Tuesday, October 11, 2022

अवघे विश्वची आमुचे घर

 🌏अवघे विश्वची आमुचे घर

असे आहोत आम्हीं Shepherd's / धनगर...

धनगर / Shepherd's या शब्दाचा अर्थ

आणि समाजाविषयी थोडक्यात...✍️

धनगर समाज म्हणजे धनाचे आगर असलेला समाज...धनवान समाज...असे वा अनेक अर्थ सांगितले जाते. पण त्याचा अर्थ पुढील प्रमाणे तो असा आहे कि पूर्वी धन म्हणजे ज्या व्यक्तीकडे 'पशुधन' अधिक आहे, तो समाज म्हणजे धनवान समाज. आणि हे धन म्हणजे बकरी - मेंढे - उंट - घोडे - म्हैस - गायी - याक...असे पशु पाळणारा समाज म्हणजे धनवान समाज / धनगर समाज. आज हि उत्तरेत पहाडी प्रदेशातील गद्दी असो वा बकरवाल नावाने ओळखला जाणारा धनगर समाज आपल्या मेंढ्या-बकऱ्यांना ते 'माल' म्हणतात. माल म्हणजेच धन. आणि गुजरात मध्ये मालधारी समाज आहेच. असे हे पशुधन मिळवन्यासाठी पूर्वी अनेक लढाया ही होत असत.

पुढे असे विविध (पाळीव) पशु पाळणारे समाज / पशुपालक समाज बनत गेले. ते विविध नावाने ओळखु जावू लागले. ‘कुरूब (धनगर) हुट्टुव मुंच कुला इल्ला, जाती इल्ला’ असे कवन म्हणूनचं तर कर्नाटकात गायीले जाते.

जगात पाळीव पशूंची संख्या तर आपल्या भारतात सर्वात जास्त आहे. धनगर समाज हा देशातील सर्वात मोठा राष्ट्रीय समाज आहे. आजही विविध बाबतीत दुर्लक्षित असणारा वा ठेवलेला असाही हाच बहुसंख्यांक समाज आहे...आणि असे होण्यास वा घडण्यास धनगर समाज हा स्वत प्रथमत: जवाबदार आहे, हेहि मात्र येथे खेदाने सांगावेसे वाटते.

देशभरातील विविध नावाने ओळखल्या जाणाऱ्या धनगर समाजाची एक स्वतंत्र अशी ओळख व आदिम संस्कृती हि आहे. रानोमाळ भटकंती करणारा मेंढपाळ/धनगर हा निसर्गाच्या सानिध्यात अधिक जवळ असल्याने तो मूलतः बेडर/निडर स्वभाव वृत्तीचा आहे.

Shepherds / धनगर समाज हा संपूर्ण भारतभर तसेच सर्व जगभरातही आढळणारा समाज आहे. तसेच तो विविध भाषिक असून विविध प्रांतात राहणारा/आढळणारा समाज आहे. तो विविध धर्म-पंथांचा आहे. उदा. हिमाचल प्रदेश येथील गद्दी हा प्रामुख्याने हिंदू, काश्मीर'मधील बकरवाल हा मुस्लीम तर लडाख'मध्ये चांगपा हा बौद्ध, असा हा धनगर समाज आपणांस आढळून येतो. आहे ना विशेष बात. आणि हा बकरवाल आणि चांगपा नावाने ओळखला जाणारा धनगर समाज हा भारतीय सीमा भाग-देश हद्दित आपली नजर ठेवत सीमापार देशांतुन होणारी भारतातील घुसकोरी आदि. संशयास्पद हालचाली बाबत भारतीय सैन्यास अनेक वेळा योग्य माहिती देत असतो. कारगिल युद्धा'वेळी व तसेच आता काही दिवसापूर्वी लडाख येथील सीमा भागात चीनची घुसकोरी होत असताना याच समाजाने भारतीय सैन्यास सतर्क केले होते. आज आपण कारगील विजय दिवस जेव्हां साजरी करतो तेंव्हा आपणास ताशी नामग्याळ या देशभक्त मेंढपाळ'चे नाव आठवण केल्याशिवाय या दिवसाचे महत्व पूर्ण होवू शकत नाही.

'धनगर' या शब्दाचा खरा अर्थ दिशा देणारा / मार्गदर्शक असा आहे. तसेच आपल्या कळपाचे / समाजाचे रक्षण करणारा असाही आहे. म्हणून धनगर हा 'पालक' भूमिकेत आहे व तसा तो असला पाहिजे आणि म्हणूनच तर येशूला THE GOOD SHEPHERD असे म्हणतात.

गुजरात आणि राजस्थान’मध्ये धनगर समाजाला ‘रबारी’ असे म्हणतात. राह अर्थात मार्ग दाखविणारा राहबर, म्हणजेचं रबारी. अनेक मार्ग/रस्ते यांचा शोध धनगरांनी लावलेला आहे. आपल्याकडे मुंबई-पुणे'स जोडणारा, तसा मार्ग दाखविणारा बोरघाटाचे जनक म्हणून ओळखल्या जाणाऱ्या वीर शिंग्रोबा विषयी आपण जाणताचं. अगदी असेच महाराष्ट्र - कर्नाटक राज्यास जोडणारा सिंधुदुर्ग जिल्ह्यातील आंबोली घाट'चा शोध हि एका धनगरानेच लावला. जगभरात अनेक प्रवासादरम्यान राहबर म्हणून Shepherds'ची मदत घेतली गेली.

अनेक धर्माचा/पंथांचा खरा 'मानवतेचा संदेश' देणारा हा धनगरचं होता. www.shabdkosh.com हि वेबलिंक ओपन करा आणि सर्च’मध्ये टाईप करा Shepherd. अनेक लोकांना माहित नाही की, आपल्या Shepherd समाजाला 'धर्मगुरू' असेही म्हणतात. कृष्ण, जिझस, पैगम्बर मोहमद, मोझेस हे Shepherd'चं होते. पुढे काळा'प्रमाणे संदर्भ आणि अर्थ बदलत गेले. असा विश्वाला ज्ञान देणारा/दिशा देणारा Shepherd/धनगर समाज आहे.

मात्र आजचा देशभरातील धनगर समाज हा कमालीचा विस्कळीत दिसत आहे. धनगरा/मेंढपाळा विना बकऱ्या/मेंढ्याचां कळप म्हणजे अशुभ दर्शन, असे मानले जाते. समाज व नेता वा लीडर यांचे संबंध खुप जवळचे असते. लीडर म्हणजेचं धनगर !

आपल्या समाजाचे व सर्व महापुरुषाचें आदर्श-प्रेरणा घेवून व सर्व राष्ट्रीय समाज बांधवांना आपल्या सोबत विश्वासात घेत आपणासं पुढे जाणे आहे. येथे पुढे जाणे, हे फार फार महत्वाचे आहे. मेंढपाळ/धनगर हा कधीही थाबंत नसतो...

“ सफ़र ही हमारी ज़िन्दगी,

हम कुदरत के लाल.

थम गया तो पत्थर,

चलता रहा तो बकरवाल...” असे करीम मोहम्मद या चित्रपटातील मेंढपाळ/बकरवाल असलेल्या मुलाचे चित्रपट सरतेशेवटी एक प्रमुख संवाद म्हणूनचं तर प्रभावी आहे. मुळातचं मुक्त व प्रवाही असलेला धनगर समाज आता काळा’प्रमाणे बदलला गेलाही पाहिजे.

शेवटी आणि थोडक्यात की, विविध समाजातील आपले समाज मित्र जेव्हां वाढवीता येईल, तेंव्हाचं खर्या अर्थाने धनगर समाजाचे नाव पुनः देशभर/जगभरात होईल. आणि असे समाज मित्र जोडण्याचे कार्य जो कोणी करित आहे, अशां सर्वांना मानाचा जय मल्हार !

धन्यवाद.

आपलाचं,

- सुदर्शन अक्कीसागर (सनी.ए)

No comments:

Post a Comment

चागंले संस्कार टिकविण्यासाठी वाचन संस्कृतीची गरज : डॉ. शंकर स्वामी वडेपुरीकर

चागंले संस्कार टिकविण्यासाठी वाचन संस्कृतीची गरज : डॉ. शंकर स्वामी वडेपुरीकर ‌पु.अहिल्यादेवी वाचनालयात " वाचन संकल्प महाराष्ट्राचा...