Wednesday, June 30, 2021

विश्वाचा यशवंत नायक जून २०२१






 

माजी मंत्री आ. महादेव जानकर यांचा आरेवाडी दौरा बिरोबा दर्शनानंतर केली स्टडी सेंटरची पाहणी

माजी मंत्री आ. महादेव जानकर यांचा आरेवाडी दौरा
बिरोबा दर्शनानंतर केली स्टडी सेंटरची पाहणी



आरेवाडी :- महाराष्ट्र राज्याचे माजी मंत्री आमदार महादेव जानकर यांनी आज दुपारी १२ वाजता आरेवाडी येथील बिरोबा देवाचे दर्शन घेतले. त्यानंतर बिरोबा बनात आरेवाडी ग्रामस्थांच्या  वतीने सुरु करण्यात आलेल्या स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन केंद्राला भेट देऊन पाहणी केली. याप्रसंगी आरेवाडी गावाच्या वतीने प्रतिष्ठित जेष्ठ नागरिक वाय. बी. कोळेकर यांच्या हस्ते आ. जानकर यांचा फेटा बांधून सत्कार करण्यात आला. 


महाराष्ट्र राज्याचे माजी पशुसंवर्धन व दुग्ध विकास मंत्री आ. महादेव जानकर हे मागील काही दिवसांपासून सांगली जिल्ह्याच्या दौऱ्यावर आहेत. आज ते आरेवाडी बिरोबाचे दर्शन घेण्यासाठी आले होते. यावेळी त्यांच्यासोबत राष्ट्रीय समाज पार्टीचे पदाधिकारी आणि काही जुने कार्यकर्ते देखील होते. 


श्री बिरोबा स्टडी सेंटरला मदत करण्याचे आश्वासन


मायभूमी आरेवाडी व्हाट्सअप ग्रुपच्या सुसंवादातून बिरोबा बनामध्ये उभारलेल्या श्री बिरोबा स्टडी सेंटरला माझ्याकडून आवश्यक ती मदत करण्याचा शब्द    यावेळी महादेव जानकर यांनी दिला. माझ्या सामाजिक व राजकीय प्रवासामध्ये आरेवाडी गावाने मला मोठी साथ दिली आहे. याच गावाने आज तरुणांसाठी स्पर्धा मार्गदर्शन केंद्र सुरु केले आहे, हि बाब दूर दृष्टीची आहे. कारण याच दुष्काळी आणि ग्रामीण भागातील पोरं प्रशासनामध्ये गेली पाहिजेत. म्हणून या अभ्यास केंद्राला मी माझ्यापरीने लागेल ती मदत करण्याचे असे आश्वासन यावेळी आ. जानकर यांनी दिले.

प्रधानमंत्री कृषी सिंचन योजनेत जिहेकठापूरचा समावेश करा अशी मागणी आज केंद्रीय जलशक्ती मंत्रालयाकडे आमदार जयकुमार गोरे यांनी केली

प्रधानमंत्री कृषी सिंचन योजनेत जिहेकठापूरचा समावेश करा अशी मागणी आज  केंद्रीय जलशक्ती मंत्रालयाकडे केली



     खटाव आणि माण या कायम दुष्काळी तालुक्यांसाठी वरदान ठरणाऱ्या गुरुवर्य लक्ष्मणराव इनामदार जिहेकठापूर उपसा सिंचन योजनेची उर्वरित कामे पूर्ण करण्यासाठी या योजनेचा प्रधानमंत्री कृषी सिंचन योजनेत समावेश करावा किंवा नाबार्ड ग्रामीण पायाभूत विकासनिधी अंतर्गत नवीन मालिका २७ मध्ये समावेश करुन लागणारा सर्व निधी मिळावा अशी मागणी   जलशक्ती मंत्रालयाचे केंद्रीय मंत्री गजेंदरसिंह शेखावत यांच्याकडे केली. लवकरच याबाबत निर्णय घेऊन जिहेकठापूर योजना पूर्ण करण्याचे अश्वासन मंत्री शेखावत यांनी दिले. 

       जिहेकठापूर उपसा सिंचन योजना लवकरात लवकर पूर्ण होण्यासाठी मी गेल्या १२ वर्षांपासून सर्व स्तरावर प्रयत्न करत आहे. या योजनेच्या वाढीव खर्चाला  दोन वेळा सुधारित प्रशासकीय मान्यता देण्याचे काम राज्यातील मागील भाजपा सरकारने केले होते.  आजपर्यंत  या योजनेसाठी ६१७ कोटींचा निधी खर्च करण्यात आला आहे.  महिनाभरात अंशत: योजना कार्यान्वित करुन नेर धरण आणि येरळा नदीत पाणी सोडण्याचे नियोजन करण्यात आले आहे. योजनेची उर्वरित कामे करण्यासाठी आणखी ६४२ कोटींच्या निधीची आवश्यकता आहे. लागणारा हा निधी त्वरित मिळण्यासाठी जिहेकठापूर उपसा सिंचनचा समावेश प्रधानमंत्री कृषी सिंचन योजनेत करावा,  त्यासाठी जलशक्ती मंत्रालयाने मान्यता दिली आहे. आता या प्रस्तावाला केंद्र शासनाकडून मान्यता मिळावी अशी मागणी केंद्रीय मंत्री गजेंदरसिंह शेखावत यांच्याकडे केली.  दिल्ली येथे मंत्र्यांच्या दालनात याविषयीचे निवेदन देताना जिहेकठापूर योजना लवकर पूर्ण होणे माण आणि खटाव तालुक्यांच्या दृष्टीने महत्वपूर्ण असल्याचे त्यांना सांगितले. या योजनेसाठी नाबार्डमधून यापूर्वी ६५ कोटींचे अर्थसाहाय्य प्राप्त झाले होते. आता लागणारे ६४७ कोटी नाबार्ड ग्रामीण पायाभूत विकासनिधीतून मिळावेत अशी मागणीही मंत्र्यांकडे केली. 

     केंद्र शासनाकडून जिहेकठापूरसाठी लागणारा उर्वरित निधी प्राप्त झाल्यावर नेर उपसा सिंचन १ आणि २ तसेच आंधळी बोगद्यातून पाणी माणमधील आंधळी धरण आणि माण नदीत सोडण्याचा मार्ग मोकळा होणार आहे. आंधळी धरणातून पाणी उचलून उत्तर माणमधील गावांची तहान भागविणारी आंधळी उपसा सिंचन योजना तसेच योजनेच्या दुसऱ्या उर्ध्वगामी नलिकेची कामे वितरण व्यवस्थेसह पूर्ण होणार आहेत. 

    केंद्रीय मंत्री गजेंदरसिंह शेखावत यांनी जिहेकठापूर योजनेची उर्वरित कामे पूर्ण करण्यासाठी लागणारा ६४७ कोटींचा निधी लवकरच देण्यात येईल अशी ग्वाही दिली. यावेळी खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर, आ. राहुल कुल उपस्थित होते.

आरक्षणाला रा-सेफचा पाठिंबा : एस एल अक्किसागर

आरक्षणाला रा-सेफचा संपूर्ण पाठिंबा आहे : राष्ट्रीय अध्यक्ष मा.श्री.एस.एल.अक्कीसागर 

दि.20.06.2021 रोजी रा-सेफची online मिटिंग पार पडली.या मिटिंगमध्ये कोरोना काळातही राष्ट्रीय समाज नायक मा.श्री.महादेवजी जानकर साहेबांचे कार्य हे प्रेरणा व उर्जा देणारे आहे.त्यातून आपण प्रेरणा घेवून काम करायला पाहिजे असे मत अनेक रा-सेफ सदस्यांनी व्यक्त केले.

प्रमुख मार्गदर्शक मा.श्री.एस.एल अक्कीसागर साहेब म्हणाले की,आरक्षणाला रा-सेफचा संपूर्ण पाठिंबा आहे.शासनाने आरक्षण प्रश्न तातडीने सोडवावा. राजर्षी शाहूमहाराजांनी आपल्या संस्थानात ५०% आरक्षण लागू केले होते.सर्वाना समान भागीदारी दिली होती.लोकांच्या कल्याणासाठी राज्य कारभार केला हे शासनाने लक्षात घ्यावे.तसेच डॉ.बाबासाहेबांनी दलितांसाठी ब्रिटिशाकडे आरक्षणाची मागणी केली.त्यांना सामाजिक न्याय व विकासाच्या प्रवाहामध्ये आणण्यासाठी आरक्षणाची गरज आहे असे त्यांनी ब्रिटिशांना सांगितले व स्वातंत्र्य नंतर संविधानामध्ये अनेक तरतूदी केल्या.मा.सागर साहेबानी यावेळी कालेलकर अवाहलावरही भाष्य केले.जागृतीचा सिध्दांत सांगत आसताना ते म्हणाले मागणी कोणती करावी.यांचे ज्ञान असायला पाहिजे.पेरियार रामास्वामी यांनी केलेल्या कार्यामुळे तामिळनाडूतील obc कसा जागृत आहे.याची त्यांनी जाणिव करुन दिली.तेथिल मुख्यमंत्र्यानी पंतप्रधान कडे केलेली मागणी कसी योग्य आहे हे सांगितले.जोपर्यंत आपण जागृत होवून आपल्या हक्क अधिकारासाठी विचार करणार नाहीत तोपर्यंत ते आपल्याला मिळणार नाहीत. राष्ट्रीय समाज आपला विकास आरक्षणामुळे होईल या आशेवर आहे पण येथील शासन योग्य ती जबाबदारी घेवून न्याय देण्याचे काम करत नाही.शेवटी लोकशाहीमध्ये लोकाचे कल्याण होणे हे महत्वाचे असते पण शासनाच्या उदासीन धोरणामुळे आज राष्ट्रीय समाज हालअपेष्टा भोगत आहे आम्ही मात्र सामाजिक न्यायाची भूमिका घेवू सर्वाना न्याय देण्याचा,सर्वाचा विकास साधण्याचा प्रयत्न करू सर्वाना समान भागीदारी देवून हे राष्ट्र बलशाली बनवण्याठी प्रयत्न करु.आमची भूमिका सर्वाना आरक्षण मिळाले पाहिजे हिच आहे असे ते म्हणाले.

या प्रसंगी मा.श्री. नाजरकर सरांनी संघटनेच्या पुढील कार्याचे नियोजन कसे करायचे हे सांगितले लोकापर्यत पोहचण्यासाठी,प्रशिक्षण शिबिर घेण्यासाठी त्यांनी मार्गदर्शन केले.संघटनेचे सचिव मा.श्री राजगे सर यांनी ,दर महा निधी उभारण्यासाठी प्रत्येक सदस्यांनी पुढाकार घ्यावा असे आव्हान केले.मोलाचे  मार्गदर्शन करुन मिटिंग यशस्वी करण्यासाठी परिश्रम घेतले.

        

 

विश्वाचा यशवंत नायक मे २०२१

 








Sunday, June 27, 2021

दक्षिण माणमध्ये पाऊसाच्या हलक्या सरी

दक्षिण माणमध्ये पाऊसाच्या हलक्या सरी

कुकुडवाड दि.२६ : प्रा. आबासो पुकळे

माण तालुक्याच्या दक्षिण भागात काल शनिवारी पाऊसाच्या हलक्या सरी कोसळल्या. कुकुडवाड, पुकळेवाडी, वडजल, मरगळेवाडी, कारंडेवाडी, धनवडेवडी, मानेवाडी, नंदीनगर, भाकरेवाडी, शिवाजीनगर, गटेवाडी, वळई, विरळी, चीलारेवडी आदी गावात पाऊस पडला. कडक उन्हाळ्यात जमिनी तापवून मशागत करून पेरणीसाठी पाऊसाचा प्रतीक्षेत असणाऱ्या शेतकऱ्यांना  पेरणीसाठी पोषक वातावरण तयार झाले. चाऱ्याच्या समस्येने ग्रासलेल्या पशुपालकांसाठी देखील चांगले झाले.डोंगर कपाऱ्यामधून गवताच्या काड्या जोर धरतील, अशी अपेक्षा पशुपालकांमध्ये आहे.



जमिनीत कमी ओल असताना देखील काही शेतकऱ्यांनी पेरणीची कामे उरकली होती, परंतु समाधानकारक पाऊस झाला नसल्याने शेतकऱ्यांमध्ये चिंतेचे वातावरण तयार झाले होते. काल झालेल्या पाऊसामुळे पेरणी झालेल्या पिकांसाठी, राहिलेले शेत शिवार पेरण्यासाठी चांगले झाले, अशा प्रतिक्रिया शेतकऱ्यांमधून उमटल्या. पाऊसाचा हलक्या सरी कोसळल्या असल्या तरी, जिरायत शेतीवर अवलंबून असणारे शेतकरी मात्र मोठ्या पाऊसाचा प्रतीक्षेत कायम आहेत.

राजकीय नेतेमंडळी, खासदार, आमदार, नगरसेवकांना यांना सहकारी बँकांमध्ये व्यवस्थापकीय संचालक अथवा पूर्ण वेळ संचालक होता येणार नाही.

रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाचा (RBI) महत्वपूर्ण निर्णय, राजकीय नेतेमंडळी, खासदार, आमदार, नगरसेवकांना यांना सहकारी बँकांमध्ये व्यवस्थापकीय संचालक अथवा पूर्ण वेळ संचालक होता येणार नाही.



सहकारी बँका, साखर कारखाने, पतपेढ्या यामध्ये अनेक  राजकीय मंडळींच्या हाती सत्ता असते, मात्र आरबीआयने (RBI) घेतलेल्या निर्णयानुसार आता अनेक राजकीय नेतेमंडळी, खासदार, आमदार, नगरसेवकांना आता सहकारी बँकांमध्ये व्यवस्थापकीय संचालक अथवा पूर्ण वेळ संचालक होता येणार नाही. अशा प्रकारच्या नियुक्त्या रोखण्याचा निर्णय रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने (RBI) घेतला आहे. 

सहकारी बँका, साखर कारखाने, पतपेढ्या यामध्ये अनेक राजकीय नेत्यांची संख्या अधिक आहे.

संचालक पदांसाठी आवश्यक असलेली पात्रता देखील RBI ने निश्चित केले आहे.

यानुसार, या पदावर नियुक्त होणाऱ्या व्यक्तीकडे मास्टर्स किंवा अर्थक्षेत्रातील पदवी आवश्यक असणार आहे. यावरून, सनदी लेखापाल, (फायनान्स) बँकिंग, सहकारी व्यवहार व्यवस्थापनात पदविका असलेल्या व्यक्तीची नियुक्तीदेखील व्यवस्थापकीय संचालक

किंवा पूर्ण वेळ संचालक म्हणून केली जाऊ शकते. असं RBI ने म्हटलं आहे.

या दरम्यान, अर्ज करणाऱ्या उमेदवाराचं वय किमान 35 वर्षे ते कमाल 70 वर्षे असावं.

अशी देखील वयाची अट घातली आहे. बँकिंग क्षेत्रात वरिष्ठ अथवा मध्यम स्तरावर 8 वर्षे काम करण्याचा अनुभव असलेल्या व्यक्तीचाही व्यवस्थापकीय संचालक किंवा पूर्ण वेळ संचालक पदासाठी विचार केला जाऊ शकतो.

सहकारी कंपनीमध्ये कोणतंही पद भूषवणाऱ्या व्यक्तींचा या पदासाठी विचार केला जाणार नाही.

दरम्यान, एका व्यक्तीची मुदत कमाल 5 वर्ष असणार आहे.

तसेच, त्याच व्यक्तीची फेरनिवड करता येऊ शकणार आहे.

परंतु, मात्र तो टर्म किमान तीन मध्ये अर्थात पूर्ण कार्यकाळ पंधरा वर्षांपेक्षा जास्त नसावा.

असं रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने सांगितलं आहे.


Friday, June 25, 2021

दि. कुर्ला नागरिक सहकारी बँक अध्यक्षपदी महेंद्र बनगर

दि. कुर्ला नागरिक सहकारी बँक अध्यक्षपदी महेंद्र बनगर 

कुकुडवाड (प्रतिनिधी) दि. २५ :  दि.कुर्ला नागरिक सहकारी बँक. लि. मुंबईचे अध्यक्षपदी महेंद्र (शेठ) वसंत बनगर यांची निवड झाली. महेंद्र बनगर यांचे मुळगाव माण तालुक्यातील बनगरवाडी(म्हसवड) आहे. व्यवसायानिमत्त ते मुंबईला स्थायिक झाले आहेत. श्री. बनगर यांच्या निवडीमुळे माण तालुक्यात आंनद व्यक्त केला जात आहे.

श्री. महेंद्र बनगर यांची दि. कुर्ला नागरिक सहकारी बँकेच्या अध्यक्षपदी निवड झाल्यानंतर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, रासपचे संस्थापक अध्यक्ष माजी मंत्री आ. महादेव जानकर, आ. मंगेश कुडाळकर, आ.जयकुमार गोरे, माजी सनदी अधिकारी प्रभाकर देशमुख, माणदेशी महिला बँकेच्या अध्यक्षा चेतना सिन्हा, सागर जानकर यांनी भ्रमणध्वनीद्वारे अभिंनंदन करून पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या.

ओबीसींना काँग्रेसचे सापनाथ तर भाजपचे नागनाथ उल्लू बनवत आहेत ; रासपचे कुमार सुशील यांचे टीकास्त्र

ओबीसींना काँग्रेसचे सापनाथ तर भाजपचे नागनाथ उल्लू बनवत आहेत ; रासपचे कुमार सुशील यांचे टीकास्त्र



नवी मुंबई : ओबीसी समाजासाठी काँग्रेस, भाजप सारखे राजकीय पक्ष विषारी ठरले असून, काँग्रेसचे सापनाथ तर भाजपचे नागनाथ ओबीसी समाजाला उल्लू बनवत असल्याचे टीकास्त्र, रासपचे राष्ट्रीय महासचिव कुमार सुशील यांनी सोडले आहे. कुमार सुशील यशवंत नायक प्रतिनिधीशी बोलत होते. काल त्यांनी नवी मुंबई येथे रासपचे राष्ट्रीय अध्यक्ष एस.एल. अक्कीसागर यांची ओबीसी आरक्षण, धनगर आरक्षण आदीबाबत भेट घेतली. यावेळी महाराष्ट्र रासपचे मुख्य महासचिव बाळासाहेब दोडतले उपस्थित होते.

सन- २०११ मध्ये काँग्रेसच्या मनमोहन सिंग सरकारने जनगणना अधिनियम-१९४८ कायद्याची अंमलबजावणी न करता खासगी यंत्रणेमार्फत जनगणना करून ओबीसी समाजाला फसवले तर भाजपच्या मोदी सरकारने ओबीसी समाजाला हक्क आणि अधिकार डावलून सर्वोच्च न्यायालयात ओबीसींची आकडेवारीसह माहिती दिली नाही. परिणामी ओबिसिंचे आरक्षनास धोका निर्माण झाला. आज मात्र कॉग्रेस आणि भाजपमधील ओबिसी नेते ओबिसि समाजाला उल्लू बनवत आहेत. आम्हाला ओबीसी नेते उल्लू आहेत की ओबीसी समाज उल्लू आहे, हे कळेनासे झाले आहे. म्हणून आम्ही ओबिसीसाठी काम करणाऱ्या बिगर राजकीय लोकांना भेटणार आहोत व त्यांना आमचे समर्थन देणार आहोत. 

माजी प्रधानमंत्री स्व. व्ही. पी. सिंग यांची आज जयंती आहे. क्षत्रिय ठाकूर असणाऱ्या व्ही. पी. सिंग यांनी ओबीसींना न्याय देण्याची भूमिका घेतली, परंतु एक ओबीसी असलेल्या मोदींनी  या देशातील ओबीसींना संपवण्याचे काम केले, हे एक दुदैर्व आहे. सापनाथ आणि नागनाथ यांच्यापेक्षा मंडल आयोग लागू करून ओबीसींना न्याय देणाऱ्या स्व.व्हीं. पी. सिंग यांचे ओबीसींनी स्मरण केले पाहिजे.

उत्तर प्रदेशात भाजप सरकार मधील शिक्षण मंत्र्याचा भाऊ EWS आरक्षणातून प्राध्यापक झाला तर बंदायु विद्यापीठात १६ जगावर प्राध्यापक भरती निघाली होती, त्यात खुल्या गटाच्या ११ जागा भरून ५५ ओबीसी उमेदवारांना डावलले आहे, याला रासपने तीव्र विरोध दर्शवला आहे. चौकशीची मागणी करून न्यायाची मागणी केली आहे. लवकरच रासप राष्ट्रीय पातळीवर सत्ताधिश लोकविरुध्द जोरदार रान पेटवेल, असा इशारा कुमार सुशील यांनी दिला आहे.

परिवर्तन ही अतिशय हळुवार आणि संथ प्रक्रिया आहे त्यात घाई करून परिवर्तनाचे मार्ग बंद करू नका : आ. ह. साळुंखे



परिवर्तन ही अतिशय हळुवार आणि संथ प्रक्रिया आहे, त्यात घाई करून परिवर्तनाचे मार्ग बंद करू नका. सर्व संघटना चळवळी , त्यांच्या कार्यकर्त्यांनी घरी बसून काहीच होणारं नाही, बाहेर निघून समाजात जावं लागेल, वारंवार एकत्र बसावं लागेल, चर्चा घडवून आणाव्या लागतील. त्या चर्चांमधून, विचार मंथनातून परिवर्तनाचे विविध मार्ग आपल्याला गवसू शकतील.  प्रत्येक व्यक्ती ही स्वतंत्र आचार विचारांची आहे. देशातील प्रत्येकाला त्याचे वेगळेपण जपण्याचं स्वातंत्र्य देत सेतू बनून माणसं जोडण्याचं काम करायचं. माणसं जोडत असतांना कुणाच्या घरी जात असतांना फक्त आणि फक्त मित्र बनून जायचं , न्यायाधीश बनून जायचं नाही. कोण घरात कुणाची प्रतिमा लावतो, कुणाला पूजतो तो ज्याचा त्याचा वैयक्तिक प्रश्न आहे. आपण त्यावरुन जर त्या व्यक्तीला मोजायचं ठरवलं, बोलण्या वागण्यातून आपलं पुरोगामीत्व दाखविण्याची घाई केली तर ती व्यक्ती कायम आपल्यापासून दूर जाण्याचा धोका अधिक वाढतो. परिवर्तन ही अतिशय हळुवार आणि संथ प्रक्रिया आहे त्यात जर घाई केली तर परिवर्तनाचे मार्ग कायमचे बंद होऊन जातील. समजा एक बाप आपल्या मुलाला बोट धरून चालायला शिकवतोय , मुलगा हळू हळू आपल्या पायावर चालण्याचा प्रयत्न करतोय, तर बापाला पण त्या मुलाच्या गतीनेच चालावे लागेल. थोडाफार त्याला झेपावेल इतका वेग बाप वाढवू शकेल. पण बाप जर स्वतःच्या गतीने चालायला लागला तर मुलाला फरफटत नेईल त्याचे पाय ,बोट घासतील, कदाचित तो जखमी होईल व त्यामुळे पुन्हा चालायची हिम्मत करणार नाही. तसंच परिवर्तनाचं आहे. डॉक्टरसुद्धा आजारी व्यक्तीला लवकर बरं व्हावं म्हणून औषधाची पूर्ण बाटली प्यायला लावत नाहीत. हळूहळू शरीराला झेपेल त्या प्रमाणात औषधीचे प्रमाण देतो. 
      कुठल्याही वर्गाला जर बदलायचे आहे तर त्यांना आपलंसं करावं लागेल, म्हणजे समजा हिंदू -मुस्लिम वाद आहे तर यापैकी एका संपूर्ण गटाचे धर्मपरिवर्तन शक्य नाही, एका गटाची पूर्ण कत्तल करणे शक्य नाही, कुण्याही एक गटाला पूर्णपणे देशाच्या बाहेर हाकलून देणे शक्य नाही. किंवा पूर्णपणे कुण्या गटाला गुलाम बनविणे पण शक्य नाही. कारण कायम कुणीच कुणाचं गुलाम राहू शकत नाही आणि कायम कुणीच कुणाला गुलाम ठेऊ शकत नाही. हे चारही मार्ग अज्जिबात या विषयात कामाचे ठरू शकत नाहीत.  त्याकरिता दोन्ही गटांना सामंजस्याने एकमेकांचा स्वीकार करावा लागेल आणि परिवर्तन घडवून आणावे लागेल. 
     चार्वाकांच्या म्हणण्याप्रमाणे स्वातंत्र्य हाच मोक्ष आहे. त्यामुळे चळवळीत काम करतांना आपल्याबरोबरच सर्वांचे वैयक्तिक स्वातंत्र्य देखील जपता आले पाहिजे. 
     भगवान बुद्ध, महावीर यांनी स्वीकारलेल्या सत्य अहिंसा यांमुळे कुठल्याही धर्माचे कधीच नुकसान झाले नाही. अहिंसेचा स्वीकार केला, शस्त्र खाली टाकले म्हणून कुठलाही धर्म बुडाला नाही. नुकसानीचे मुख्य कारण समाजातील भेदभाव आहे. जातीवाद, वर्णवाद, भाषावाद, प्रांतवाद, धर्मवाद ही समाजातील वादाची-असंतोषाची मुख्य कारणे आहेत. कुणाच्या पूर्वजांनी काय केले हे उगाळत बसण्यापेक्षा नवीन पिढ्यांनी सामंजस्याची भूमिका घेऊन संघर्ष टाळला पाहिजे.
       स्त्रियांच्या भावनांचा आपण आदर केला पाहिजे त्यांचे स्वातंत्र्य जपले पाहिजे. केरांतीज्योती सावित्रीमाईंना महात्मा जोतिबा फुले यांनी अनुभव घेऊ दिला, क्रांतीज्योती सावित्रीमाईंनी त्यावेळी आपल्या कपड्यांवर डाग सहन केले, म्हणून आज आपण डाग नसलेले कपडे घालू शकतोय हे पण आपण विसरता कामा नये. जबरदस्तीने परिवर्तनाचा प्रयत्न नकोय.  त्यांना योग्य मार्ग दाखवून, योग्य ज्ञान पुरवून त्यांच्या स्वतःच्या अनुभवातून त्यांना शिकू दिलं पाहिजे. म्हणजे त्या आपल्या मतावर ठाम असतील. एकच तर्क-मांडणी सर्वांमध्ये सारखं परिवर्तन घडवून आणेल असं होत नाही. वेगवेगळे तर्क-वितर्क, प्रक्रिया आपल्याला राबवावे लागतील. त्यासाठी संयम, जिद्द, चिकाटी कायम ठेवावी लागेल. आणि सर्वात महत्वाचं म्हणजे जर खरंच आपल्याला समाजात परिवर्तन घावायच असेल तर परिवर्तनाचा मार्ग हा हृदयाकडून मस्तकाकडे जाणारा असावा....!
- डाॅ. आ. ह. साळुंखे.

Monday, June 21, 2021

ओबीसी राजकारण्यांनो! आंदोलनाची नवटंकी बंद करा व राजीनामे द्या! ....

ओबीसी राजकारण्यांनो! आंदोलनाची नवटंकी बंद करा व राजीनामे द्या! ....



ओबीसी महासभेचे अध्यक्ष गोरख आखाडेंचे आव्हान!

नाशिक :  ओबीसींचे राजकीय आरक्षण संपूष्टात आले, प्रमोशनमधील आरक्षण महाराष्ट्र शासनाने काढून घेतले, ओबीसींच्या महाज्योतीचे 125 कोटी रूपये परत गेलेत, असे असंख्य अन्याय ओबीसी समाजावर होत असतांना राजकीय नेते मात्र थातू-मातूर चार-चौघांचे आंदोलन करून आपले नेतृत्व व खूर्ची टिकवून ठेवण्यात मग्न आहेत. ओबीसींसाठी डॉ. बाबासाहेब आंबेडकर व व्ही.पी. सिंग यांनी खूर्ची सोडली, तशी हिम्मत ओबीसी नेत्यांमध्ये का येत नाही? नवटंकी सोडा व राजीनामे द्या, असे आवाहन ओबीसी महासभेचे जिल्हाध्यक्ष गोरख आखाडे यांनी ओबीसी नेत्यांना केले आहे. ते ओबीसींच्या सभेत बोलत होते.

    ओबीसी महासभेचे अहमदनगर जिल्हाध्यक्ष सुर्यभान गोरे म्हणाले की, सर्वच राजकीय पक्षाचे ओबीसी नेते हे व्यक्तिगत स्वार्थासाठी पक्षांचे गुलाम झालेले आहेत. आंदोलने करणे हे आमच्यासारख्या कार्यकर्त्यांचे काम आहे, तुम्ही नेते आहात, मंत्री आहात तर पक्षाच्या बैठकीत बोललं पाहिजे, मंत्रीमंडळाच्या बैठकीत ओबीसींच्या हिताचे ठराव मंजूर करून घेतले पाहिजे. रस्त्यावर उतरून आंदोलनाची नाटके करून ओबीसींची दिशाभूल करू नका. मंत्रीमंडळात राहून ओबीसींचे भले करू शकत नसाल तर, मंत्रीपदाला का चिकटून राहता, भ्रष्टाचार करून करोडपती बनण्यासाठी?, असा संतप्त सवालही गोरे यांनी केला.

    त्यानंतर ओबीसी विचारवंत प्रा. श्रावण देवरे यांनी ओबीसी चळवळीचा इतिहास सांगीतला. आरक्षण मिळविण्यासाठी किती ओबीसींनी त्याग व बलीदान केले आहे, याची सविस्तर माहीती देवरे यांनी दिली. ओबीसींनी त्यागाने व कष्टाने मिळविलेले आरक्षण आजच्या नालायक ओबीसी नेत्यांमुळे नष्ट होत असल्याबद्दल खंत व्यक्त करण्यात आली.

    संघटनेचे विभागीय अध्यक्ष गौरव सोनार यांनी ओबीसींच्या मागण्या पूर्ण न केल्यास तीव्र आंदोलनाचा इशारा शासनाला दिला. जिल्ह्याच्या महिला अध्यक्ष *विद्याताई घायतड* यांनी ओबीसी महिलांसाठी वेगळ्या रक्षणाची मागणी केली. राजेंद्र वर्मा, ज्ञानेश्वर शिरसाठ, शशिकांत घुगे, भरत सुर्यवंशी, डॉ. संजय उन्हवणे, संगिता पोतदार, हेमंत शिंदे, बडगुजर व घायतड काका आदि मान्यवरांनी आपली मनोगते व्यक्त केलीत. महासभेच्या जिल्हा शाखेतर्फे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर *धरणे आंदोलन* आयोजित करण्याचा निर्णय एकमताने घेण्यात आला.

चागंले संस्कार टिकविण्यासाठी वाचन संस्कृतीची गरज : डॉ. शंकर स्वामी वडेपुरीकर

चागंले संस्कार टिकविण्यासाठी वाचन संस्कृतीची गरज : डॉ. शंकर स्वामी वडेपुरीकर ‌पु.अहिल्यादेवी वाचनालयात " वाचन संकल्प महाराष्ट्राचा...