अहिल्याराम मंदिर - नाशिक 

(८) श्री राममंदिर -आलमपुर .

(९)श्रीराम मंदिर नांदुर मध्यमेश्वर

(१०)श्री राम मंदिर, महेश्वर

भारताची धार्मिक आस्थेचे जतन करणाऱ्या पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या जयंती त्रिशताब्दी सोहळ्याचे हे वर्षे असुन इथली धार्मिक आस्था संपवू पाहणाऱ्यांना अहिल्यादेवींनी आपल्या लोककल्याणकारी कामातून उत्तर दिलेले आहे जे अजरामर असून त्यांचा भारतीयांना अभिमान वाटतो.

श्रीरामनवमी निमित्ताने हार्दिक शुभेच्छा...!!!!

-श्री.रामभाऊ लांडे

अभ्यासक

होळकर राजघराणे, इंदौर.

-9421349586

पुळकोटी प्राथमिक आरोग्य केंद्रातील रुग्णवाहिकेच्या चालकाकडून मुजोरी, रुग्णास धरले वेठीस

पुळकोटी प्राथमिक आरोग्य केंद्रातील रुग्णवाहिकेच्या चालकाकडून मुजोरी, रुग्णास धरले वेठीस 

कुकुडवाड (५ एप्रिल २०२५) : आज सार्वजनिक आरोग्य विभागामार्फत मार्डी येथे कुटुंब नियोजन शस्त्रक्रिया शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. माण तालुक्यातून अनेक प्राथमिक केंद्रातून रुग्णांना एकत्र बोलावले होते. पुळकोटी प्राथमिक आरोग्य केंद्रातर्फे मार्डी येथे शिबिरस्थळी पोहचण्यासाठी पेशंटना म्हसवड येथे सकाळी ७ : वाजता बोलावले होते. ठरल्यावेळेप्रमाणे आशासेविकेसह रुग्ण, नातेवाईक हे पुकळेवाडी येथून म्हसवड येथे खासगी वाहनाने सकाळी ७ वाजता हजर राहिले. पुढे ११ च्या दरम्यान मार्डी येथे शस्त्रक्रिया पार पडल्या. शास्त्रक्रिया यशस्वी झाल्यानंतर रुग्णांना रुग्णवाहिकेतून त्यांच्या घरी पोहचवणे अपेक्षित होते. परंतु पुळकोटी प्राथमिक आरोग्य केंद्रातील रुग्णवाहिकेच्या चालकाने संबंधित रुग्णास त्यांच्या घरी न पोहोचवता पुळकोटी येथे आणून, तब्बल चार तास ताटकळत ठेवले. शस्त्रक्रिया झालेल्या रूग्णास आरामाची आवश्यकता होती, रुग्णास वेळेत घरी पोचवणे गरजेचे असताना, आशासेविकेस रुग्णवाहिकेचा चालक म्हसवड येथून लगेच येतो, असे सांगून पुळकोटी प्राथमिक आरोग्य केंद्रातून निघून गेला. पहाटे सहा वाजता घर सोडलेल्या आशासेविका, रुग्ण, नातेवाईक यांना पुळकोटी प्राथमिक आरोग्य केंद्रतील रुग्णवाहिका चालकाने मुजोरपणा दाखवत तब्बल चार तास वेठीस धरले. शस्त्रक्रियेसाठी पहाटे घर सोडलेल्या रूग्ण, नातेवाईक यांना ताटकळत ठेवल्याने मनस्ताप सहन करावा लागला. संबंधित रुग्णवाहिकाचालकाची तक्रार करण्यासाठी माण तालुका आरोग्य अधिकारी यांच्याशी फोनद्वारे संपर्क साधण्याचा प्रयत्न केला असता, त्यांनीही दोनदा कॉल कट करून फोन घेण्याचे टाळले. माण तालुक्यात सार्वजनिक आरोग्य विभागाच्या तीनतेरा वाजल्या आहेत, नागरिकांकडून अनेक तक्रारी लोकांमध्ये चर्चिल्या जातात. सन २०२० साली प्रसूत झालेल्या मातेस प्रधानमंत्री मातृवंदना योजनेचे अद्याप पैसेही मिळाले नाहीत. "दिनांक "२१ नोव्हेंबर २०२४" रोजी श्रीमती ज्योती बाजीराव दडस यांना वडगांव येथे सकाळी ११ : ०० वाजता सर्पदंश झाला होता, उपचारासाठी दहिवडी ग्रामीण रुग्णालयात नेहले असता, त्याठिकाणी वैद्यकीय अधिकारी उपस्थित नव्हते, तेथे उपस्थित असणाऱ्या परिचारिकेने प्राथमिक उपचार करून सातारा येथे पुढे पाठवले, त्यामुळे ग्रामीण भागातील लोकांचे आरोग्य रामभरोसे झाले आहे, अत्यावश्यक सेवा मिळत नसल्याचे, शरद दडस यांनी सांगितले. पुळकोटी आरोग्य केंद्रातील मुजोर रुग्णवाहिका चालक कर्मचारी हे परिचारिका, आशासेविका यांना सरळ सरळ फसवतात, या बेशिस्त कर्मचाऱ्यांना आरोग्य विभागातील वरिष्ठ अधिकारी कशी शिस्त लावतात हे पाहावे लागेल. आरोग्य विभागाने सुधारणा केली नाही तर आक्रमक पद्धतीचे आंदोलन छेडण्याचा इशारा, श्री. दडस यांनी दिला आहे.

विश्वाचा यशवंत नायक माहे : जून 2025

विश्वाचा यशवंत नायक माहे : जून 2025