रासपचे सरकार येईल, तेव्हाच माता गंगुबाई अक्कीसागर यांचा खरा सन्मान होईल : महादेव जानकर
माता गंगुबाई लक्ष्मण अक्कीसागर यांना विविध मान्यवरांकडून श्रद्धांजली..!
रामदुर्ग/ एम चंदरगी : माता गंगुबाई लक्ष्मण अक्कीसागर यांचे वृद्धावस्थामुळे मौजे चंदरगी जिला बेळगांव कर्नाटक येथे राहत्या घरी निधन झाले. त्यांच्यावर अंत्यसंस्कार त्याच दिवशी 25 दिसम्बर 2022 रोजी झाले. दशक्रिया विधी कार्यक्रम दिनांक 2 जानेवारी 2023 ला सकाळी 11 वाजता निवासस्थानी पार पडला. शोकाकुल एस एल अक्कीसागर यांचा परिवार सोबत कौजलगी, बिज्जूर, पाटील, कुलाली, इटनाल, कपरट्टी, मिडकनट्टी, गोळे, दुधभाते परिवार, आसपासच्या परिसरातील नागरिक, मित्रपरिवार, कर्नाटक राज्य, देशभरतील जन मान्यवर उपस्थित होते. रासप राष्ट्रीय अध्यक्ष भूतपूर्वमंत्री आ.महादेवजी जानकर, जालीकट्टी मठ रामदुर्ग'चे कृष्णानंद स्वामीजी, रासप महाराष्ट्रचे अध्यक्ष काशिनाथ शेवते, रासप महाराष्ट्र मुख्य महासचिव ज्ञानेश्वर सलगर, रासप कर्नाटक अध्यक्ष धर्मन्ना तोंटापूर, विजयपूर जिला रासप अध्यक्ष रवी डोंबाले, सांगली महाराष्ट युवा नेता व सामाजिक कार्यकर्ता विक्रम ढोणे, रासपा नेता प्रकाश मुधोळ कर्नाटक रासप, हुनमंत पूजारी बेळगाव अध्यक्ष रासप, पुंडलिप्पा कुरी रामदुर्ग तालुका अध्यक्ष रासप, देवानंद कोळी गुलबर्गा रासप, हनुमंत कौजलगी माजी सरपंच उपस्थित राहून श्रद्धांजली व्यक्त केली.
महादेव जानकर म्हणाले, राष्ट्रीय समाज पक्षाचे रोप याच गावातून लावण्यात आले. मला आमदार, मंत्री करण्याचे काम एस. एल अक्कीसागर यांनी केले. त्यांच्या दुःखात राष्ट्रीय समाज पक्ष त्यांच्या सोबत व त्यांच्या परिवार सोबत आम्ही आहोत. रासपचे सरकार येईल, तेव्हाच माता गंगुबाई अक्कीसागर यांचा खरा सन्मान होईल. आंध्रप्रदेश दौरा करून रासपा राष्ट्रीय संघटक बाळकृष्ण लेंगरेमामा मुंबई, रासपा राष्ट्रीय संघटक गोविंदराम शूरनर नांदेड, ओमप्रकाश चीतळकर रासपा नेता जालना आदी मान्यवर, मित्र, परिवार हितचिंतक यांनी भेट देऊन, फोन व्हाट्सअप आदी समाज माध्यमातून सांत्वन व श्रद्धांजली अर्पण केली. सांत्वन व श्रद्धांजली तसेच दुःखात सहभागी झालेल्या सर्वा प्रती अक्कीसागर परिवार यांचे कडून कृतज्ञता व्यक्त केली आहे.
No comments:
Post a Comment