रासपचे गुजरात मिशन यशस्वी होईल : एस एल अक्कीसागर
गुजरात विधानसभा निवडणुकीत राष्ट्रीय समाज पक्षाकडून लढण्यासाठी अनेकजण इच्छुक
वडोदरा - गुजरात : आगामी विधानसभा निवडणुकीत गुजरात राज्यात राष्ट्रीय समाज पक्षाचे मिशन पूर्ण होईल, असा विश्वास रासपचे संस्थापक सदस्य एस एल अक्कीसागर यांनी यशवंत नायक जवळ व्यक्त केला.
दिनांक 8 ऑक्टोबर 2022 रोजी राष्ट्रीय समाज पक्षाचे भूतपूर्व राष्ट्रीय अध्यक्ष एस. एल अक्कीसागर हे गुजरात राज्याच्या दौऱ्यावर आले होते. सकाळी 11 ते 4 वाजेपर्यंत गुजरात पाल महासभेच्या खुल्या संसद सत्रात उपस्थिती दाखवून श्री. अक्कीसागर यांनी विचार मांडले. सायंकाळी एस एल अक्कीसागर, राष्ट्रीय महासचिव कुमार सुशील, राष्ट्रीय संघटक बाळकृष्ण लेंगरे हे सयाजीगंज येथील हॉटेल आदिती येथे मुक्कामी होते. श्री. अक्कीसागर गुजरात दौऱ्यावर आल्याचे समजताच राष्ट्रीय समाज पक्षाचे गुजरात प्रदेशाध्यक्ष दिलीपसिंह गोहिल बापू, गुजरात प्रभारी सुशील शर्मा यांनी उपस्थित राहून भेट घेतली. पादरा नगरपालिकेतील नगरसेवक यांनीही उपस्थित राहून पक्षश्रेष्ठी यांचे मार्गदर्शन व आशीर्वाद मिळवले. दरम्यान गुजरात राज्य समन्वयक जतीन शेठ यांनी राष्ट्रीय समाज पक्षाकडून विधानसभा निवडणूक लढण्यास इच्छुक असलेल्या लोकांची श्री. अक्कीसागर यांच्यासोबत भेट घडवून आणली.
दिनांक 9 ऑक्टोबर रोजी सकाळी 8 वाजलेपासून जामनगर, सौराष्ट्र, कच्छ, अहमदाबाद येथील नागरिकांची हॉटेल आदितीकडे वर्दळ वाढली. श्री. अक्कीसागर व कुमार सुशील, सुशील शर्मा, दिलीपसिंह गोहिल यांच्या सोबत बैठकाही पार पडल्या. काही लोकांनी नव्यानेच राष्ट्रीय समाज पक्षात प्रवेशही केला. गुजरात राज्यात विधानसभा निवडणुकीची जबाबदारी प्रदेशाध्यक्ष दिलीप सिंह गोहिल बापू यांच्याकडे दिली असल्याचे श्री. अक्कीसागर यांनी जाहीर केले.
रासपला प्रसिध्दी देऊ नये यासाठी विविध वृत्तवाहिन्यांवर दिल्लीतून दबाव टाकला जात असल्याचा आरोप श्री. गोहिल यांनी यशवंत नायकशी बोलताना व्यक्त केला. कोणासोबतही युती न करता राष्ट्रीय समाज पक्ष सार्वत्रिक विधानसभा निवडणुक लढवनार आहे. किरणभाई कनसारा (अहमदाबाद) यांची गुजरात प्रदेश प्रवक्तेपदी घोषणा केली. ते अहमदाबाद येथील पक्ष कार्यालयात पक्षाची भूमिका मांडतील. प्रकाश पटेल यांची वडोदरा शहर सोबत मध्य गुजरात येेेथील जबाबदारीही सोपवली.
बैठकीत गुजरात राज्य समन्वयक जतीन शेठ, प्रविणभाई नाहरिया (सौराष्ट्र), सुरेंद्रसिंग यादव, हरिजिवन पंचमतिया (जमखंबलिया, जामनगर), डॉ. शैलेश जोशी ( उपाध्यक्ष भुज, कच्छ रासप), वत्साभाई जापडा (जामनगर), अहजाभाई जापडा, प्रकाश पटेल (वडोदरा शहर अध्यक्ष) नगाजिभाई जापडा, लखाभाई जापडा, लखमणभाई करमुर ( जिल्हाध्यक्ष जामनगर जिल्हा रासप), रोहित बदियानी (प्रसिध्दी प्रमुख गुजरात रासप), दादासाहेब कोडलकर, रौनक चव्हाण आदी उपस्थित होते.
या विधानसभा मतदार क्षेत्रात रासपचे उमेदवार जाहीर
- दिलीपसिंह गोहिल (1 अबदासा)
- प्रकाश पटेल (145 मांजलपुर)
- नैनाबेन परमार (141 शहरवाडी, बरोडा)
- नागराजजभाई जापडा (77 जामनगर ग्रामीण)
- पृथ्वीसिंग गोहिल (140 दभोई)
अन्य क्षणचित्रे:
No comments:
Post a Comment