Tuesday, January 31, 2023

रात्रंदिवस आम्हा युद्धाचा प्रसंग| अंतर्बाह्य जग आणि मन ||

रात्रंदिवस आम्हा युद्धाचा प्रसंग|

अंतर्बाह्य जग आणि मन ||


युद्धात जय अत्याचार होतो जो युद्धात सावध असतो  त्याचा जय होतो, याच्या उलट जोडीदार बेसावध राहतो त्याचा पराजय हा ठेरलेलाच असतो. यासंदर्भात आपण जर आपल्या जीवनाकडे पाहिले व सिंहावलोकन केले तर आपल्याला असे आढळून येईल की, ज्या ज्या वेळी आपण काही कारणामुळे बेसावध राहिलो, त्या त्या वेळी आपल्याला जीवनात अपयश आले. सामान्य माणसाचे असेच आहे, बेसावधपणे जीवन जगणे हे जणू त्याच्या रक्तातच भिणून गेले आहे,  बेसावधपणा जून माणसाचा स्वभावच झाला आहे. त्याचाच परिणाम म्हणजे संसारात त्याला ठाई ठाई ठेचा खाव्या लागून, बनाना पत्ती तोंड द्यावे लागून दुःखात सागरात बुडून जावे लागते.


सामान्यपणे सामान्य माणसे खालील ठिकाणी बेसावध असतात असे आढळून येते १) संतती २)संपत्ती ३)संगती ४)आरोग्य ५)ईश्वर.

संत संगाचा आनंद मिळता, तिर्थक्षेत्रांची भटकंती कशाला ! : संत कणकदास

संत संगाचा आनंद मिळता, तिर्थक्षेत्रांची भटकंती कशाला !

सत्यबोध झाले मनाला,  दुःख कशाचे असेल तयाला !!

मना चिंता ग्रस्त होवु नकोस, मना शांत हो... मना स्थिर हो !

सर्वांभुती ईश्वर, सर्वांचे रक्षण करील, मना या बद्दल तु निश्चिंत हो !!

हा-तो ? माझे हित करील, यावर विसंबुनहि राहु नको !

पित्यावर विसंबुन राहिला, प्रल्हाद हि फसला गेला !!

कागिनेलीच्या आदी केशवाकडे पुर्ण विश्वास जयाचे !

तया मिळेल... अक्षत धन - अनंत काळाचे...!!✨

- संत कनकदास

सयाजीराव गायकवाड

 सयाजीराव गायकवाड कोण ? त्यांच्याबद्दल तुम्हाला काय माहितीये ?


"सयाजीराव गायकवाड हे गुजरातच्या बडोदा/बडोदे संस्थानाचे राजे होते. ते सुधारणावादी होते. त्यांनी आपल्या संस्थानात व मराठी मुलुखात सामजिक चळवळीची बीजं रोवली. त्यांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकरांना परदेशात उच्च शिक्षण घेण्यासाठी आर्थिक आणि एकूणच सर्वतोपरी मदत केली."


हे मला माहिती होतं. कदाचित तुमच्यापैकी बहुतेकांना एवढंच माहिती असावं असा माझा अंदाज आहे. 


पण झालं असं, की आमचे वारणानगरचा मित्र Devdatta Kadam मला काही महिन्यांआधी भेटले. ते महाराजा सयाजीराव गायकवाडांच्या जीवनकार्याचा अभ्यास करतात. भेटल्यावर त्यांनी मला सयाजीरावांच्या धर्म आणि सामाजिक सुधारणांबद्दलचा एक खंड भेट दिला. तो सहज चाळताना आमचं सयाजीरावांबद्दल बोलणं सुरूच होतं. त्यांच्या बोलण्यामुळे जरा वाचलं आणि इतका मोठा माणूस आपल्याला आधी माहित नव्हता याची खरंच लाज वाटली. 


1. शेती 


सयाजीरावांनी शेतीसंबंधी आधुनिक ज्ञान घ्यायला कितीतरी होतकरू विद्यार्थ्यांना शिष्यवृत्त्या देऊन परदेशात पाठवलं. रॉयल कॉलेज ऑफ अॅग्रिकल्चर, ऑक्सफर्ड अशा मानाच्या संस्थांमध्ये शिक्षणाची मोफत व्यवस्था केली. Agriculture chemistry सारख्या विषयाचं महत्व त्या काळात त्यांनी जाणलं होतं. बडोद्यात स्वतंत्र कृषी खातं स्थापन केलं. महाराष्ट्रात जेव्हा सहकार चळवळीची सुरुवात होत होती, त्याच्या सुमारे 50 वर्षे आधी सयाजीरावांनी बडोद्यात सहकार मॉडेल ऑलरेडी यशस्वीपणे राबवलं होतं. १९३९ च्या पूर्वी त्यांच्या कारकिर्दीत बडोद्यात ५८ प्रकारच्या सहकारी संस्था यशस्वीपणे कार्यरत होत्या. शेतीला उद्योगाची जोड द्यावी म्हणून त्यांनी असंख्य उपक्रम राबवले. भारतात सर्वप्रथम कृषी-औद्योगिक प्रदर्शनांची संकल्पना बडोद्यात रुजवली.


2.प्राच्यविद्या संशोधन


पुण्यातील प्रसिद्ध भांडारकर संस्था माहितेय नं ? तिच्या स्थापनेसाठी सयाजीरावांनी भरभक्कम आर्थिक मदत केलेली आहे. आजच्या काळात ते मूल्य 4 कोटी 68 लाख रु. हुन अधिक भरतं. तसेच बडोद्यात प्राच्यविद्या परिषद भरवून त्या काळात या विद्याशाखेचं महत्व त्यांनी जाणलं होतं. सर्व धर्मांचा comparative study बडोद्यात सुरु झाला. 


3. बुद्धाचा पुतळा आणि बुद्धविचार


आता पुतळे उभे करायची स्टाईल सुरु झालीय, पण त्या मागे काही तात्विक विचार असतो का? सयाजीरावांनी 1910 साली जपानहून बुद्ध मूर्ती मागवून बडोद्यात बसवली होती. या पुतळ्याच्या चबूतऱ्यावर बौद्ध धर्माची तत्वे कोरलेली होती. पुतळा उभारणीच्या भाषणात ते म्हणतात, "बुद्धाचे विचार आपल्याला नवी दृष्टी देतील. त्याच्या विचारांचे स्मरण चिरकाळ राहावे म्हणून हा पुतळा उभा होतो आहे." बाबासाहेबांनी केलेल्या धर्मांतराच्या आधी 46 वर्षे सयाजीरावांनी 'बुद्ध आपल्याला का हवा आहे" याची कारणमीमांसा केली होती. बौद्ध धम्म्माला आधुनिक काळात पहिला राजाश्रय देणारा राजा म्हणजे महाराजा सयाजीराव ! फर्ग्युसन कॉलेजात बौद्ध धम्म समजून घ्यायला मदत व्हावी म्हणून पाली भाषा शिकवायला सुरु झाली ते सयाजीरावांनी सुरू केलेल्या शिष्यवृत्त्यांमुळेच. हे फार फार थोर आहे.


4. उच्चशिक्षणाचा मानदंड


स्वत: वयाच्या 12व्या वर्षांपर्यंत निरक्षर असलेल्या सयाजीरावांनी तळागाळातील समाजाने शिक्षण घ्यावं म्हणून कला, भाषा, विज्ञान, तंत्रज्ञान, तत्वज्ञान अशा अनेक विद्याशाखांचं शिक्षण उपलब्ध करून दिलं होतं. तेही अगदी अल्पखर्चात. त्यांनी स्थापन केलेल्या बडोदा कॉलेजला आता 141 वर्षं पूर्ण झालीयेत. १८९० मध्ये त्यांनी स्थापन केलेल्या कला भवनमध्ये दादासाहेब फाळकेंनी चित्रपट निर्मितीसाठी आवश्यक शिक्षण घेतलं होतं. त्यांना camera सुद्धा सयाजीरावांनीच दिला होता. 1930 मध्ये भौतिकशास्त्राचे नोबेल मिळवणारे सी.व्ही.रमण आणि भारतीय डिजिटल क्रांतीचे सूत्रधार सॅम पित्रोदा हे दोघेही कलाभवनचेच विद्यार्थी! बसला ना धक्का??


5. लोककल्याणकारी राजा


1932 मध्ये कुठल्याही आंदोलनाशिवाय सयाजीरावांनी संस्थानातील सर्व मंदिरे अस्पृश्यांसाठी खुली केली. बरं, या प्रतीकात्मक बाबींच्याही पुढे जात सयाजीरावांनी त्याच्या 50 वर्षे आधीच 1882 साली आदिवासी व अस्पृश्यांना मोफत प्राथमिक शिक्षण देण्याचा कायदा लागू केला. यात येणाऱ्या अडचणींचा अभ्यास करून मग 1906 ला तो कायदा अधिक सुधारीत स्वरूपात संपूर्ण बडोदे संस्थानात लागू झाला. पुढे बाबासाहेबांना शिष्यवृत्ती दिली हे आपण जाणतोच. सयाजीरावांची कारकिर्द म्हणजे लोकशाहीचा महाप्रयोग होता. अस्पृश्यांसोबत बसण्याची तयारी असेल अशाच लोकांना धारा सभेची निवडणूक लढवण्याची परवानगी होती. 1894 ला 'गाव तिथे ग्रामपंचायत' स्थापन करण्याचा उद्देश ठरवून 1902 मध्ये त्यांनी भारतातील प्रथम ग्रामपंचायत कायदा बडोद्यात लागू केला. लोकशाही निर्णयप्रक्रियेबद्दलचा आधुनिक भारतातला पहिला लोककल्याणकारी राजा म्हणून त्यांच्याकडे बघता येईल. एवढंच नव्हे तर बाबासाहेबांना स्वतंत्र भारतातही ज्यासाठी संघर्ष करावा लागला त्या हिंदू कोड बिलामधले सर्वच्या सर्व 6 कायदे १९३३ च्या आधीच बडोद्यात सयाजीरावांनी सर्वप्रथम राबवले होते. म्हणूनच महाराजांच्या मृत्यूनंतर 11 फेब्रुवारी 1939 रोजी आपल्या 'जनता' मधील लेखात बाबासाहेब म्हणतात, "बडोदा संस्थानात महाराजांनी केलेले सामाजिक सुधारणांविषयीचे कायदे युरोप व अमेरिकेतील कुठल्याही कायद्यापेक्षा पुढारलेले आहेत."


सयाजीरावांच्या मोठेपणाचा यापेक्षा अधिक मोठा पुरावा काय हवा ?


6. मराठी भाषा आणि साहित्यव्यवहार


 भालचंद्र नेमाडे सयाजीरावांचं कौतुक करताना म्हणतात की सयाजीरावांनी मराठीसाठी जेवढं केलंय, तेवढं त्यांच्यानंतर सत्तेवर असलेल्या कोणीही केलेलं नाही. 1910 ला मुंबई मराठी ग्रंथसंग्रहालयाची पायाभरणी व 1912 ला उद्घाटन सयाजीरावांनीच केलंय. सयाजीरावांनी एकूण 7 साहित्य संमेलनांचे अध्यक्षस्थान भूषवलय. यावेळी त्यांनी जी अध्यक्षीय भाषणं केली त्यामध्ये ते नेहमी बहुजनहिताच्या बाजूने बोलत असत. 1909 साली बडोद्याला साहित्य सम्मेलन झालं तेव्हा महाराजांमुळेच किर्तीकरांसारखा एक वनस्पतीशास्त्रज्ञ पहिल्यांदा साहित्य संमेलनाचा अध्यक्ष झाला होता. विशेष गोष्ट म्हणजे १९०९ च्या या संमेलनाचे अध्यक्ष किर्तीकर हे मराठी साहित्य संमेलनाचे पहिले ब्राह्मणेतर अध्यक्षदेखील ठरले. हे केवळ सयाजीरावांमुळेच. हा इतिहास आजच्या साहित्यव्यवहारातल्या किती लोकांना माहितीये ?


पाककला, लोकसाहित्य, भाषा, तत्वज्ञान , तंत्रज्ञान, धर्म, कला, संस्कृती, विज्ञान, व्यायाम, कृषी, संगीत, संशोधन, कोश, समाजशास्त्र, प्रवासवर्णन इत्यादी साहित्यप्रकारांत व्यापक ग्रंथनिर्मिती करणारे सयाजीराव हे मराठीच्या इतिहासातले सर्वात मोठे प्रकाशक होत. 


7. विज्ञान, तंत्रज्ञान, तत्वज्ञान, न्यायशास्त्र


भारतात पहिला tractor सयाजीरावांनी आणला. तेही शेतीविकासाच्या दुरदृष्टीतून. त्यांनी प्रथम उसासोबतच बीटापासून साखरनिर्मितीचा प्रयोग शेतकऱ्यांना अतिरिक्त उत्पन्न मिळावं म्हणून केला होता. त्यांच्या नंतर अजुनही शंभर वर्षे भारतात तसा प्रयोग करण्याची फक्त चर्चाच सुरु आहे. 1882 मध्ये आपल्याला राजा म्हणून मिळणारे विशेष हक्क सोडून ते स्वतः न्यायव्यवस्थेच्या चौकटीत आले. न्यायशास्त्रातील पारिभाषिक कोश तयार केला. स्वतः सयाजीरावांचा तात्विक व तौलनिक धर्माभ्यास होता. त्यांनी स्थापन केलेल्या अध्यासनाकडून 'गायकवाड स्टडीज इन रिलिजन अँड फिलॉसॉफी' नावाच्या ग्रंथमालेत एकूण सतरा पुस्तकं प्रकाशित झालीयेत. अजून एक धक्का देऊ का? १ ऑगस्ट १९१६ रोजी महाराजांनी बडोदा कॉलेजमध्ये सुरू केलेलं 'तत्वज्ञान आणि तुलनात्मक धर्म अभ्यासा'च हे अध्यासन अशा प्रकारच भारतातील पहिलं आणि शेवटचं अध्यासन होत.

 

 शिवाजी महाराज - शिवरायांबद्दलच्या स्मरणकार्यासाठी सयाजीरावांनी एवढी कामं करून ठेवलीयेत की इथे लिहायला कमी पडतील. ती मूळातून वाचायला हवीत नक्की.

 

महात्मा फुलेंसोबत सयाजीरावांचे आदरयुक्त स्नेहसंबंध -

सयाजीरावांच्या सांगण्यावरूनच फुलेंना सत्यशोधक कार्यकर्त्यांनी 1888 साली महात्मा ही उपाधी दिली. कितीतरी ठिकाणी सयाजीरावांनी फुलेंना मदत केलेली दिसते. अनेक ठिकाणी फुले सयाजीरावांचा प्रेमपूर्वक उल्लेख करतात. फुलेंना सयाजीरावांनी शेवटच्या पक्षाघाताच्या आजारपणात आर्थिक मदतही केली. फुलेंच्या निधनानंतर सावित्रीबाई व यशवंतला सन्मानाने जगता यावं म्हणून आर्थिक-शैक्षणिक पाठबळ दिलं. पण फुले दाम्पत्याच्या वैचारिक प्रवासात सयाजीरावांचं योगदान नेहमी अंधारात राहिलं बघा !

 महात्मा फुलेंनी आपल्या बैठकीच्या खोलीत महाराजांचा फोटो स्वतःहून मागवून घेऊन लावला होता ही गोष्टच आम्हाला अजून माहित नाहीय...!! 


विठ्ठल रामजी शिंदे, बाबासाहेब, राजारामबापू अशी कितीतरी माणसंं सयाजीरावांच्या आश्रयाने उभी राहिली. असं म्हणायला काहीच हरकत नाही की आधुनिक महाराष्ट्रातील बहुतेक मोठी माणसंं ही येनकेनप्रकारे, प्रत्यक्ष-अप्रत्यक्ष स्वरूपात सयाजीरावांच्या प्रचंड व्यापक कार्याच्या पंखाखाली वाढली, समृद्ध झाली. आपणही त्यामुळेच त्यांच्याबद्दल कृतज्ञ असायला हवं. 


त्यातूनही हे मी जे लिहिलंय ते फक्त 1 टक्का आहे. जेवणातले स्टार्टर्स समजा हवंतर. महाराष्ट्र साहित्य महामंडळाचे 62 जाडजुड खंड आणि साकेत प्रकाशन व महाराजा सयाजीराव गायकवाड संशोधन प्रशिक्षण संस्थेची मिळून एकूण १०५ पुस्तक आजवर आलीत. हा मेन कोर्स पचवायचा तर बौद्धिक स्टॅमिना वाढवावाच लागेल. बाबा भांड सर आणि कोल्हापूरचे दिनेश पाटील सर यांच्या नेतृत्वाखाली खंडांची ही संख्या 200 पर्यंत तरी जाईल. यावरून त्यांचं आधुनिक काळातलं अवाढव्य काम लक्षात येतं. आता हे सगळं मलाच माहित नव्हतं. वेळ मिळेल तसं थोडं वाचायला सुरु केलंय. देवदत्त फेसबुक पोस्ट, लेख वगैरे पाठवत राहतात. त्यांच्यासारखी बरीच मंडळी हे काम पुढे यावं म्हणून राबतायत.


11 मार्चला, म्हणजे येत्या चार दिवसांनी सयाजीरावांची 159वी जयंती आहे. अशावेळी त्यांच्या अफाट कार्याला नमन म्हणून कुठेही बोलताना, लिहिताना शिवराय-फुले- शाहू-आंबेडकर यांच्यासोबत ""सयाजीरावांचंही"" नाव घ्यायला मी सुरुवात करतोय.

हे भारलेपण त्यांना अर्पण करतो आणि तुम्हाला सयाजीरावांबद्दल अधिक जाणून घ्यावंसं वाटेल, अशी आशा व्यक्त करतो ♥️

Thursday, January 26, 2023

मायाक्कादेवी

मायक्कादेवी ही मूळची कोकणातली मेंढापाळ धनगर समाजाची कुलदेवी आहे. मायक्कादेवीचा वेश हा धनगर समाजाचा असून तिला धनगरी स्त्रीची नौवारी साडी बांगड्या खन्  चेहऱ्यावरती कुंकवाचा मळवट आहे.  

पूर्ण माहिती मूर्तिबद्दल. मायक्का देवीची मूर्ती ही 3.2 फुटाची आहे.  ही मूर्ती काळ्या पाषाणाची असून, ती अर्धणारी अर्धपुरुषांच्या म्हणजेच शिवशक्ती रूपात आहे. 

पूजेबद्दल माहिती. मायक्कादेवी मंदिराचा दरवाजा हा पहाटे 4 वाजता उघडला जातो. देवीला मुख प्रकक्षालनासाठी आवाहन केल जाते. त्यानंतर मुख्यापूजेला सुरुवात होते, देवीला डोक्यावर हल्ल्याल नदीच पाणी हे घोंगड किंवा कांबल्या मध्ये झाकून् आणलं जाते. दही, दूध, तूप, मध, साखर, तेल लावून अभिषेक केला जातो. त्यानंतर देवीला नऊवार पैठेनी किंवा साधि इरकल् नेसावली जाते. सुंगाधी फुले हार आणी मंगळसूत्र  आणी इतर दागिने घातले जातात.  सोन्याचे हात देवीच्या अंगावरी घातले ठेवल जातात  आणी देवीला भक्त्यानाच्या ओटी भरली जाते मग् ढोल नगरा घंटी वाजवून पंचरती होते. देविचे तिर्थ् प्रसाद म्हणून देतात माग दुपारी पुरणपोळीचा निवद् दाखविनयत् येतो. माग देवीचं पान् दाखवतात पुन्हा संध्याकाळी देवीला 6 वाजता पाण्यांचे  स्नान घालून पुन्हा महापूजा बांधतात. 7 ला आरती होते रात्री 10.30 ला देविचि शेजारती होते. यावेळी सर्व पूजा काढून मूर्तीला फक्त साडी आणी इबीत गंध लावतात. करण सर्व देव्या या रात्री विधवा होतात असे जानकर मानसे सांगतात मंदिर बंद होते ते 4 पर्यंत.

देवीची आवड :  देवि धनगर समाजाची असली तरी तीला सर्व समजाचि आवड आहे .

देवीला लिंबू, भंडारा, घोंगड, पुरणपोळी, साडी, ओटी, खानाच्या आवड आहे. यापेक्षा तुमच्या श्रद्धेची आवड आहे.

मायक्का व्रत : मायकका देवीची यात्रा माघ् महिन्यात चतुर्थीला होते. यावेळी आपण दर्शनाला जाऊ शकता किंवा आता मंदिर ओपन आहे आता जाऊ शकता काही चुकल्यास माफी असावी.

विद्यार्थी - शिक्षक मुलाखत

|विद्यार्थी - शिक्षक मुलाखत 

विद्यार्थी सुरुवात : नमस्कार, आपण वेळात वेळ काढून मुलाखतीसाठी उपस्थित राहिलात, तुमचे सर्वप्रथम स्वागत.


प्रश्न : पूर्वीच्या काळात शिक्षकांची भूमिका समाज जीवनात महत्वाची का होती?

प्रश्न :  पारंपरिक शिक्षण पद्धती चांगली की आताची शिक्षण पद्धती चांगली ?

प्रश्न : गुरुकुल शिक्षणपद्धती कशी असते, तेथे कोणत्या विद्यार्थ्यांना प्रवेश दिला जातो.

प्रश्न : शाळाबाह्य विद्यार्थ्यांना शिक्षणाच्या प्रवाहात आणण्यासाठी तुम्ही प्रयत्न केले आहेत काय ? असल्यास कोणते?

प्रश्न : कोरोना महामारीच्या काळात तुम्हाला शिकवताना कोणत्या बदलास सामोरे जावे लागले?

प्रश्न : तुमच्यासाठी ऑनलाईन शिक्षण चांगले की ऑफलाईन शिक्षण?

प्रश्न : ऑनलाईन शिक्षण सर्व विद्यार्थ्यापर्यंत पोहचेल याची खात्री देता येते का?

प्रश्न : ऑनलाईन शिक्षणासाठी तुम्ही तांत्रिक शिक्षणाचे प्रशिक्षण घेतले आहे काय ?

प्रश्न : ऑनलाईन शिक्षणासाठी कोणत्या  एप्लिकेशन्सचा वापर करता?

प्रश्न : ऑनलाईन शिक्षणासाठी तुम्ही टाचन लिहता काय ?

प्रश्न :   एक जबाबदार शिक्षक म्हणून विद्यार्थ्यांशी कसे वर्तन असायला हवे?

प्रश्न :  तुम्ही एखादा धडा शिकवताना विद्यार्थ्यांना सोपे करुन सांगण्यासाठी वेगवेगळ्या पद्धती अवलंबता का ? असल्यास त्या कोणत्या?

✍️|आबासो पुकळे, मुंबई.

Tuesday, January 24, 2023

३१ जानेवारीला रासेफचा मुंबईत यशवंत गौरव पुरस्कार सोहळा

३१ जानेवारीला रासेफचा मुंबईत यशवंत गौरव पुरस्कार सोहळा

मुंबई : यशवंत नायक ब्यूरो, राष्ट्रीय समाज एम्प्लॉइज फेडरेशन तर्फे आयएमसी चेंबर ऑफ कॉमर्स ऍण्ड इंडस्ट्रीज चा एतिहासिक जमनालाल  बजाज हॉल आयएमसी बिल्डिंग चर्चगेट, मुंबई येथे दिनांक ३१ जानेवारी २०२३ रोजी 'राष्ट्रीय समाज यशवंत गौरव पुरस्कार- २०२३' सोहळा आयोजीत केला आहे. कार्यक्रमाचे मुख्य अतिथी माननीय श्री श्री सिद्धरामनंद स्वामीजी कागीनेली कनकपीठ तिथनी मठ, कर्नाटक आणि माननीय सेवानिवृत्त न्या. व्हि. ईश्वरय्या, भूतपूर्व राष्ट्रीय मागास वर्ग आयोग अध्यक्ष तर  प्रमुख मार्गदर्शक राष्ट्रीय समाज पक्षाचे संस्थापक राष्ट्रीय अध्यक्ष महादेव जानकर, कार्यक्रमाचे अध्यक्ष रासेफचे राष्ट्रीय अध्यक्ष एस एल अक्कीसागर असणार आहेत. या कार्यक्रमास शासकीय निमशासकीय सर्व प्रकारच्या आस्थपनाच्या कर्मचाऱ्यांनी उपस्थित राहावे, असे आवाहन राष्ट्रीय एम्प्लॉइज फेडरेशनचे महाराष्ट्र राज्य सचिव जयसिंग राजगे सर यांनी केले आहे..

यशवंत नायक – जानेवारी 2023

यशवंत नायक – जानेवारी 2023

वाचक मित्रानो, 🙏

या अंकात काय वाचाल...

पान १

कुळ कुलीन का म्हणून मिरवतो! मुळ कुळाचे कोणी का जाणतो : संत कणकदास

पान -२

संत संगाचा आनंद मिळता, तीर्थक्षेत्राची भटकंती कशाला! सत्यबोध झाले मनाला, दु:ख कशाचे असेल तयाला : संत कणकदास

पान -३

हा- तो माझे हित करील, यावर विसंबून राहू नको! पित्यावर विसंबून राहिला, प्रल्हाद ही फसला : संत कणकदास

मुख्य बातम्या – पान 1

@ पंढरपूर : यशवंत नायक ब्यूरो

रासपच्या कार्यकर्त्यांनी ' एक वोट एक नोट ' संकल्पना अंमलात आणावी : महादेव जानकर

> लोकसभा, विधानसभा, स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका स्वबळावर लढण्याची तयारी करा 

@ इंदापूर : यशवंत नायक ब्यूरो

बारामती लोकसभेसाठी रासपची जोरदार मोर्चेबांधणी

पान : २

@ तिरुपती : (आंध प्रदेश)यशवंत नायक ब्यूरो 

तिरुपती येथे यशवंत नायकची बैठक संपन्न 

> लवकरच व्यापक बैठक घेऊ कार्यकर्त्यांनी व्यक्त केला विश्वास 

@ पंढरपूर : यशवंत नायक ब्यूरो

देशात व राज्यात रासपला विचारल्याशिवाय सरकार बनणार नाही याचा बंदोबस्त करू : महादेव जानकर 

> महाराणी अहिल्याबाई होळकर यांनी फक्त हिंदुसाठी मंदिरे बांधली नव्हती, चर्च व मस्जिद देखील बांधले होते 

@ पुवया : उत्तर प्रदेश यशवंत नायक ब्यूरो 

पीडित महिलेच्या न्यायासाठी रासपचे पदाधिकारी बसले उपोषणाला 

@ तंबापली : आंध्र प्रदेश यशवंत नायक ब्यूरो

संत कनकदास जयंती निमित्त शेफर्ड इंडिया इंटरनॅशनल ७ वा वर्शिकोत्सव पार पडला 

@ पानीपत : हरियाणा यशवंत नायक ब्यूरो

राष्ट्रीय समाज पक्षाचा आलेख वाढवण्यासाठी देशभर फिरतोय : जानकर

@ भंडारा : यशवंत नायक ब्यूरो

भंडारा येथे राष्ट्रीय समाज पक्षाची बैठक

पान : ३

@ नंदगड : कर्नाटक यशवंत नायक ब्यूरो 

रासपच्या आद्य स्वातंत्र्यवीर स्वराज्य नायक संगोळी रायन्ना स्वराज्य यात्रेत सहभागी व्हा : तोंटापुर, प्रदेशाध्यक्ष कर्नाटक रासप

> प्रत्येक राज्याच्या राजधानीतून नंदगडकडे येणार स्वराज्य राजयात्रा 

@ सातारा : यशवंत नायक ब्यूरो 

रासपतर्फे सावित्रीमाई फुले यांना अभिवादन..!

@ विजयपुर : कर्नाटक यशवंत नायक ब्यरो 

स्वामी विवेकानंद यांचा विवेकवाद राष्ट्र तसेच समाजाच्या हिताचा : अक्कीसागर

> रासप तर्फे स्वामी विवेकानंद जयंती निमित्त विनम्र अभिवादन

@ मुंबई : यशवंत नायक ब्यूरो

३१ जानेवारीला रासेफचा मुंबईत यशवंत गुणगौरव सोहळा

> सेवानिवृत्त न्यायाधीश व्ही ईश्वरय्या व कगिनेली धर्मपिठाचे स्वामी राहणार उपस्थित 

@ बेळगांव /कर्नाटक : यशवंत नायक ब्यूरो

रासपचे सरकार येईल तेव्हाच माता गंगुबाई अक्कीसागर यांचा सन्मान होईल : जानकर

> माता गंगुबाई अक्कीसागर यांना विविध मान्यवरांकडून भावपूर्ण श्रद्धांजली

@ चंद्रपुर : यशवंत नायक ब्यूरो

चंद्रपुर येथे राष्ट्रीय समाज पक्षाची कार्यकर्ता बैठक संपन्न

> आदिवासी व मुस्लिम युवकांचा राष्ट्रीय समाज पक्षात जाहीर प्रवेश

पान : ४

राष्ट्रीय समाज पक्ष तर्फे क्रांतिवीर संगोळी रायण्णा १५ वा राज्याभिषेक वार्षिकोत्सवाचे आयोजन

> रासप राष्ट्रीय कार्यकारणी व विविध राज्य कार्यकारणीतील पदाधिकारी राहणार उपस्थित

> १२ वाजता राज्याभिषेक होणार; रासप सूत्रांची माहिती 

यशवंत नायक वाचा म्हणजे वाचाल

यशवंत नायक आपला खरा आणि प्रथम प्रतिनिधि आहे

यशवंत नायक आपला राष्ट्र आणि समाज प्रतिनिधि आहे...

_सिद्ध - सागर

कार्यकारी संपादक





Wednesday, January 18, 2023

रासपचे सरकार येईल, तेव्हाच माता गंगुबाई अक्कीसागर यांचा खरा सन्मान होईल : महादेव जानकर

रासपचे सरकार येईल, तेव्हाच माता गंगुबाई अक्कीसागर यांचा खरा सन्मान होईल : महादेव जानकर


माता गंगुबाई लक्ष्मण अक्कीसागर यांना विविध मान्यवरांकडून श्रद्धांजली..!


रामदुर्ग/ एम चंदरगी : माता गंगुबाई लक्ष्मण अक्कीसागर यांचे वृद्धावस्थामुळे मौजे चंदरगी जिला बेळगांव कर्नाटक येथे राहत्या घरी निधन झाले.  त्यांच्यावर अंत्यसंस्कार त्याच दिवशी 25 दिसम्बर 2022 रोजी झाले.  दशक्रिया विधी कार्यक्रम दिनांक 2 जानेवारी 2023 ला सकाळी  11 वाजता निवासस्थानी पार पडला. शोकाकुल एस एल अक्कीसागर यांचा परिवार सोबत  कौजलगी, बिज्जूर, पाटील, कुलाली, इटनाल, कपरट्टी, मिडकनट्टी, गोळे, दुधभाते परिवार, आसपासच्या परिसरातील नागरिक, मित्रपरिवार, कर्नाटक राज्य, देशभरतील जन मान्यवर उपस्थित होते.  रासप राष्ट्रीय अध्यक्ष भूतपूर्वमंत्री आ.महादेवजी जानकर, जालीकट्टी मठ रामदुर्ग'चे कृष्णानंद स्वामीजी, रासप महाराष्ट्रचे अध्यक्ष काशिनाथ शेवते, रासप महाराष्ट्र मुख्य महासचिव ज्ञानेश्वर सलगर, रासप कर्नाटक अध्यक्ष धर्मन्ना तोंटापूर, विजयपूर जिला रासप अध्यक्ष रवी डोंबाले, सांगली महाराष्ट युवा नेता व सामाजिक कार्यकर्ता विक्रम ढोणे, रासपा नेता प्रकाश मुधोळ कर्नाटक रासप, हुनमंत पूजारी बेळगाव अध्यक्ष रासप, पुंडलिप्पा कुरी  रामदुर्ग तालुका अध्यक्ष रासप, देवानंद कोळी गुलबर्गा रासप, हनुमंत कौजलगी माजी सरपंच उपस्थित राहून श्रद्धांजली व्यक्त केली.

महादेव जानकर म्हणाले, राष्ट्रीय समाज पक्षाचे रोप याच गावातून लावण्यात आले. मला आमदार, मंत्री करण्याचे काम एस. एल अक्कीसागर यांनी केले. त्यांच्या दुःखात राष्ट्रीय समाज पक्ष त्यांच्या सोबत व त्यांच्या परिवार सोबत आम्ही आहोत. रासपचे सरकार येईल, तेव्हाच माता गंगुबाई अक्कीसागर यांचा खरा सन्मान होईल. आंध्रप्रदेश दौरा करून रासपा राष्ट्रीय संघटक बाळकृष्ण लेंगरेमामा मुंबई, रासपा राष्ट्रीय संघटक गोविंदराम शूरनर नांदेड, ओमप्रकाश चीतळकर रासपा नेता जालना आदी मान्यवर, मित्र, परिवार हितचिंतक यांनी भेट देऊन, फोन व्हाट्सअप आदी समाज माध्यमातून सांत्वन व  श्रद्धांजली अर्पण केली. सांत्वन व श्रद्धांजली तसेच दुःखात सहभागी झालेल्या सर्वा प्रती अक्कीसागर परिवार यांचे कडून कृतज्ञता व्यक्त केली आहे. 

Tuesday, January 17, 2023

बारामती लोकसभेसाठी रासपची जोरदार मोर्चेबांधणी

बारामती लोकसभेसाठी रासपची जोरदार मोर्चेबांधणी

बारामती : यशवंत नायक ब्यूरो 

आगामी लोकसभा निवडणुकीसाठी बारामती लोकसभा मतदारसंघात राष्ट्रीय समाज पक्षाने जोरदार मोर्चेबांधणी केली आहे.  इंदापूर, बारामती, दौंड या तालुक्यात राष्ट्रीय समाज पक्षाचे संस्थापक राष्ट्रीय अध्यक्ष आ. महादेव जानकर यांनी विविध कार्यक्रम, कार्यकर्त्यांचे मेळावे, बैठका, विकास कामासाठी निधी असे उपक्रम जोरदार चालवले आहेत. तर आठवड्यातून, दोन आठवड्यातून खुद्द महादेव जानकर इंदापूर, बारामती, दौंड येथील कार्यकर्त्यांच्या थेट घरापर्यंत पोहोचत आहेत. त्यामुळे राष्ट्रीय समाज पक्षाने जोरदार मोर्चेबांधणी सुरू केलेली आहे.

महादेव जानकर यशवंत नायक ब्यूरोशी बोलताना म्हणाले, मागील काही दिवसात पंढरपूर, नागपूर येथे पक्षाचे ताकदीने मेळावे झाले. वन बूथ टेन युथच्या माध्यमातून भारतात राष्ट्रीय समाज पक्षाचे आव्हान उभे करत आहोत. लोकसभेच्या निवडणुकीविषयी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याशी राष्ट्रीय समाज पक्षाची चर्चा झालेली आहे. परभणी लोकसभा मतदारसंघ त्यांनी आमच्या राष्ट्रीय समाज पक्षाला सोडावा. भाजपने जर हा मतदारसंघ लोकसभेसाठी रासपला सोडला, तर आनंदच आहे. रासपने लोकसभेच्या 12 जागा मागितलेले आहेत. लोकसभेच्या जागेत भाजपने व्यवस्थित भागीदारी न दिल्यास, राष्ट्रीय समाज पक्ष स्वतंत्र लढेल, असा निर्धार महादेव जानकर यांनी व्यक्त केला.



बारामती, परभणी, माढा, मिर्जापुर लोकसभा मतदारसंघात रासपच्या माध्यमातून मोर्चेबांधणी सुरू झालेली आहे. बारामतीसह इतर तीन लोकसभा मतदारसंघातून आपण निवडणूक जिंकू शकतो, असा विश्वास महादेव जानकर यांनी व्यक्त केला आहे. धनगर समाज या मतदार संघात अधिक असल्याने रासपचे महादेव जानकर यांना पाठबळ मिळू शकते, असा कार्यकर्त्यांचा होरा आहे. त्यामुळे महादेव जानकर बारामती लोकसभा मतदारसंघात लढणार का ?याबद्दल उत्सुकता लागून राहिलेली आहे.

रासपचे प्रदेशाध्यक्ष शेवते म्हणाले की, महादेव जानकरांची बारामती लोकसभा मतदारसंघातील लोकांमध्ये प्रंचड लोकप्रियता आहे. २०१४ साली झालेल्या लोकसभा निवडणूकीत तेथील स्थानिक जनतेने महादेव जानकरांना भरभरून प्रेम व‍ मते दिली होती. बारामती मतदारसंघात लोकाभिमुख कामे करण्याची व परिवर्तन घडवून आणण्याची क्षमता रासपमध्ये आहे. त्यामुळे तेथून‍ जिंकून येण्याची क्षमता व ताकत फक्त महादेव जानकरांमध्येच आहे. बारामतीमध्ये लोकसभेच्या निवडणूकसाठी राष्ट्रीय समाज पक्षाची संघटनात्मक तयारी पूर्ण झाली आहे, असेही त्यांनी नमूद केले.

Monday, January 16, 2023

संत कनकदास जयंतीनिमित्त शेफर्ड इंडिया इंटरनॅशनल ७ वा वार्षिक महोत्सव पार पडला

संत कनकदास जयंतीनिमित्त शेफर्ड इंडिया इंटरनॅशनल ७ वा वार्षिक महोत्सव पार पडला

तम्बापल्ली (प्रतिनिधी) : आंध्रप्रदेश शेफर्ड इंडिया इंटरनॅशनल समितीतर्फे अण्णामया जिल्ह्यातील तम्बापल्ली मंडल येथील कुरुबाला कोटा येथे संत कनकदास जयंतीनिमित्त शेफर्ड इंडिया इंटरनॅशनल ७ वा वार्षीक महोत्सव आंध्रप्रदेशाध्यक्ष जब्बालु श्रीनिवासुलु यांच्या अध्यक्षेतेखाली पार पडला.

प्रथम कार्यक्रमाचे अध्यक्ष जब्बालु श्रीनिवासुलु यांच्याहस्ते संत कनकदास यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करण्यात आले, तसेच शेफर्ड इंडिया इंटरनॅशनल समितीचे संस्थापक अध्यक्ष व कर्नाटकचे माजी मंत्री एन.एच विश्वनाथ यांच्याहस्ते दिपप्रज्वलीत करून कार्यक्रमाला सुरुवात झाली.

या कार्यक्रमासाठी प्रमुख पाहुणे म्हणून कर्नाटकचे माजी मंत्री एच एम. रेवण्णा, समितीचे उपाध्यक्ष सागर रायाजी, गुजरात समितीचे अध्यक्ष. हरिभाई भारवाड, आमदार द्वारकानाथ, मा. खा. आर कृष्णय्या, एच. बी हरिष, राष्ट्रिय समाज पक्षाचे राष्ट्रिय संघटक गोविंदराम शूरनर, बाळासाहेब लेंगंरे व महाराष्ट्रातुन आलेले महाराष्ट्र राज्य प्रदेश सचिव ओमप्रकाश चितळकर, गणेश मेहत्रे, दत्ता वाकसे यांची उपस्थिती होती.

या कार्यक्रमाचे आयोजन अण्णामया जिल्हा शेफर्ड इंडिया इंटरनॅशनल समितीने केले होते.

रासपच्या कार्यकर्त्यांनी 'एक वोट एक नोट' संकल्पना अंमलात आणावी : महादेव जानकर

रासपच्या कार्यकर्त्यांनी 'एक वोट एक नोट' संकल्पना अंमलात आणावी : महादेव जानकर 

 १. कार्यक्रम प्रसंगी कार्यकर्त्यांनी वारकरी पगडी,विठ्ठल रखुमाई ची मुर्ती आणि नोटांचा हार घालून मा.महादेवराव जानकर यांचा सत्कार केला. २. मार्गदर्शन करताना महादेव जानकर ३. होळकर वाड्यात महाराणी अहिल्याबाई होळकर यांच्या पुतळ्यास अभिवादन करताना महादेव जानकर व रासप पदाधिकारी. ४. उपस्थित पदाधिकारी/कार्यकर्ते.

लोकसभा, विधानसभा, स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका स्वबळावर लढण्याची तयारी करा

पंढरपूर : (११/०१/२०२३)यशवंत नायक ब्यूरो 

राष्ट्रीय समाज पक्षाच्या कार्यकर्त्यांनी वन बुथ टेन युथ याप्रमाणे 'एक वोट एक नोट' ही संकल्पना अंमलात आणावी, तसेच आगामी जिल्हा परिषद, पंचायत समिती, लोकसभा विधानसभेच्या निवडणुका राष्ट्रीय समाज पक्ष स्वबळावर लढणार असल्याचे रासपाचे संस्थापक राष्ट्रीय अध्यक्ष माजी मंत्री आमदार महादेव जानकर यांनी पंढरपुरात रासप पश्चिम महाराष्ट्र पदाधिकारी मेळाव्यात बोलताना सांगितले.

येथील तनपुरे महाराज मठात आयोजित करण्यात आलेल्या रा पश्चिम महाराष्ट्र पदाधिकारी मेळाव्यामध्ये नुकत्याच झालेल्या ग्रामपंचायत निवडणुकीतील सरपंच ग्रामपंचायत सदस्य यांचा सत्कार यावेळी करण्यात आला. 

पुढे बोलताना आमदार जानकर म्हणाले की, रासपाच्या कार्यकर्त्यांनी आतापासूनच आगामी जिल्हा परिषद, पंचायत समिती, नगरपालिका, महानगरपालिका, लोकसभा, विधानसभा या निवडणुकीसाठी कार्यकर्त्याने आपापल्या मतदारसंघात कामाला लागावे. युती संदर्भात बोलताना आमदार जानकर म्हणाले की, जो पक्ष आपणाला सन्मानाने जागा देईल त्याबरोबर आपण युतीसंदर्भात विचार करू.

या बैठकीत राष्ट्रीय समाज पक्षाचे राष्ट्रीय महासचिव कुमार सुशील, राष्ट्रीय संघटक बाळकृष्ण लेंगरे, पंडित घोळवे, महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष काशिनाथ शेवते, महाराष्ट्र मुख्य महासचिव ज्ञानेश्वर सलगर, प्रदेश उपाध्यक्ष बबनदादा वीरकर, प्रदेश सचिव भाऊसाहेब वाघ, विद्यार्थी आघाडी अध्यक्ष शरद दडस, राज्य सचिव भाऊसाहेब वाघ, प्रदेश सचिटणीस आबासाहेब मोटे, प्रदेश कार्यकारणी सदस्य वैशालीताई वीरकर, बाळासाहेब कोकरे, प. महाराष्ट्र अध्यक्ष ॲड. संजय माने -पाटील, उपाध्यक्ष सूनिलदादा बंडगर, प्रकाश खरात, सचिव बाळासाहेब बंडगर, कालिदास गाढवे, समन्वयक सचिन गुरव, युवक अध्यक्ष अजित पाटील, विद्यार्थी आघाडी अध्यक्ष पंकज देवकाते, सोलापूर जिल्हाध्यक्ष रणजित सुळ, जिल्हा उपाध्यक्ष ॲड. शरदचंद्र पांढरे, जिल्हा सरचिटणीस नवनाथ मदने, युवक जिल्हाध्यक्ष दामाजी मेटकरी, जिल्हा संपर्क प्रमुख श्रीमंत हाके, माढा लोकसभा क्षेत्र उपाध्यक्ष म्हाळाप्पा खांडेकर, तालुका अध्यक्ष संजय लवटे, संतोष मासाळ, संजय हाके, सातारा जिल्हाध्यक्ष खंडेराव सरक, एड. विलास चव्हाण आदी उपस्थित होते.

फोटो ओळ: १. कार्यक्रम प्रसंगी कार्यकर्त्यांनी वारकरी पगडी,विठ्ठल रखुमाई ची मुर्ती आणि नोटांचा हार घालून मा.महादेवराव जानकर यांचा सत्कार केला. २. मार्गदर्शन करताना महादेव जानकर ३. होळकर वाड्यात महाराणी अहिल्याबाई होळकर यांच्या पुतळ्यास अभिवादन करताना महादेव जानकर व रासप पदाधिकारी. ४. उपस्थित पदाधिकारी/कार्यकर्ते.

Tuesday, January 10, 2023

तिरुपती येथे राष्ट्रीय समाज पक्षाची बैठक

तिरुपती येथे राष्ट्रीय समाज पक्षाची बैठक

तिरूपती : आंध्र प्रदेश यशवंत नायक ब्यूरो 

राष्ट्रीय समाज पक्षाची बैठक प्रथमच तिरूपती जिल्हा - चित्तूर, आंध्रप्रदेश येथे पार पडली. दिनांक २७ व २८ डिसेंबर २०२२ रोजी राष्ट्रिय समाज पक्षाचे राष्ट्रिय संघटक तथा आंध्रप्रदेश राज्यप्रभारी गोविंदराम शूरनर, बाळकृष्ण लेंगरे हे आंध्रप्रदेश राज्याच्या दौऱ्यावर गेले होते. 

दक्षिण भारतातील राष्ट्रीय समाज पक्षाचे राष्ट्रीय सचिव एमजी माणिशंकर यांच्या सूचनेनुसार दि. २८ डिसेबंर रोजी तिरूपती येथे 'श्रीकृष्ण हाॅटेल' येथे राष्ट्रीय समाज पक्ष कार्यकर्त्यांची बैठक घेण्यात आली. या बैठकित राष्ट्रिय राष्ट्रिय समाज पक्षाची संघटनात्मक बांधणी आंध्रप्रदेशात राज्यात करण्याच्यादृष्टीने चर्चा करण्यात आली. या बैठकीत नारायण कुरूबा यांनी पुढील बैठक व्यापक स्वरूपाची घेवून पक्षाचे काम सुरू करू, असे आश्वासन दिले. या बैठकीस नारायण कुरूबा, कुरूबा, श्रीकृष्ण वासुदेव, गणेश मेहत्रे, महाराष्ट्राचे राज्य सचिव ओमप्रकाश चितळकर उपस्थित होते.

Wednesday, January 4, 2023

विविध मान्यवरांकडून एस.एल.अक्कीसागर व परिवार यांचे सांत्वन

विविध मान्यवरांकडून एस.एल.अक्कीसागर व परिवार यांचे सांत्वन

चंदरगी-कर्नाटक,दि.02/01/2023 :

राष्ट्रीय समाज पक्षाचे भूतपूर्व राष्ट्रीय अध्यक्ष/रासेफ राष्ट्रीय अध्यक्ष थोर विचारवंत एस. एल. अक्कीसागर साहेब यांचे मातोश्री गंगुबाई अक्कीसागर यांचे नुकतेच काही दिवसांपूर्वी वृद्धापकाळाने निधन झाले होते. त्यानिमित्त आज दिनांक 02/01/2023 रोजी दशक्रिया विधी' कार्यक्रम पार पडला. यावेळी रासपचे राष्ट्रीय अध्यक्ष आ. महादेवजी जानकर, रामदुर्ग'चे कृष्णानंद स्वामी जी, रासपचे महाराष्ट्र अध्यक्ष काशिनाथ शेवते, रासपचे मुख्य महासचिव ज्ञानेश्वर सलगर, युवा नेते सामाजिक कार्यकर्ते विक्रम ढोणे, प्रकाश मुधोळ - उत्तर कर्नाटक रासप, हुनमंत पूजारी - बेळगाव अध्यक्ष रासप, पुंडलिक अप्पा कुरी - रामदुर्ग तालुका अध्यक्ष रासप, देवानंद कोळी - कर्नाटक रासप नेते व विविध क्षेत्रातील मान्यवर मंडळींनी उपस्थिती राहत श्रद्धांजली वाहिली.
















चागंले संस्कार टिकविण्यासाठी वाचन संस्कृतीची गरज : डॉ. शंकर स्वामी वडेपुरीकर

चागंले संस्कार टिकविण्यासाठी वाचन संस्कृतीची गरज : डॉ. शंकर स्वामी वडेपुरीकर ‌पु.अहिल्यादेवी वाचनालयात " वाचन संकल्प महाराष्ट्राचा...