३१ जानेवारीला रासेफचा मुंबईत यशवंत गौरव पुरस्कार सोहळा
मुंबई : यशवंत नायक ब्यूरो, राष्ट्रीय समाज एम्प्लॉइज फेडरेशन तर्फे आयएमसी चेंबर ऑफ कॉमर्स ऍण्ड इंडस्ट्रीज चा एतिहासिक जमनालाल बजाज हॉल आयएमसी बिल्डिंग चर्चगेट, मुंबई येथे दिनांक ३१ जानेवारी २०२३ रोजी 'राष्ट्रीय समाज यशवंत गौरव पुरस्कार- २०२३' सोहळा आयोजीत केला आहे. कार्यक्रमाचे मुख्य अतिथी माननीय श्री श्री सिद्धरामनंद स्वामीजी कागीनेली कनकपीठ तिथनी मठ, कर्नाटक आणि माननीय सेवानिवृत्त न्या. व्हि. ईश्वरय्या, भूतपूर्व राष्ट्रीय मागास वर्ग आयोग अध्यक्ष तर प्रमुख मार्गदर्शक राष्ट्रीय समाज पक्षाचे संस्थापक राष्ट्रीय अध्यक्ष महादेव जानकर, कार्यक्रमाचे अध्यक्ष रासेफचे राष्ट्रीय अध्यक्ष एस एल अक्कीसागर असणार आहेत. या कार्यक्रमास शासकीय निमशासकीय सर्व प्रकारच्या आस्थपनाच्या कर्मचाऱ्यांनी उपस्थित राहावे, असे आवाहन राष्ट्रीय एम्प्लॉइज फेडरेशनचे महाराष्ट्र राज्य सचिव जयसिंग राजगे सर यांनी केले आहे..
No comments:
Post a Comment