Tuesday, October 18, 2022

राजकीय वृत्त : एस एल अक्कीसागर बारामतीत

Breaking News

एस एल अक्कीसागर बारामतीत दाखल

बारामती लोकसभा मतदारसंघात राष्ट्रीय समाज पक्षाने पुन्हा एकदा लक्ष घातले आहे. नुकत्याच बाबीरगड येथे झालेल्या मेळाव्यात पक्षाचे संस्थापक राष्ट्रीय अध्यक्ष महादेव जानकर बारामती लोकसभा निवडणुक लढतील, असे महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष काशिनाथ शेवते यांनी जाहीर केले आहे. रासपच्या घोषणेने भाजपच्या मिशन बारामतीला सुरुंग लागणार, याबाबत तर्क वितर्क व्यक्त केले जात आहेत. अशातच कालपासून बारामती लोकसभा मतदारसंघात एस. एल अक्कीसागर दाखल झाले आहेत.  श्री. अक्कीसागर स्वत: बारामती लोकसभा मतदार क्षेत्रात प्रत्यक्ष लोकांच्या गाठीभेटी घेत आहेत. राजकीय निरीक्षक म्हणून एस एल अक्कीसागर बारामती लोकसभा मतदार क्षेत्रात आले आहेत, अशी माहिती रासपच्या विश्वसनीय सूत्रांकडून देण्यात आली आहे.  बारामती लोकसभा मतदारसंघात पत्रकार परिषद घेणार असल्याचे समजत आहे.  एस एल अक्कीसागर हे राष्ट्रीय समाजाला दिल्लीच्या सत्तेकडे घेऊन जाणाऱ्या राजमार्गाचे मार्गदर्शक आहेत. महादेव जानकर आणि राष्ट्रीय समाज पक्ष नावारूपाला आणण्यात त्यांची महत्वाची भूमिका राहिली आहे. भाजपच्या मिशनला छेदण्याचे सूत्र श्री. अक्कीसागर यांच्याकडे आहे. भाजपच्या वामननितीला शह देण्याची रणनीती त्यांच्याकडे आहे.  अक्कीसागर रासपचे शीर्ष आणि बुजुर्ग नेतृत्व आहे. महादेव जानकर यांच्या नेतृत्वात बारामतीचा गड आम्ही भेदला होता, भाजपच्या स्वार्थीपणामुळे शरद पवाराना पुन्हा प्रस्थापित केले आहे. असा त्यांचा दावा आहे.

No comments:

Post a Comment

चागंले संस्कार टिकविण्यासाठी वाचन संस्कृतीची गरज : डॉ. शंकर स्वामी वडेपुरीकर

चागंले संस्कार टिकविण्यासाठी वाचन संस्कृतीची गरज : डॉ. शंकर स्वामी वडेपुरीकर ‌पु.अहिल्यादेवी वाचनालयात " वाचन संकल्प महाराष्ट्राचा...