देशभरातील गडरिया समाजाने महादेव जानकर यांना साथ देऊन देशाची सत्ता हस्तगत करावी : एस एल अक्कीसागर
वडोदरा : यशवंत नायक ब्यूरो
गुजरात मध्ये प्रामुख्याने चारण व दरबार समाज आहेत. राष्ट्रीय समाज पक्षाचे येथील गुजरात अध्यक्ष दिलीपसिंह गोहिल आहेत. चारण समाज व दरबार समाज एकत्र आल्यास लवकरच राजकीय सत्ता मिळवता येईल. देशभरातील गडरिया समाजाने महादेव जानकर यांच्या नेतृत्वात राष्ट्रीय समाज पक्षास साथ देऊन देशाची सत्ता हस्तगत करावी, असे प्रतिपादन राष्ट्रीय समाज पक्षाचे भूतपूर्व राष्ट्रीय अध्यक्ष एस एल अक्कीसागर यांनी केले. ते पुढे म्हणाले, समाजनिती व राजनीतीत महाराणी अहिल्याबाई होळकर या देशात नव्हे तर जगाच्या आदर्श आहेत. गुजरात मध्ये राष्ट्रीय समाज पक्ष सर्व समाजाला सोबत घेऊन येथील रजकारनाची दिशा बदलत आहे.
उत्तर प्रदेशचे माजी राज्यमंत्री सतीष पाल यांनी सत्ताधारी नेत्यावर आरक्षणाच्या मुद्द्यावर जोरदार घणाघात केला. नेता व्हायचे असेल तर महादेव जानकर यांच्या सारखे नेता व्हावे. कुमार सुशील म्हणाले, भाजपच्या राजकारणात पाल समाज बेदखल आहे. भाजपचे भटक्या विमुक्त आघाडीचे पद घेऊन काम करणारे समाजास न्याय देऊ शकत नाहीत. बाळकृष्ण लेंगरे यांनी इतीहासाचे दाखले दिले व समाजाने प्रगती करावी असे आवाहन केले.
गुजरात पाल महासभा गुजरात प्रदेश तर्फे दिनांक ८ ऑक्टोबर २०२२ रोजी श्रीजी पार्टी प्लॉट, आजवा चौकडी, नेशनल हायवे, वडोदरा येथे सकाळी ११ ते सायंकाळी ६ वाजेपर्यंत भारतीय गडरिया संसदचे आयोजन केले होते. मान्यवरांच्या उपस्थितीत महाराणी अहिल्याबाई होळकर यांच्या प्रतिमेचे पूजन व दिपप्रजवलन करून कार्यक्रमास सुरुवात झाली. सकाळच्या सत्रात देशभरातून आलेल्या उपस्थित मान्यवर यांचा परिचय व आदर सत्कार करण्यात आला. दि. ९ ऑक्टोबर रोजी पंडित दीनदयाळ हॉल येथे पालधारा समिट कार्यक्रम पार पडला. दोन्ही कार्यक्रमास एस एल अक्कीसागर, बाळकृष्ण लेंगरे(मामा), कुमार सुशील, दादासाहेब कोडलकर, आबासो पुकळे उपस्थित राहिले. रासप गुजरात राज्य शाखेचे अध्यक्ष दिलीपसिंह गोहिल यांनी गुजरात पाल महासभेच्या कार्यक्रमास उपस्थित राहिलेल्या अतिथीगण व मान्यवरांचा शाल श्रफळ देऊन सत्कार सन्मान केला. पाल महासभेसाठी पूर्व राज्यमंत्री जगमोहन बघेल, माजी खा. विकास महात्मे, झाशीचे माजी जिल्हा परिषद अध्यक्ष राकेश पाल, इंदौरचे नगरसेवक सुधीर दोडगे, बापूसाहेब शिंदे, रविकांत बघेल, रामबचन पाल, नेमसिंह बघेल, शारदाताई दोगडे, धर्मवीरसिंह बघेल, गोपीनाथ कुरमा, डॉ. दर्शना परीहार व अन्य मान्यवर उपस्थित होते.
No comments:
Post a Comment