Saturday, July 19, 2025

राज्यातील सरकार भांडवलदारांचे सरकार, सोन्याचा चमचा घेऊन आलेले सरकार जास्त काळ टिकत नाही : महादेव जानकर

राज्यातील सरकार भांडवलदारांचे सरकार, सोन्याचा चमचा घेऊन आलेले सरकार जास्त काळ टिकत नाही : महादेव जानकर 

मुंबई : नाव गरीबांचे घ्यायचे आणि काम श्रीमंतांचे करायचे हे सरकारचे धोरण आहे, राज्यातील सरकार भांडवलदारांचे सरकार आहे. सोन्याचा चमचा घेऊन आलेले सरकार जास्त काळ टिकत नाही, अशा शब्दात राष्ट्रीय समाज पक्षाचे संस्थापक राष्ट्रीय अध्यक्ष महादेव जानकर यांनी राज्य सरकारला फटकारले. श्री. महादेव जानकर यांनी प्रसारमाध्यमांशी आपली भूमिका स्पष्ट केली.

श्री. मराठीच्या मुद्द्यावरून जानकर म्हणाले, आपल्याला सर्व भाषा आल्या पाहिजेत, या मताचा राष्ट्रीय समाज पक्ष आहे. जगात फिरण्यासाठी इंग्लिश आले पाहिजे. देशाचे राजकारण करण्यासाठी, दिल्लीवर सत्ता करायची असेल तर आपल्याला हिंदी आली पाहिजे. प्राथमिक शिक्षण नंतर हिंदी आणि इंग्रजी भाषा अभ्यासक्रमात असावी. न्यायालयात सर्व निवाडे मराठीतून नाहीत तर इंग्लिश मधून आहेत. जागतिक स्पर्धेत आपली मुले टिकली पाहिजेत, ही रासपची भूमिका आहे.

शेतकऱ्यांच्या प्रश्नावरून जानकर म्हणाले, शेतकऱ्यांना दिलेला वादा सरकारने पुरा करावा. मोठमोठ्या उद्योगपतींना बिल्डरला पैसे द्यायला आहेत. शेतकऱ्याला द्यायला नाहीत. हे सरकार भांडवलदारांचे सरकार आहे. नाव घ्यायचे गरीबांचे, काम श्रीमंतांचे करायचे हे सरकारचे धोरण आहे. यावर जनतेने विचार करावा. एमपीएससी आणि युपीएससी करणारे विद्यार्थी परेशान आहेत. कंत्राटदारांचे पैसे दिलेले नाहीत. सर्वांना परेशान करून ठेवलेले आहे, वरून दाखवतात सर्व चांगले चालले आहे, पण असे काही नाही. आम्ही बांधावर फिरणारे कार्यकर्ते आहोत, त्यामुळे जनतेत फार आक्रोश निर्माण झालेला आहे. जनतेच्या असंतोषाला वाट करून देणे आमचे काम आहे. शेतकरी शक्तिपीठ नको, म्हणतात तर ते कॅबिनेटमध्ये पास केला, हे कितपत अन्याय करणार आहेत. मनी, मिडिया आणि माफिया यांच्या जोरावर चालले आहे. सोन्याचा चमचा घेऊन आलेले सरकार जास्त काळ टिकत नसते. महाराष्ट्र ही फुले, शाहू, आंबेडकर यांची भूमी आहे. निश्चितपणे उद्रेक झाल्याशिवाय राहणार नाहीत. विद्यमान सरकारच्या विरोधात लढणार आहे.

रासपच्या प्रदेश मध्यवर्ती कार्यालयाला राष्ट्रीय संघटक बाळकृष्ण लेंगरे यांची सदिच्छा भेट

रासपच्या प्रदेश मध्यवर्ती कार्यालयाला राष्ट्रीय संघटक बाळकृष्ण लेंगरे यांची सदिच्छा भेट


पुणे (२/७/२५) : राष्ट्रीय समाज पक्षाचे राष्ट्रीय संघटक इंजिनिअर बाळकृष्ण लेंगरे मामा यांनी येथील पक्षाच्या प्रदेश मध्यवर्ती कार्यालयाला सदिच्छा भेट दिली. या भेटी दरम्यान पक्षाच्या कार्यपद्धतीबाबत चर्चा झाली, तसेच आगामी संघटनात्मक कार्यक्रमांची रूपरेषा देखील ठरविण्यात आली.

या भेटीमुळे राष्ट्रीय समाज पक्षाच्या पदाधिकाऱ्यामध्ये नवीन ऊर्जा निर्माण झाली असून, राष्ट्रीय संघटक म्हणून लेंगरे मामा यांचा अनुभव आणि मार्गदर्शन हे पक्षाच्या भविष्यकालीन वाटचालीस निश्चितच लाभदायक ठरणार आहे. यावेळी ज्येष्ठ नेते बाळासाहेब कोकरे, राज्य सरचिटणीस अजित पाटील, लक्ष्मण ठोंबरे, कालिदास गाढवे, एड. संजय माने - पाटील उपस्थित होते.

मध्य प्रदेश रासप प्रधानसचिपदी अशोक सिंह बघेल यांची नियुक्ती

मध्य प्रदेश रासप प्रधानसचिपदी अशोक सिंह बघेल यांची नियुक्ती 

भोपाळ (१६/७/२०२५) : राष्ट्रीय समाज पक्ष मध्य प्रदेश राज्य प्रधान सचिवपदी अशोकसिंह बघेल यांची नियुक्ती केल्याचे, यशवंत नायकशी प्रदेश प्रभारी प्राणसिंह पाल यांनी सांगितले. अशोक सिंह बघेल हे भिंड जिल्ह्याचे रहिवाशी आहेत. राष्ट्रीय समाज पक्षात प्रवेश करण्यापूर्वी श्री. बघेल हे आर्थिक समानता पार्टीचे राष्ट्रीय अध्यक्ष होते. राज्याच्या राजकारणात ते सक्रीय होते. महादेव जानकर यांच्या नेतृत्वाखाली अशोक सिंह बघेल यांनी राष्ट्रीय समाज पक्षात प्रवेश केल्यानंतर त्यांचे राष्ट्रीय महासचिव कुमार सुशील, प्रदेश अध्यक्ष श्रीलाल बघेल, प्रदेश उपाध्यक्ष डी. एस. चौहान, प्रदेश सचिव मोहर सिंह केवट, बादाम सिंह बघेल, ग्वाल्हेर लोकसभा प्रभारी रणवीरसिंह चौहान, मिठ्ठनलाल वंशकार, रामकृष्ण विश्वकर्मा, हकिमसिंह रावत, मोहब्बत सिंह पाल, सोनू पुरोहित, प्रकाशसिंह बघेल, केपी  परिहार, अनिश रघुवंशी, प्रताप बघेल,   ज्ञानसिंह पाल, डॉक्टर मुकेश कोहली, ब्रिजेश प्रजापती, धर्मेंद्र कुशवाहा रवी रजक आदी पदाधिकारी कार्यकर्ते यांनी अभिनंदन केले.

बहुजनांच्या चळवळी उध्वस्त करण्याचा प्रयत्न : महादेव जानकर

बहुजनांच्या चळवळी उध्वस्त करण्याचा प्रयत्न : महादेव जानकर 

मोहोळ (१५/७/२५) : बहुजनांच्या चळवळी व राजकीय पक्ष, संघटना आणि आरक्षण उध्वस्त करण्याचा जोरदार प्रयत्न भारतीय जनता पार्टी करत असल्याचे वक्तव्य राष्ट्रीय समाज पक्षाचे संस्थापक/राष्ट्रीय अध्यक्ष महादेव जानकर माजी मंत्री यांनी काढले. मोहोळ तालुक्यातील मलिकपेठ येथील कार्यकर्ते सुरेश आवारे व ग्रामस्थांच्या भेटीप्रसंगी ते बोलत होते. 

गावातील ग्रामस्थांनी राजमाता अहिल्यादेवी होळकर चौकामध्ये महादेव जानकर यांचा सत्कार केला. तसेच ग्रामपंचायत सदस्य विद्या कसबे यांनी सत्कार केला. राष्ट्रीय समाज पक्षाचे महासचिव ज्ञानेश्वर सलगर, रिपाइंचे महाराष्ट्र उपाध्यक्ष हनुमंत कसबे, पश्चिम महाराष्ट्र अध्यक्ष किरण गोफणे, जिल्हाध्यक्ष विकास आलदर, जिल्हा उपाध्यक्ष परमेश्वर पुजारी, जिल्हा सचिव नागेश हजारे, माजी सरपंच तानाजी माळी, बलभीम आवारे, नवनाथ आवारे, महादेव आवारे, डॉक्टर स्वप्नील आवारे, रवी हजारे, दीपक शिंदे, राजु चेंडगे, अमोल चवरे, समाधान काळे, बीरू आवारे, बापू आवारे, तायाप्पा वाघमोडे, सुभाष कसबे, शिवरत्न आवारे, सुशांत आवारे आदी ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.

प्राथमिक शिक्षण मातृभाषेतूनच व्हावे; महादेव जानकर यांनी ठाकरे बंधूंना भरवले पेढे

प्राथमिक शिक्षण मातृभाषेतूनच व्हावे; महादेव जानकर यांनी ठाकरे बंधूंना भरवले पेढे 




मुंबई (५/७/२५) : वरळी येथे शिवसेना उबाठा पक्षाचे अध्यक्ष उद्धव ठाकरे आणि मनसे प्रमुख राज ठाकरे अनेक संघर्षांनंतर एकत्र आल्याचे पहायला मिळाले. याचा आनंद म्हणून राष्ट्रीय समाज पक्षाचे संस्थापक राष्ट्रीय अध्यक्ष महादेव जानकर यांनी दोन्ही ठाकरे बंधूंना व महाराष्ट्रातील नेत्यांना पेढे भरवून त्यांचे स्वागत केले. राज्य सरकारने महाराष्ट्रात त्रिभाषा वरून काढलेल्या जीआरमुळे मोठा संभ्रम निर्माण झाला होता. राज्यातून मोठा विरोध झाल्यावर सरकारने तो जीआर रद्द केला. ठाकरे बंधूंनी पक्ष झेंडा विरहीत विजयी मेळाव्याचे आयोजन करत, राज्यातील सर्व विरोधी पक्षांनी एकत्र यावे, असे आवाहन केले होते. रासपलाही आमंत्रण दिले होते. महादेव जानकर यांनी उपस्थित राहून खास पाठिंबा दिला. प्राथमिक शिक्षण मातृभाषेतून व्हावे, देशावर राज्य करायचे असेल तर हिंदी शिकले पाहिजे, जगातील ज्ञान मिळवायचे असेल तर बहुभाषा आत्मसात केल्या पाहिजेत, असे महादेव जानकर यांनी स्पष्ट केले. उद्धव ठाकरे व राज ठाकरे यांनी महादेव जानकर यांचा आवर्जून उल्लेख करत आभार मानले. "इथे महादेवराव बसलेत, महादेवराव जानकर यांना खूप दिवसांनी पाहतोय. काहीवेळेला जानकर भी अंजान होते" असे हसतमुखातून उद्धव ठाकरे यांनी उदगार काढले.

मेळाव्यात शेकापचे जयंत पाटील, राष्ट्रवादी शरद पवार पक्षाचे खा. सुप्रिया सुळे, आ. जितेंद्र आव्हाड, भालचंद्र कांगो, कॉ. अजित नवले आदी उपस्थित होते.

Friday, July 18, 2025

धनगर समाजातील गरीब विद्यार्थ्यांच्या शिक्षण योजनांचा गैरवापर; भ्रष्ट शिक्षण संस्थाचा कारभार चव्हाट्यावर

धनगर समाजातील गरीब विद्यार्थ्यांच्या शिक्षण योजनांचा गैरवापर; भ्रष्ट शिक्षण संस्थाचा कारभार चव्हाट्यावर 



विद्यार्थ्यांच्या टाळूवरचे लोणी खाणारा भाजप कार्यकर्ता ; रासपच्या जिल्हाध्यक्षांचा घणाघाती आरोप


मुंबई (११/७/२५) :  राष्ट्रीय समाज पक्षाचे संस्थापक /राष्ट्रीय अध्यक्ष महादेव जानकर यांनी मंत्री असताना धनगर समाजासाठी आणलेल्या १३ योजनांपैकी एक असणाऱ्या गरीब मुलामुलींना इंग्रजी माध्यमातून देण्यात येत असलेल्या शिक्षण योजनांचा गैरवापर झाला आहे. यामुळे राष्ट्रीय समाज पक्षाचे राज्य सरचिटणीस अजित पाटील यांनी नाराजी व्यक्त करून सर्व प्रकरणाची चौकशी करून दोषींवर कठोर कारवाई करण्याची मागणी केली आहे.

रासपचे सर्वेसर्वा महादेव जानकर यांनी मंत्री काळात केलेल्या विशेष प्रयत्नामुळे, धनगर समाजातील गोरगरीब विद्यार्थ्यांसाठी राज्य सरकारच्या माध्यमातून विविध योजना राबवल्या जातात. अर्थसंकल्पीय अधिवेशनात 'धनगर समाजाच्या योजनांना निधी दिला जात नसल्याबद्दल,  सभागृहात महादेव जानकर यांनी आवाज उठवला होता. राज्य सरकार केवळ आश्वासन देऊन निधी देत नसल्याचे सभागृहाचे लक्ष वेधले होते." प्रत्यक्षात मात्र छत्रपती संभाजीनगर, बीड, जालना जिल्ह्यातील शिक्षण संस्थानी गोरगरीब धनगर मुलांच्यासाठी असलेल्या निधीवर डल्ला मारल्याचे उजेडात येत आहे. हा प्रकार केवळ मराठवाड्यात नसून राज्यभर हा घोटाळा झाल्याचा संशय धनगर समाजातील कार्यकर्त्यांकडून व्यक्त केला जात आहे.

विद्यार्थ्यांना नामांकित इंग्रजी शाळांमध्ये प्रवेश, वसतीगृह, भोजन, शैक्षणिक साहित्य अशा सुविधा देण्याचा हेतू होता. रासपचे अजित पाटील म्हणाले, ही योजना सुरुवातीला तत्कालीन मंत्री महादेव जानकर साहेबांच्या पुढाकाराने, राजे यशवंतराव होळकर यांच्या नावाने सुरू करण्यात आली. समाजातील हुशार पण दुर्लक्षित विद्यार्थ्यांना मुख्य प्रवाहात आणणं हा त्यामागचा हेतू होता. पण आता हाच हेतू बाजूला पडतोय... आणि राज्य सरकारच्या आशीर्वादाने भ्रष्टाचार पुढे येतोय. काही ठिकाणी शाळा, संस्था आणि वसतीगृह चालकांकडून या योजनेचा गैरवापर होत असल्याचा गंभीर प्रकार वृत्त वाहिन्यांमधून, सामाजिक कार्यकर्त्यांनी केलेल्या पाहणीतून समोर आल्यानंतर एकच खळबळ उडाली आहे.

श्री. पाटील पुढे म्हणाले, कागदोपत्री विद्यार्थी दाखवून कोट्यवधींचं अनुदान उचललं जातंय. नाव, शाळा, वसतीगृह फक्त कागदावर – प्रत्यक्षात विद्यार्थीच नाहीत. धनगर समाजाच्या डोळ्यात धूळ टाकून तसेच सरकारची फसवणूक करून ही योजना भ्रष्टाचाराचं कुरण बनवली गेली आहे. बहुजन कल्याण विभाग काय करतंय? जबाबदार अधिकाऱ्यांवर कोणती कारवाई? तपास, ऑडिट किंवा चौकशी कुठे आहे? गरजू विद्यार्थी आणि त्यांच्या पालकांना न्याय मिळतोय का? या प्रश्नांची उत्तरं मिळत नसल्यामुळे अनेकांना वाटतंय की सरकारच्या कामकाजालाच भावपूर्ण श्रद्धांजली द्यावी लागेल, अशी संतप्त प्रतिक्रिया दिली आहे.

आज लाभ कोणाला? ठराविक नेत्यांना! शिक्षणाचं नाव घेऊन पैसे कमवणाऱ्यांना! आणि ज्यांचं शिक्षण खरंच मोडतंय – त्या मुलांना काय? ही बाब समाजासमोर आणणं आवश्यक आहे. ही योजना महादेव जानकर साहेबांच्या सकारात्मक संकल्पनेतून सुरू झाली होती, पण आज तिचं रूपांतर अनियंत्रित भ्रष्टाचारात झालं आहे. या प्रकारांची सखोल चौकशी झालीच पाहिजे, असे पाटील यांनी म्हटले आहे.



धनगर समाजाच्या विद्यार्थ्यांच्या टाळूवरचे लोणी खाणारा भाजप कार्यकर्ता असल्याचा, घणाघाती आरोप राष्ट्रीय समाज पक्षाचे छत्रपती संभाजीनगरचे जिल्हाध्यक्ष रमेश काटकर यांनी केला आहे.

Tuesday, July 15, 2025

रासपच्या कर्नाटक युवती प्रदेशाध्यक्षपदी डॉ. रेणुका होराकेरी यांची नियुक्ती

रासपच्या कर्नाटक युवती प्रदेशाध्यक्षपदी डॉ. रेणुका होराकेरी यांची नियुक्ती

मुंबई (१५/७/२०२५) : राष्ट्रीय समाज पक्ष कर्नाटक युवती प्रदेशाध्यक्षपदी बंगळुरू येथील डॉ. रेणुका होराकेरी यांची नियुक्ती करण्यात आली आहे, अशी माहिती राष्ट्रीय समाज पक्षाचे कर्नाटक राज्य प्रभारी शिवलिंगप्पा जोगीन यांनी दिली. डॉ. रेणुका यांच्या निवडीचे नियुक्तीपत्र श्री. जोगीन यांनी प्रसिद्धीस दिले आहे. त्यांच्या निवडीबद्दल राष्ट्रीय समाज पक्षाचे संस्थापक राष्ट्रीय अध्यक्ष महादेव जानकर यांनी अभिनंदन केले आहे.

डॉ. रेणुका होराकेरी या सामाजिक कार्यात नेहमी अग्रेसर असतात, त्यांना "ब्यूटी विथ अ ब्रेव्ह हार्ट" म्हणून ओळखले जाते. त्या मिसेस इंडिया २०२० च्या उपविजेत्या आहेत. डॉ. रेणुका यांनी राजाजीनगर येथील एमईआय पॉलिटेक्निकमधून मेकॅनिकल इंजिनिअरिंग पूर्ण केले. त्यांना महिला अचिव्हर्स पुरस्कार, वॉरियर्स पुरस्कार, कर्नाटक हेम्मे पुरस्कार, बंगळुरू महिला शक्ती पुरस्कार, श्री विश्वेश्वरय्या पुरस्कार, इंडियन आयकॉन पुरस्कार, चिन्नाडा बेटे सीझन २ (कस्तुरी वाहिनी) येथे सुवर्ण आदि पुरस्कारांनी सन्मानित केले आहे. 

डॉ. रेणुका होराकेरी यांची युवती प्रदेशाध्यक्षपदी नियुक्ती झाल्याने त्यांची राष्ट्रीय समाज पक्षातून राजकीय कारकिर्दीस प्रारंभ झाला आहे. भारतात महिलांची संख्या मोठी आहे. राष्ट्रीय समाज पक्ष हा पहिल्या भारतीय महिला राज्यकर्त्या महाराणी अहिल्याबाई होळकर यांच्या सर्वजण कल्याणकारी राज्यकारभाराचा आदर्शवाद घेऊन चालणारा पक्ष आहे. डॉ. होराकेरी यांना राष्ट्रीय समाज पक्षात काम करण्याची मोठी संधी दिली आहे, त्या कशा पद्धतीने काम करतात हे आगामी काळात स्पष्ट होईल.

रासपाचे लढाऊ नेते सुनीलदादा बंडगर यांचे निधन; राष्ट्रीय समाज पक्षात शोककळा

रासपाचे लढाऊ नेते सुनीलदादा बंडगर यांचे निधन; राष्ट्रीय समाज पक्षात शोककळा 


14/7/2025 : रासपाचे लढाऊ नेते सुनीलदादा बंडगर यांचे निधन; राष्ट्रीय समाज पक्षात शोककळा 

राष्ट्रीय समाज पक्षाचे महाराष्ट्र राज्य सचिव तसेच उत्तर कर्नाटक प्रभारी सुनीलदादा बंडगर यांचे आज पहाटे पुणे येथे हृदयविकाराच्या झटक्याने निधन झाले. सुनिलदादा फार घाई केलीत. तुमच्या अकाली निधनाने कुटुंबाचे, राष्ट्रीय समाज पक्षाचे फार मोठे नुकसान झाले. दादा तुम्ही पक्षाचे धडाडीचे कार्यकर्ते नेते होता. दादा तुम्ही आम्हाला असं अचानकपणे जाऊन आम्हाला पोरंक करून गेलात, अशी भावना कार्यकर्त्यात आहे. बांधकाम कामगार ते बिल्डर व रासप कार्यकर्ते ते प्रदेश सचिव असा तुमचा प्रवास पक्षाची शिस्त राखणारा कार्यकर्ता हे दाखवून देते. बारामती लोकसभा मतदारसंघात पक्षाचे राष्ट्रीय नेते महादेव जानकर यांना इंदापूर विधानसभा मतदारसंघात कमी मते मिळाल्याची जबाबदारी घेऊन आपण आपल्या पदाचा राजीनामा द्यायची घेतलेली भूमिका आठवतेय. पक्ष तळागाळात रुजत असताना जानकर साहेबांच्या नावाने एमजे पार्क नाव दिल्याचे जुना रासप कार्यकर्ता सांगत होता. आदरणीय दादा तुम्हाच्या सारखं व्यक्तीमत्व, नेतृत्व पुन्हा होणार नाही. तुमची आठवण पावलोपावली नेहमीच जाणवत राहील..!तुमच्या पश्चात राष्ट्रिय समाज पक्षाला नेहमी उणीव भासेल. दादांच्या निधनाचे वृत्त समजताच राज्यभरात राष्ट्रीय समाज पक्षात शोककळा पसरली. (दिनांक १४ जुलै) त्यांच्यावर अक्कलकोट मधील मैदर्गी येथे अत्यसंस्कार करण्यात आले. मा. महादेव जानकर यांनी एका अत्यंत भावनिक आणि कृतज्ञतेने भरलेल्या प्रसंगी त्यांच्या पार्थिवास राष्ट्रीय समाज पक्षाचा झेंडा ठेवून दादांना अभिवादन केलं. दादांची शेवटची इच्छा होती की, "मी मरताना माझ्या प्रेतावर राष्ट्रीय समाज पक्षाचा झेंडा घाला," आणि ती इच्छा जानकर साहेबांनी अत्यंत आदरपूर्वक पूर्ण केली. ही कृती केवळ एका कार्यकर्त्याच्या श्रद्धेचे नव्हे, तर संपूर्ण पक्षाच्या मूल्यांप्रती असलेल्या निष्ठेचे प्रतीक आहे. पक्षासाठी आयुष्यभर झगडलेल्या व्यक्तीच्या कार्याचा आणि त्याच्या भावना, श्रद्धेचा मान राखला गेला.

सोलापूर विद्यापीठास पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांचे नाव देण्यासाठी मा. महादेव जानकर साहेब यांच्या नेतृत्वात राष्ट्रीय समाज पक्षाचा पहिला वाजत गाजत भव्य मोर्चा काढणारा लढवय्या नेता सुनीलदादा होते. अकोला येथे झालेल्या राष्ट्रीय समाज पक्ष वर्धापन दिनानिमित्त कार्यक्रमात स्वाभिमानी बंडखोर खणखणीत आवाजात स्वाभिमानाने भाषण देणारे, त्याप्रमाणे महाराष्ट्रात 2024 च्या विधानसभा निवडणुकीत अक्कलकोट मतदारक्षेत्रात एकाकी झुंज देणारे नेते सुनीलदादा बंडगर यांच्या निधनाचे वृत्त पाहून अत्यंत दुःख झाले.

2009 च्या सार्वत्रिक विधानसभा निवडणुकीत गृहराज्यमंत्र्याच्या विरोधात दंड थोपटणारा नेता म्हणून सुनील दादानी दाखवून दिले. राष्ट्रीय समाज पक्षाचे अस्तित्व दाखवण्यासाठी लढणारा नेता, राष्ट्रीय समाज पक्षाचे संस्थापक राष्ट्रीय अध्यक्ष महादेव जानकर यांच्यावर जिवापाड प्रेम करणारा नेता, तसेच  जानकर साहेब यांचा आदेश प्रमाण मानून एकनिष्टने काम करणारा कार्यकर्ता नेता, समाजकारण राजकारणात गुळगुळीत भूमिका न घेता रोखठोक सडेतोड भूमिका घेणारा नेता म्हणजे सुनीलदादादा बंडगर, 2019 च्या विधानसभा निवडणुकीत आपले दैवत असणारे नेते महादेव जानकर यांना विश्वासाने दगा देणाऱ्या भाजप पक्षाचा खरपूस समाचार घेऊन जशास तसे उत्तर देणारा नेता सुनीलदादा बंडगर होते.

विधानसभा निवडणुकीत माघार घ्यावी, यासाठी दादांना आर्थिक प्रलोभने दाखवली गेली, पण त्या सर्वांना धुडकावून लावत रणमैदानात स्वतंत्र राष्ट्रीय समाज पक्षाचा विचार घेऊन बाणेदारपणे लढत देत, समाजासाठी झटणारा मी कार्यकर्ता आहे, असे त्यांनी ठणकावून सांगितले. देशपातळीवर सुनीलदादांचं नाव चर्चिले गेले. ऐन विधानसभा निवडणुकीत राष्ट्रीय समाज पक्षाचे पदाधिकारी/कार्यकर्ते संदिग्ध भूमिकेत असताना जानकर साहेब यांच्यावर विश्वास ठेवून सुनीलदादानी निःसंदिग्धपणे अक्कोलकोट विधानभक्षेत्रात राष्ट्रीय समाज पक्ष तर्फे रणशिंग फुंकले. सुनील दादा बंडगर यांनी चांगली लढत दिली, असे सांगितले गेले, तसे राष्ट्रीय समाज पक्षात राज्य व राष्ट्रीय पातळीवर   बोलले जात होते. सुनीलदादा बंडगर हे अठरापगड समाजातील समाजघटकांना सोबत घेऊन काम करत होते. सुनिलदादा यांचा राजकारणात दबदबा वाढत होता. कामगार, शेतकरी, विद्यार्थी, महिला, शेतमजुर यांच्या प्रश्नावर सुनीलदादा बंडगर सातत्याने आवाज उठवत होते.  सर्वसामान्यांना त्यांचा मोठा आधार होता. राष्ट्रीय समाज पक्षात ऊर्जा निर्माण करण्याचे कार्य त्यांच्याकडून होत होते. प्रस्थापित पक्षाच्या वळचणीला न जाता, छोट्या मोठ्या सत्तेला भीक न घालता, सत्व आणि सत्याच्या मार्गाने चालणाऱ्या राष्ट्रीय समाज पक्षात राहून संघर्षची भूमिका घेऊन शेवटच्या क्षणापर्यंत लढत राहिले. राष्ट्रीय समाज पक्ष त्यांची आठवण कायम काढत राहील.

सुनीलदादा बंडगर यांच्या निधनाबद्दल राष्ट्रीय समाज पक्षाचे संस्थापक राष्ट्रीय अध्यक्ष महादेव जानकर, रासेफ राष्ट्रीय अध्यक्ष एस एल अक्कीसागर, कर्नाटक राज्य प्रभारी शिवलिंगप्पा जोगीन यांनी यशवंत नायक जवळ शोक व्यक्त केला आहे. सुनीलदादा यांचे अकाली निधनाने राष्ट्रीय समाज पक्षाचे मोठे नुकसान झाले आहे. त्यांच्या कुटुंबियांना, राष्ट्रीय समाज पक्ष परिवार कार्यकर्त्यांना दुःख पचविण्याची शक्ती परमेश्वराने द्यावी, हीच ईश्वरचरणी प्रार्थना.  त्यांच्या स्मृतीस यशवंत नायक परिवार तर्फे भावपुर्ण श्रद्धांजली....!

  - आबासो पुकळे, मुंबई.


-

Sunday, July 13, 2025

शेतकऱ्यांची कर्जमाफी करा; राज्यभर राष्ट्रीय समाज पक्षाचे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर धरणे आंदोलन

शेतकऱ्यांची कर्जमाफी करा; राज्यभर राष्ट्रीय समाज पक्षाचे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर धरणे आंदोलन 


मुंबई (२३/६/२०२५) : शेतकरी कर्जमाफी व सातबारा कोरा करा या मागण्यांचे राज्यातील तहसीलदार यांना निवेदन दिल्यानंतर आज सकाळी 11 वाजलेपासून राज्यातील जिल्हाधिकारी कार्यालयासमोर राष्ट्रीय समाज पक्षाचे पदाधिकारी, कार्यकर्ते यांनी धरणे आंदोलन करून शेतकऱ्यांची सरसकट कर्जमाफी झाली पाहिजे, शेतकऱ्यांच्या पिकाला हमीभाव मिळाला पाहिजे, सातबारा कोरा करा, अशा मागण्यासाठी राज्यभर राष्ट्रीय समाज पक्षाचे कार्यकर्त्यांनी घोषणाबाजी केली. राष्ट्रीय समाज पक्षाचे संस्थापक राष्ट्रीय अध्यक्ष महादेव जानकर यांनी मुंबईत वांद्रे येथील जिल्हाधिकारी कार्यालयासमोर धरणे धरत सरकारने निवडणुकीत शेतकऱ्यांना दिलेली कर्जमाफी सह अन्य आश्वासने पाळावीत, राज्यातील सरकार शेतकरी विरोधी सरकार आहे. केवळ समित्या नेमायच्या वल्गना करून शेतकऱ्यांची फसवणूक करणारे राज्यातील फसवे सरकार असल्याचे टिकास्त्र सोडले. रासपचे महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष काशिनाथ शेवते यांच्या नेतृत्वात सातारा जिल्हाधिकारी कार्यालयासमोर धरणे आंदोलन करण्यात आले. राष्ट्रीय समाज पक्षाचे आंदोलनाची दखल घेऊन शेतकऱ्यांची कर्जमाफी न केल्यास राज्यभरात शेतकऱ्यांना सोबत घेऊन तीव्र आंदोलन छेडू, असा इशारा श्री. शेवते यांनी दिला. 

सोलापूर, बीड, जालना, कोल्हापूर, परभणी, सांगली, अहिल्यानगर , छत्रपती संभाजी नगर, रायगड, मुंबई, नाशिक, अकोला, बुलढाणा, पुणे, धाराशिव, सिंधुदुर्ग आदी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर राष्ट्रीय समाज पक्षाचे कार्यकर्त्यांनी धरणे आंदोलन केले, शेतकऱ्याचा सातबारा कोरा कोरा करा अशी जोरदार घोषणाबाजी, निदर्शने केली. धनदांडग्या उद्योगपतींची कोणतीही आंदोलन मोर्चे न काढता कर्जेमाफ करता, मग शेतकऱ्यांची कर्जमाफीसाठी आंदोलन, मोर्चे का काढावे लागते, असा बोचरा सवाल श्री. शरद दडस यांनी अलिबाग येथे यशवंत नायक प्रतिनिधीशी बोलताना केला.

स्वबळावर ताकदीने महानगरपालिका निवडणुक लढवण्यासाठी राष्ट्रीय समाज पक्षाची मोर्चेबांधणी

स्वबळावर ताकदीने महानगरपालिका निवडणुक लढवण्यासाठी राष्ट्रीय समाज पक्षाची मोर्चेबांधणी  मुंबई (७/१०/२५) : स्वबळावर ताकदीने महानगरपालिका निवडण...