Wednesday, October 12, 2022

ओबीसी जनमोर्चा संघटनेच्या राज्य कार्यकारिणी व जिल्हा पदाधिकारी यांचे चर्चासत्र

ओबीसी जनमोर्चा संघटनेच्या राज्य कार्यकारिणी व जिल्हा पदाधिकारी यांचे चर्चासत्र मुंबईत पार पडले

ओबीसी जनमोर्चा संघटनेच्या राज्य कार्यकारिणी व जिल्हा पदाधिकारी यांचे चर्चासत्र सेमिनार सोमवार दि.१० ऑक्टोबर २०२२ रोजी मुंबई मराठी पत्रकार संघ हॉल,फोर्ट येथे अध्यक्ष माजी आमदार प्रकाश आण्णा शेंडगे यांच्या अध्यक्षतेखाली पार पडले.

दीपप्रज्वलन  करून पहिल्या सत्राला सुरुवात झाली. सकाळी ठीक १० वाजता सुरु झालेले सेमिनार संध्याकाळी ६ वाजेपर्यंत चालले,या चर्चासत्रात पदाधिकारी,विद्यार्थी तसेच महिला प्रतिनिधींनी सहभाग घेतला.

ओबीसी जनमोर्चाचे कार्याध्यक्ष चंद्रकांत बावकर यांनी प्रस्तावना मांडली तसेच उपाध्यक्ष जे.डी.तांडेल,टी.पी.मुंडे साहेब यांनी विषयाची मांडणी करून जनमोर्चा निर्मिती व रोखठोक भूमिका यावर विवेचन केले.

महाराष्ट्र राज्यातील बहुसंख्येने पदाधिकारी उपस्थित राहिले होते.महिला राज्य अध्यक्षा प्रेमललाताई साळी,कार्यकारणी सदस्य सुवर्णाताई पाटील यांनी विचार मांडले तर सरचिटणीस अरविंद डाफळे, प्रा.दिगंबर लोहार, चिटणीस कृष्णा वणे यांनी स्वागत केले.

अध्यक्ष प्रकाश आण्णा शेंडगे यांनी जनमोर्चाचा प्रवास आणि आरक्षण बाबत भूमिका स्पष्ट केली. राज्यभरातील आंदोलने, सरकार सोबत बैठका आणि मिळालेलं यश याबाबत त्यांनी कार्यकर्त्यांना धन्यवाद दिले. जातनिहाय जणगणनेसाठी आंदोलनात्मक भूमिका निश्चित करण्यासाठी विविध उपस्थित पदाधिकारी यांनी आपली मते व्यक्त केली. राज्यभरातील विविध संघटना सोबत घेवून ओबीसी जातनिहाय जनगणना व्हावी म्हणून लोक प्रतिनिधीना घेराव,ओबीसी जनजागृती रथयात्रा तसेच रस्त्यावर उतरून आंदोलन करण्यात यावे. तसेच प्रत्येक जिल्ह्यात ओबीसी महामोर्चा काढून जिल्हाधिकारी यांना निवेदन देणे,यापुढे ओबीसी सोडून कुणाही प्रस्थापित आमदार खासदार यांना ओबीसींनी मतदान करू नये अशा प्रकारचे आंदोलन घेण्यात यावीत व यापुढे आक्रमक लढाई सुरु करावी अशा सूचना करण्यात आल्या.

सुप्रीम कोर्टाने मराठा समाजाला दिलेले घटनाबाह्य आरक्षण रद्द ठरविलेले आहे.आजवर ६ मागासवर्गीय आयोगांनी मराठा समाज मागास नाही असे अहवाल दिले आहेत.मंडल आयोगाला मराठा समाजाने कडाडून टोकाचा विरोध केला आहे.मराठा कुणबी एक आहेत म्हणून आम्हाला आरक्षण द्या सांगणारे महाराष्ट्रातील प्रस्थापित मराठा समाज आता ओबीसी मध्ये घुसखोरी करू पाहत आहे.मराठा समाजात गरीब लोक आहेत परंतु त्यांची गरिबी दूर करण्याला आरक्षण हा पर्याय नाहीच,सरकारने योजना निर्माण करून मराठा समाजासह सर्वच समाजाची गरिबी दूर करावी.

आरक्षण हे प्रतिनिधित्व असून मराठा समाजातील आम जनतेला गुमराह केले जात आहे. मराठा समाज जर ओबीसीत आला तर ओबीसीच्या पिढ्यांचे वाटोळे होईल.आधीच जातीय व्यवस्थेत भरडणारा हा गोरगरीब ओबीसी समाज नेस्तनाबुत होईल म्हणून मराठा समाजाचा ओबीसी प्रवर्गात समाजात समावेश नको अशी भूमिका ओबीसी जनमोर्चा व सहयोगी संस्था यांनी घेतली आहे. यासाठी राज्यसरकारला व मागासवर्गीय आयोगाला भेट घेवून लिखित पत्र देण्यात येणार आहे. 

ओबीसी जनमोर्चा आगामी काळात जिल्हा व तालुका पातळीवरील संघटना बांधणीचे मोहीम हाती घेणार आहे.गाव तिथे शाखा तसेच तालुका,जिल्हा कार्यकारणी बांधणीचे काम पुढील महिन्यापासून सुरु करण्यात येणार आहे.ओबीसींच्या प्रलंबित मागण्याबाबत येणाऱ्या विधिमंडळ अधिवेशन सुरु होण्याच्या पूर्वी मोठे आंदोलन ओबीसी जनमोर्चाच्यावतीने होणार आहे.ओबीसींची राजकीय भूमिका काय असावी ? यावर विचारविनिमय करण्यात आले.ओबीसींचा नवीन स्वतंत्र पक्ष काढावा असे बहुसंख्येने पदाधिकारी यांनी सूचना मांडली,भविष्यात नक्कीच ओबीसी नेते एकत्र येवून याबाबत भूमिका घेण्यात येईल आजतरी निवडणुकीत ओबीसी जनमोर्चा महत्वाची भूमिका पार पाडेल व येणाऱ्या निवडणुकीत ओबीसी मुख्यमंत्री व्हावा म्हणून प्रयत्नशील राहील. करणे.या विषयावर विचार मंथन करण्यात आले.

तसेच,ओबीसी जनमोर्चाचा 10 नोव्हेंबरला रायगड जिल्हा कलेक्टर कार्यालयावर ओबीसींचा प्रचंड मोर्चा निघणार याची ओबीसी नेते  मा आ प्रकाश आण्णा शेंडगे व रायगड जिल्हाध्यक्ष सुरेश मगर यांनी घोषणा केली घोषणा. शेवटी जे. डी तांडेल यांनी समारोप करून चर्चा सत्राची सांगता केली. 


यासाठी मा. आ. प्रकाश आण्णा शेंडगे, चंद्रकांत बावकर, जे.डी.तांडेल, प्रा.टी. पी.मुंडे, प्रेमलता साळी, लक्ष्मण गायकवाड, रमेश पिसे, शिवाजीराव ढेकले, मच्छिद्र भोसले, अरविंद डाफळे, तुकाराम साठे, अँड.पल्लवी रेणके, दिगंबर लोहार, दीपक म्हात्रे, कृष्णा वने, गजानन राठोड, राजेंद्र वणारसे, शांताराम दिघे, संगीता ढोके, सुवर्णाताई पाटील, उमेश कोरम, नितीन आंधळे, रफीक कुरेशी, गजेंद्र भोसले, अनिल शिंदे, अनिल आप्पा धायगुडे, संभाजी काजरेकर, सुरेश मगर, डी. टी.पवार व इतर पदाधिकारी उपस्थित होते !

No comments:

Post a Comment

चागंले संस्कार टिकविण्यासाठी वाचन संस्कृतीची गरज : डॉ. शंकर स्वामी वडेपुरीकर

चागंले संस्कार टिकविण्यासाठी वाचन संस्कृतीची गरज : डॉ. शंकर स्वामी वडेपुरीकर ‌पु.अहिल्यादेवी वाचनालयात " वाचन संकल्प महाराष्ट्राचा...