Monday, October 10, 2022

पादरा नगरपालिकेत RSP नगरसेवकांच्या पाठीशी पक्षाची ताकद उभी करू : दिलीपसिंह गोहिल

पादरा नगरपालिकेत RSP नगरसेवकांच्या पाठीशी पक्षाची ताकद उभी करू : दिलीपसिंह गोहिल

विधानसभा निवडणुकीत राष्ट्रीय समाज पक्ष जो उमेदवार देईल त्यास जिंकण्याचे काम करू : संकेत पटेल

वडोदरा : यशवंत नायक प्रतिनिधी

पादरा शहरातील समस्या सात दिवसांच्या आत सोडवण्यासाठी राष्ट्रीय समाज पक्षाचे नगरसेवक सत्ताधाऱ्यांना भाग पडतील. नगरपालिकेतील RSP नगरसेवकांची कामगिरी चमकदार राहिलेली आहे. नगरसेवकांच्या पाठीशी पक्षाची ताकद उभी करू, असा विश्वास गुजरात RSP प्रदेश प्रमुख दीलीपसिंह (बापू) गोहिल यांनी यावेळी व्यक्त केला. 

दि. ७ ऑक्टोबर रोजी रासप राष्ट्रीय कार्यकारणी पदाधिकारी तीन दिवसीय गुजरात दौऱ्यावर आले होते. विविध नियोजित कार्यक्रमांना भेट दिल्यानंतर दि. ८ ऑक्टोबर रोजी सायंकाळी ८ :१५ वाजता हॉटेल आदिती येथे पादरा नगरपालिका नगरसेवक भेटीसाठी आले होते. दरम्यान गुजरात प्रदेश पदाधिकारी व पादरा नगरपालिका नगरसेवक यांची बैठक पार पडली. बैठकीत गुजरात प्रदेश अध्यक्षपदी दिलीपसिंह गोहिल बापू यांची निवड झाल्याबद्दल पादरा नगरपालिका नगरसेवक यांच्यावतीने अभिनंदन करण्यात आले. सर्व नगरसेवकांना यशवंत नायक अंक भेट देऊन श्री. गोहिल यांनी सर्वांचे स्वागत व अभिनंदन केले.

पादरा विधानसभा मतदारसंघात राष्ट्रीय समाज पक्ष जो उमेदवार देईल, त्या उमेदवारास जिंकण्यासाठी गुजरात प्रदेश प्रमुख दिलीपसिंह गोहिल (बापू) यांच्या नेतृत्वात जिंकण्याचे काम करू, असे प्रतिपादन रासप पादरा नगरपालिका विरोधीपक्ष नेता संकेत पटेल यांनी यशवंत नायक प्रतिनिधीशी बोलताना व्यक्त केले.

रासप नगरसेवकांना विकासकामांचा निधी देताना दूजाभाव केला जात असल्याचा आरोप पादरा रासप शहर अध्यक्ष निलेश पटेल यांनी यशवंत नायक प्रतिनिधीशी बोलताना केला. ते पुढे म्हणाले, पादरा नगरपालिकेत एकूण २८ नगरसेवक आहेत. भाजपचे २०, रासपचे ०५+ १ पुरस्कृत व २ अपक्ष असे संख्याबळ आहे. काँग्रेसला खाते उघडता आलेले नाही.पादरा नगरपालिकेत राष्ट्रीय समाज पक्ष विरोधी पक्षाची प्रमुख भूमिका पार पाडत आहे.

बैठकीसाठी भूतपूर्व राष्ट्रीय अध्यक्ष तथा संस्थापक सदस्य एस एल अक्कीसागर, राष्ट्रीय महासचिव कुमार सुशील, राष्ट्रीय संघटक बाळकृष्ण लेंगरे मामा, गुजरात प्रदेश प्रमुख दिलीपसिंह गोहिल, गुजरात प्रदेश प्रभारी सुशील शर्मा, गटनेता नगरसेवक संकेत पटेल, नगरसेवक भावेश पटेल, नगरसेवक जयंतीभाई पटेल, पादरा शहर प्रमुख निलेश पटेल, नगरसेवक जयमिन भट्ट, नगरसेवक दक्षेश पटेल उपस्थित होते.

गुजरात प्रदेश प्रमुख हस्ते नगरसेवकांचा यशवंत नायक अंक भेट देऊन सत्कार प्रसंगी मान्यवर खालील अन्य छायाचित्र









बातम्यांच्या व्हिडिओ पाहण्यासाठी क्लिक करा RSP Padara Carporator RSP Padara



No comments:

Post a Comment

विश्वाचा यशवंत नायक माहे : जून 2025

विश्वाचा यशवंत नायक माहे : जून 2025