समतामूलक समाजाची निर्मिती करणारे राजे छत्रपती शिवरायाद्वारे स्वराज्य स्थापणाऱ्या राजमाता जिजाई, एका हातात शस्त्र आणि दुसऱ्या हातात शास्त्र घेऊन भारताच्या विशाल प्रदेशावर २८ वर्षे आदर्श राज्यकारभार करणाऱ्या पहिल्या महिला राज्यकर्त्या महाराणी अहिल्याई होळकर, आधुनिक भारताच्या इतिहासात 'स्त्री-शिक्षणा'साठी आयुष्य वेचणाऱ्या पहिल्या भारतीय महिला शिक्षीका सवित्रीमाई फुले, पहिल्या भारतीय महिला डॉक्टर रखमाबाई राऊत, पहिल्या महिला प्रधानमंत्री म्हणून ठसा उमटवणाऱ्या इंदिरा गांधी, पहिल्या महिला राष्ट्रपती प्रतिभाताई पाटील, एव्हरिस्ट सर करणाऱ्या पहिल्या भारतीय महिला बच्छेंद्री पाल, रमाई आंबेडकर, महाराणी ताराबाई तसेच कन्याकुमारीपासून कारगिलपर्यंत आणि पणजीपासून गुवाहाटी पर्यंत या भारत देशाच्या वैभवात अतुलनीय योगदान देणाऱ्या ज्ञात अज्ञात अशा सर्वच माता भगिनिंना जागतिक महिला दिनानिमित्त वंदन करुन त्यांच्या स्मृतीस अभिवादन करतो व तुम्हालाही शुभेच्छ्या व्यक्त करतो.
महिलांनी स्वतःच्या हक्कासाठी दिलेल्या लढ्याच्या स्मरणार्थ दरवर्षी, ८ मार्च हा दिवस जागतिक महिला दिन म्हणून साजरा करण्यात येतो. दि. २८ फेब्रुवारी १९०९ रोजी, न्यूयॉर्क येथे पहिला महिला दिन साजरा करण्यात आला असला तरीही, सन १९१० च्या आंतरराष्ट्रीय महिला परिषेदत मांडलेल्या सुचनेनुसार, ८ मार्च हा दिवस आंतरराष्ट्रीय महिला दिन म्हणून निश्चित करण्यात आला.
भारतात मुंबई येथे पहिला ८ मार्च हा महिला दिवस १९४३ साली साजरा झाला. १९७१ सालच्या ८ मार्चला पुण्यात एक मोठा मोर्चा काढण्यात आला होता. पुढे १९७५ हे वर्ष युनोने 'जागतिक महिला वर्ष' म्हणून जाहीर केले. त्यानंतर स्त्रियांच्या समस्या ठळकपणे समाजासमोर येत गेल्या. स्त्रियांच्या संघटनांना बळकटी आली. बदलत्या सामाजिक, आर्थिक, राजकीय, सांस्कृतिक परिस्थितीनुसार काही प्रश्नांचे स्वरूप बदलत गेले तशा स्त्री संघटनांच्या मागण्याही बदलत गेल्या. आता बँका, कार्यालयांमधूनही ८ मार्च साजरा व्हायला लागला आहे. आजच्या काळात जागतिक महिला दिन सर्वत्र साजरा करताना दिसून येतो.
१९७५ या जागतिक महिला वर्षाच्या निमित्ताने संयुक्त राष्ट्र संघटनेने आंतरराष्ट्रीय महिला दिन साजरा करण्याचे ठरविले. १९७७ साली संयुक्त राष्ट्र संघटनेच्या समितीने विविध सदस्यांना आमंत्रित करून ८ मार्च हा आंतरराष्ट्रीय स्तरावर महिलांचे अधिकार आणि जागतिक शांतता या हेतून साजरा करवा यासाठी आवाहन केले. आज विविध कार्यक्रमद्वारे जगाच्या कानाकोपऱ्यात महिला दिन साजरा होत आहे.
No comments:
Post a Comment