मोठ्या पक्षावर भरोसा नको; कार्यकर्त्यांनो स्वबळावर निवडणूकच्या तयारीला लागा : महादेव जानकर
![]() |
उत्तर महाराष्ट्र पदाधिकारी चर्चासत्रात मार्गदर्शन करताना राष्ट्रनायक महादेव जानकर |
शिर्डी : यशवंत नायक ब्यूरो
मोठ्या पक्ष्यांच्या भरोशावर न राहता आगामी सर्व निवडणुका राष्ट्रीय समाज पक्ष स्वबळावर लढणार आहे. कार्यकर्त्यानी निवडणुकीच्या तयारीला लागावे, असे प्रतिपादन राष्ट्रीय समाज पक्षाचे संस्थापक राष्ट्रीय अध्यक्ष महादेव जानकर यांनी केले. दि. ४/१०/२०२२ रोजी हॉटेल शंतिकमल येथे रासप उत्तर महाराष्ट्र पदाधिकारी यांचे चर्चासत्र आयोजित करण्यात आले होते.
यावेळी श्री जानकर म्हणाले, स्थानिक बूथ बांधणीपासून ते लोकसभा पर्यंतच्या सर्व कमिट्या सक्रिय करून कार्यकर्त्यांनी लोकसभा व विधानसभा निवडणुकीच्या तयारीला लागावे. राष्ट्रीय समाज पक्ष सामान्य माणसाला नेता करणारा पक्ष आहे. सर्व जाती धर्मातील पंथातील वंचित घटकांना सोबत घेऊन काम करत आहे. कार्यकर्त्यांनी सर्वसामान्यांच्या प्रश्नावर लढले पाहिजे. शेतकऱ्याच्या शेतमालाला बाजार भाव नाही, पावसाने पिके पाण्यात गेलीत, अद्याप पंचनामे नाहीत. सर्वसामान्य लोकांत जाऊन त्यांच्या समस्या पक्षाच्या माध्यमतून सोडवा असे आवाहन केले.
या चर्चासत्रात राष्ट्रीय संघटक पंडित घोळवे, प्रदेशाध्यक्ष काशिनाथ शेवते, राज्य महासचिव ज्ञानेश्वर सलगर, उत्तर महाराष्ट्र अध्यक्ष शरद बाचकर, प्रदेश सचिव राजेंद्र पोथारे, रवींद्र कोठारी, राज्य कार्यकारणी सदस्य डॉ. प्रल्हाद पाटील, सय्यद बाबा शेख, विद्यार्थी आघाडी राज्यअध्यक्ष शरद दडस, पश्चिम महाराष्ट्र अध्यक्ष अजित पाटील, अहमदनगर जिल्हा अध्यक्ष नानासाहेब जुंधारे, शिर्डी लोकसभा अध्यक्ष डॉ. सुनील चींधे, अहमदनगर जिल्हा सचिव दत्तात्रय कचरे, अहमदनगर जिल्हाध्यक्ष कोरडकर, नाशिक जिल्हाध्यक्ष डॉ. अरुण आव्हाड, जळगाव जिल्हाध्यक्ष विठ्ठल शिंगाडे, उत्तर महाराष्ट्र कार्यकारणी सदस्य रंभाजी खेमनर, भरतसिंह पाटील, कैलास हळनोर, उत्तर महाराष्ट्र सचिव प्रेमचंद पळशीकर, जिल्हा उपाध्यक्ष नानासाहेब काटकर, राहता तालुकाध्यक्ष गणेश बनकर, शिर्डी शहराध्यक्ष वैभव सोनवणे आदीसह उत्तर महाराष्ट्र पदाधिकारी उपस्थित होते.
No comments:
Post a Comment