Tuesday, January 17, 2023

बारामती लोकसभेसाठी रासपची जोरदार मोर्चेबांधणी

बारामती लोकसभेसाठी रासपची जोरदार मोर्चेबांधणी

बारामती : यशवंत नायक ब्यूरो 

आगामी लोकसभा निवडणुकीसाठी बारामती लोकसभा मतदारसंघात राष्ट्रीय समाज पक्षाने जोरदार मोर्चेबांधणी केली आहे.  इंदापूर, बारामती, दौंड या तालुक्यात राष्ट्रीय समाज पक्षाचे संस्थापक राष्ट्रीय अध्यक्ष आ. महादेव जानकर यांनी विविध कार्यक्रम, कार्यकर्त्यांचे मेळावे, बैठका, विकास कामासाठी निधी असे उपक्रम जोरदार चालवले आहेत. तर आठवड्यातून, दोन आठवड्यातून खुद्द महादेव जानकर इंदापूर, बारामती, दौंड येथील कार्यकर्त्यांच्या थेट घरापर्यंत पोहोचत आहेत. त्यामुळे राष्ट्रीय समाज पक्षाने जोरदार मोर्चेबांधणी सुरू केलेली आहे.

महादेव जानकर यशवंत नायक ब्यूरोशी बोलताना म्हणाले, मागील काही दिवसात पंढरपूर, नागपूर येथे पक्षाचे ताकदीने मेळावे झाले. वन बूथ टेन युथच्या माध्यमातून भारतात राष्ट्रीय समाज पक्षाचे आव्हान उभे करत आहोत. लोकसभेच्या निवडणुकीविषयी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याशी राष्ट्रीय समाज पक्षाची चर्चा झालेली आहे. परभणी लोकसभा मतदारसंघ त्यांनी आमच्या राष्ट्रीय समाज पक्षाला सोडावा. भाजपने जर हा मतदारसंघ लोकसभेसाठी रासपला सोडला, तर आनंदच आहे. रासपने लोकसभेच्या 12 जागा मागितलेले आहेत. लोकसभेच्या जागेत भाजपने व्यवस्थित भागीदारी न दिल्यास, राष्ट्रीय समाज पक्ष स्वतंत्र लढेल, असा निर्धार महादेव जानकर यांनी व्यक्त केला.



बारामती, परभणी, माढा, मिर्जापुर लोकसभा मतदारसंघात रासपच्या माध्यमातून मोर्चेबांधणी सुरू झालेली आहे. बारामतीसह इतर तीन लोकसभा मतदारसंघातून आपण निवडणूक जिंकू शकतो, असा विश्वास महादेव जानकर यांनी व्यक्त केला आहे. धनगर समाज या मतदार संघात अधिक असल्याने रासपचे महादेव जानकर यांना पाठबळ मिळू शकते, असा कार्यकर्त्यांचा होरा आहे. त्यामुळे महादेव जानकर बारामती लोकसभा मतदारसंघात लढणार का ?याबद्दल उत्सुकता लागून राहिलेली आहे.

रासपचे प्रदेशाध्यक्ष शेवते म्हणाले की, महादेव जानकरांची बारामती लोकसभा मतदारसंघातील लोकांमध्ये प्रंचड लोकप्रियता आहे. २०१४ साली झालेल्या लोकसभा निवडणूकीत तेथील स्थानिक जनतेने महादेव जानकरांना भरभरून प्रेम व‍ मते दिली होती. बारामती मतदारसंघात लोकाभिमुख कामे करण्याची व परिवर्तन घडवून आणण्याची क्षमता रासपमध्ये आहे. त्यामुळे तेथून‍ जिंकून येण्याची क्षमता व ताकत फक्त महादेव जानकरांमध्येच आहे. बारामतीमध्ये लोकसभेच्या निवडणूकसाठी राष्ट्रीय समाज पक्षाची संघटनात्मक तयारी पूर्ण झाली आहे, असेही त्यांनी नमूद केले.

No comments:

Post a Comment

चागंले संस्कार टिकविण्यासाठी वाचन संस्कृतीची गरज : डॉ. शंकर स्वामी वडेपुरीकर

चागंले संस्कार टिकविण्यासाठी वाचन संस्कृतीची गरज : डॉ. शंकर स्वामी वडेपुरीकर ‌पु.अहिल्यादेवी वाचनालयात " वाचन संकल्प महाराष्ट्राचा...