खामगाव बुलढाणा येथे मेंढपालांचा मेंढपाळांचा आरोळी मोर्चा
आरोळी मोर्चा यशस्वी झाला.
पुकळेवाडीत दिवाळी साजरी
पुकळेवाडी ता - माण जिल्हा सातारा येथे मेंढ्या पळवण्याचा कार्यक्रम सह वाजत गाजत फटाकड्या वाजवून दिवाळी मोठ्या जल्लोषात साजरी करण्यात आली.
राष्ट्रीय समाज पक्ष तर्फे 'सरदार वल्लभभाई पटेल' यांच्या जयंतीनिमित्त विनम्र अभिवादन
अहमदाबाद : यशवंत नायक ब्यूरो स्वतंत्र भारताचे पहिले उपप्रधानमंत्री पोलादी महापुरुष सरदार वल्लभाई पटेल यांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून राष्ट्रीय समाज पक्ष तर्फे १४७ व्या जयंती निमित्त विनम्र अभिवादन करन्यात आले.
यावेळी रासपचे गुजरात राज्य माजी महामंत्री संजयभाई वाघमोडे, मध्य गुजरात अध्यक्ष तथा मांजलपुर विधानसभा मतदार क्षेत्राचे उमेदवार प्रकाश पटेल, सुनील सपकाळ, देवीलाल अगरवाल, नरेंद्र सिंग परमार व अन्य उपस्थित होते. सरदार वल्लभभाई पटेल यांचा शेतकरी कुटुंबात जन्म झाला. खेडा येथील शेतकरी सत्याग्रह आंदोलनात त्यांनी पुढाकार घेतला. भारत पाकिस्तान युद्धात त्यांनी महत्वाची भूमिका बजावली. भारतीय संघ राज्यात संस्थाने विलीन करण्यात त्यांनी महत्वाचे योगदान दिले.
यशवंत नायकची वाटचाल कठीण परिस्थितीत झाली : संपादक महादेव जानकर
नवी मुंबई : यशवंत नायक ब्यूरो
मासिक विश्वाचा यशवंत नायक अंकाची सुरुवात कठीण परिस्थितीत झाली. यशवंत नायकने दर्जेदार लिखाण केले आहे. डिजिटल मीडिया, प्रचार प्रसारमाध्यमांची भाऊ गर्दी वाढली असताना देखील यशवंत नायकने स्वतंत्र अस्तित्व ठेवले आहे. आर्थिक परिस्थितीमुळे यशवंत नायक अंक ब्लॅक अँड व्हाईट खूप दिवस काढत होतो. मार्च २०२१ पासून यशवंत नायक अंक कलर प्रिंट काढत आहोत. यशवंत नायक राष्ट्रीय समाज पक्षाचे मुखपत्र असून प्रत्येक पदाधिकारी यांना अनिवार्य करण्यात आले आहे. यशवंत नायकचे सभासद वाढवण्यासाठी रासप जिल्हाध्यक्षांनी यशवंत नायक प्रतिनिधीस मदत करावी असे आवाहान केले. यशवंत नायकचे काम वाढले पाहिजे, सर्वांनी यशवंत नायकला जाहिरात द्यावी. कार्यकारी संपादक एस. एल अक्कीसागर यांचे कौतुक व अभिनंदन करत पनवेल येथे 'विश्वाचा यशवंत नायक'चे संपादक, मालक महादेवजी जानकर साहेब यांनी मासिक विश्वाचा यशवंत नायक अंकाच्या 29 व्या वर्धापनदिनानिमित्त यशवंत नायकचे उपसंपादक आबासो पुकळे यांच्याकडे अंकांची सहयोग राशी देऊन वर्धापन दिनाच्या शुभेच्छा व्यक्त केल्या. यावेळी श्रीकांत भोईर, भगवान ढेबे, मुकेश भगत, दिपांकी जाधव आदी उपस्थित होते.
देशभरातील गडरिया समाजाने महादेव जानकर यांना साथ देऊन देशाची सत्ता हस्तगत करावी : एस एल अक्कीसागर
वडोदरा : यशवंत नायक ब्यूरो
गुजरात मध्ये प्रामुख्याने चारण व दरबार समाज आहेत. राष्ट्रीय समाज पक्षाचे येथील गुजरात अध्यक्ष दिलीपसिंह गोहिल आहेत. चारण समाज व दरबार समाज एकत्र आल्यास लवकरच राजकीय सत्ता मिळवता येईल. देशभरातील गडरिया समाजाने महादेव जानकर यांच्या नेतृत्वात राष्ट्रीय समाज पक्षास साथ देऊन देशाची सत्ता हस्तगत करावी, असे प्रतिपादन राष्ट्रीय समाज पक्षाचे भूतपूर्व राष्ट्रीय अध्यक्ष एस एल अक्कीसागर यांनी केले. ते पुढे म्हणाले, समाजनिती व राजनीतीत महाराणी अहिल्याबाई होळकर या देशात नव्हे तर जगाच्या आदर्श आहेत. गुजरात मध्ये राष्ट्रीय समाज पक्ष सर्व समाजाला सोबत घेऊन येथील रजकारनाची दिशा बदलत आहे.
उत्तर प्रदेशचे माजी राज्यमंत्री सतीष पाल यांनी सत्ताधारी नेत्यावर आरक्षणाच्या मुद्द्यावर जोरदार घणाघात केला. नेता व्हायचे असेल तर महादेव जानकर यांच्या सारखे नेता व्हावे. कुमार सुशील म्हणाले, भाजपच्या राजकारणात पाल समाज बेदखल आहे. भाजपचे भटक्या विमुक्त आघाडीचे पद घेऊन काम करणारे समाजास न्याय देऊ शकत नाहीत. बाळकृष्ण लेंगरे यांनी इतीहासाचे दाखले दिले व समाजाने प्रगती करावी असे आवाहन केले.
गुजरात पाल महासभा गुजरात प्रदेश तर्फे दिनांक ८ ऑक्टोबर २०२२ रोजी श्रीजी पार्टी प्लॉट, आजवा चौकडी, नेशनल हायवे, वडोदरा येथे सकाळी ११ ते सायंकाळी ६ वाजेपर्यंत भारतीय गडरिया संसदचे आयोजन केले होते. मान्यवरांच्या उपस्थितीत महाराणी अहिल्याबाई होळकर यांच्या प्रतिमेचे पूजन व दिपप्रजवलन करून कार्यक्रमास सुरुवात झाली. सकाळच्या सत्रात देशभरातून आलेल्या उपस्थित मान्यवर यांचा परिचय व आदर सत्कार करण्यात आला. दि. ९ ऑक्टोबर रोजी पंडित दीनदयाळ हॉल येथे पालधारा समिट कार्यक्रम पार पडला. दोन्ही कार्यक्रमास एस एल अक्कीसागर, बाळकृष्ण लेंगरे(मामा), कुमार सुशील, दादासाहेब कोडलकर, आबासो पुकळे उपस्थित राहिले. रासप गुजरात राज्य शाखेचे अध्यक्ष दिलीपसिंह गोहिल यांनी गुजरात पाल महासभेच्या कार्यक्रमास उपस्थित राहिलेल्या अतिथीगण व मान्यवरांचा शाल श्रफळ देऊन सत्कार सन्मान केला. पाल महासभेसाठी पूर्व राज्यमंत्री जगमोहन बघेल, माजी खा. विकास महात्मे, झाशीचे माजी जिल्हा परिषद अध्यक्ष राकेश पाल, इंदौरचे नगरसेवक सुधीर दोडगे, बापूसाहेब शिंदे, रविकांत बघेल, रामबचन पाल, नेमसिंह बघेल, शारदाताई दोगडे, धर्मवीरसिंह बघेल, गोपीनाथ कुरमा, डॉ. दर्शना परीहार व अन्य मान्यवर उपस्थित होते.
महादेव जानकर यांचे इटावा येथे जोरदार स्वागत
इटावा : यशवंत नायक ब्यूरो
(१९/१०/२२) राष्ट्रीय समाज पार्टीचे राष्ट्रीय अध्यक्ष महादेव जानकरजी यांचे जनपद इटावा येथे आगमन झाले. त्यावेळी राष्ट्रीय महासचिव कुमार सुशील, प्रदेश अध्यक्ष चन्द्रपाल, प्रदेश प्रवक्ता श्री महेंद्र सिंह पाल, जिला अध्यक्ष इटावा राजीव पालजी यांच्या शिष्टमंडळाने महादेव जानकर यांचे जोरदार स्वागत व अभिनंदन केले.
उपस्थितांना महादेव जानकर यांनी पार्टीची निती आणि विचारधारा याची माहिती सांगितली. तसेच संगठन कसे मजबूत करता येईल याबाबत सविस्तर चर्चा केली.
![]() |
उत्तर महाराष्ट्र पदाधिकारी चर्चासत्रात मार्गदर्शन करताना राष्ट्रनायक महादेव जानकर |
शिर्डी : यशवंत नायक ब्यूरो
मोठ्या पक्ष्यांच्या भरोशावर न राहता आगामी सर्व निवडणुका राष्ट्रीय समाज पक्ष स्वबळावर लढणार आहे. कार्यकर्त्यानी निवडणुकीच्या तयारीला लागावे, असे प्रतिपादन राष्ट्रीय समाज पक्षाचे संस्थापक राष्ट्रीय अध्यक्ष महादेव जानकर यांनी केले. दि. ४/१०/२०२२ रोजी हॉटेल शंतिकमल येथे रासप उत्तर महाराष्ट्र पदाधिकारी यांचे चर्चासत्र आयोजित करण्यात आले होते.
यावेळी श्री जानकर म्हणाले, स्थानिक बूथ बांधणीपासून ते लोकसभा पर्यंतच्या सर्व कमिट्या सक्रिय करून कार्यकर्त्यांनी लोकसभा व विधानसभा निवडणुकीच्या तयारीला लागावे. राष्ट्रीय समाज पक्ष सामान्य माणसाला नेता करणारा पक्ष आहे. सर्व जाती धर्मातील पंथातील वंचित घटकांना सोबत घेऊन काम करत आहे. कार्यकर्त्यांनी सर्वसामान्यांच्या प्रश्नावर लढले पाहिजे. शेतकऱ्याच्या शेतमालाला बाजार भाव नाही, पावसाने पिके पाण्यात गेलीत, अद्याप पंचनामे नाहीत. सर्वसामान्य लोकांत जाऊन त्यांच्या समस्या पक्षाच्या माध्यमतून सोडवा असे आवाहन केले.
या चर्चासत्रात राष्ट्रीय संघटक पंडित घोळवे, प्रदेशाध्यक्ष काशिनाथ शेवते, राज्य महासचिव ज्ञानेश्वर सलगर, उत्तर महाराष्ट्र अध्यक्ष शरद बाचकर, प्रदेश सचिव राजेंद्र पोथारे, रवींद्र कोठारी, राज्य कार्यकारणी सदस्य डॉ. प्रल्हाद पाटील, सय्यद बाबा शेख, विद्यार्थी आघाडी राज्यअध्यक्ष शरद दडस, पश्चिम महाराष्ट्र अध्यक्ष अजित पाटील, अहमदनगर जिल्हा अध्यक्ष नानासाहेब जुंधारे, शिर्डी लोकसभा अध्यक्ष डॉ. सुनील चींधे, अहमदनगर जिल्हा सचिव दत्तात्रय कचरे, अहमदनगर जिल्हाध्यक्ष कोरडकर, नाशिक जिल्हाध्यक्ष डॉ. अरुण आव्हाड, जळगाव जिल्हाध्यक्ष विठ्ठल शिंगाडे, उत्तर महाराष्ट्र कार्यकारणी सदस्य रंभाजी खेमनर, भरतसिंह पाटील, कैलास हळनोर, उत्तर महाराष्ट्र सचिव प्रेमचंद पळशीकर, जिल्हा उपाध्यक्ष नानासाहेब काटकर, राहता तालुकाध्यक्ष गणेश बनकर, शिर्डी शहराध्यक्ष वैभव सोनवणे आदीसह उत्तर महाराष्ट्र पदाधिकारी उपस्थित होते.
![]() |
मुलायसिंह यादव यांच्या प्रतिमेस पुष्पांजली अर्पण करून रासपतर्फे भावपूर्ण श्रद्धांजली वाहताना महादेव जानकर, समवेत उत्तर प्रदेशचे माजी मुख्यमंत्री अखिलेश यादव. |
इटावा (उत्तर प्रदेश) : भारताचे माजी संरक्षणमंत्री, मैनपुरीचे खासदार मुलायमसिंह यादव यांच्या प्रतिमेस पुष्पांजली अर्पण करीत राष्ट्रीय समाज पक्षाचे संस्थापक राष्ट्रीय अध्यक्ष महादेव जानकर यांनी भावपूर्ण श्रद्धांजली वाहिली. त्यांच्या दुःखद निधनाबद्दल शोक व्यक्त करून त्यांचे पुत्र अखिलेश यादव यांची भेट घेऊन सांत्वन केले. यावेळी खा. रामगोपाल यादव - महासचिव सपा, आ. शिवपाल यादव, उत्तर प्रदेश रासप अध्यक्ष चंद्रपाल, महासचिव भुरेसिंह, इटावा, गाजियाबाद, कंनोज, ओरेया, जिल्हा रासप कार्यकारिणी पदाधिकारी व शेकडो कार्यकर्ते उपस्थित होते.
बारामती लोकसभा मतदारसंघात राष्ट्रीय समाज पक्षाने पुन्हा एकदा लक्ष घातले आहे. नुकत्याच बाबीरगड येथे झालेल्या मेळाव्यात पक्षाचे संस्थापक राष्ट्रीय अध्यक्ष महादेव जानकर बारामती लोकसभा निवडणुक लढतील, असे महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष काशिनाथ शेवते यांनी जाहीर केले आहे. रासपच्या घोषणेने भाजपच्या मिशन बारामतीला सुरुंग लागणार, याबाबत तर्क वितर्क व्यक्त केले जात आहेत. अशातच कालपासून बारामती लोकसभा मतदारसंघात एस. एल अक्कीसागर दाखल झाले आहेत. श्री. अक्कीसागर स्वत: बारामती लोकसभा मतदार क्षेत्रात प्रत्यक्ष लोकांच्या गाठीभेटी घेत आहेत. राजकीय निरीक्षक म्हणून एस एल अक्कीसागर बारामती लोकसभा मतदार क्षेत्रात आले आहेत, अशी माहिती रासपच्या विश्वसनीय सूत्रांकडून देण्यात आली आहे. बारामती लोकसभा मतदारसंघात पत्रकार परिषद घेणार असल्याचे समजत आहे. एस एल अक्कीसागर हे राष्ट्रीय समाजाला दिल्लीच्या सत्तेकडे घेऊन जाणाऱ्या राजमार्गाचे मार्गदर्शक आहेत. महादेव जानकर आणि राष्ट्रीय समाज पक्ष नावारूपाला आणण्यात त्यांची महत्वाची भूमिका राहिली आहे. भाजपच्या मिशनला छेदण्याचे सूत्र श्री. अक्कीसागर यांच्याकडे आहे. भाजपच्या वामननितीला शह देण्याची रणनीती त्यांच्याकडे आहे. अक्कीसागर रासपचे शीर्ष आणि बुजुर्ग नेतृत्व आहे. महादेव जानकर यांच्या नेतृत्वात बारामतीचा गड आम्ही भेदला होता, भाजपच्या स्वार्थीपणामुळे शरद पवाराना पुन्हा प्रस्थापित केले आहे. असा त्यांचा दावा आहे.
गुजरात विधानसभा निवडणुकीत राष्ट्रीय समाज पक्षाकडून लढण्यासाठी अनेकजण इच्छुक
वडोदरा - गुजरात : आगामी विधानसभा निवडणुकीत गुजरात राज्यात राष्ट्रीय समाज पक्षाचे मिशन पूर्ण होईल, असा विश्वास रासपचे संस्थापक सदस्य एस एल अक्कीसागर यांनी यशवंत नायक जवळ व्यक्त केला.
दिनांक 8 ऑक्टोबर 2022 रोजी राष्ट्रीय समाज पक्षाचे भूतपूर्व राष्ट्रीय अध्यक्ष एस. एल अक्कीसागर हे गुजरात राज्याच्या दौऱ्यावर आले होते. सकाळी 11 ते 4 वाजेपर्यंत गुजरात पाल महासभेच्या खुल्या संसद सत्रात उपस्थिती दाखवून श्री. अक्कीसागर यांनी विचार मांडले. सायंकाळी एस एल अक्कीसागर, राष्ट्रीय महासचिव कुमार सुशील, राष्ट्रीय संघटक बाळकृष्ण लेंगरे हे सयाजीगंज येथील हॉटेल आदिती येथे मुक्कामी होते. श्री. अक्कीसागर गुजरात दौऱ्यावर आल्याचे समजताच राष्ट्रीय समाज पक्षाचे गुजरात प्रदेशाध्यक्ष दिलीपसिंह गोहिल बापू, गुजरात प्रभारी सुशील शर्मा यांनी उपस्थित राहून भेट घेतली. पादरा नगरपालिकेतील नगरसेवक यांनीही उपस्थित राहून पक्षश्रेष्ठी यांचे मार्गदर्शन व आशीर्वाद मिळवले. दरम्यान गुजरात राज्य समन्वयक जतीन शेठ यांनी राष्ट्रीय समाज पक्षाकडून विधानसभा निवडणूक लढण्यास इच्छुक असलेल्या लोकांची श्री. अक्कीसागर यांच्यासोबत भेट घडवून आणली.
दिनांक 9 ऑक्टोबर रोजी सकाळी 8 वाजलेपासून जामनगर, सौराष्ट्र, कच्छ, अहमदाबाद येथील नागरिकांची हॉटेल आदितीकडे वर्दळ वाढली. श्री. अक्कीसागर व कुमार सुशील, सुशील शर्मा, दिलीपसिंह गोहिल यांच्या सोबत बैठकाही पार पडल्या. काही लोकांनी नव्यानेच राष्ट्रीय समाज पक्षात प्रवेशही केला. गुजरात राज्यात विधानसभा निवडणुकीची जबाबदारी प्रदेशाध्यक्ष दिलीप सिंह गोहिल बापू यांच्याकडे दिली असल्याचे श्री. अक्कीसागर यांनी जाहीर केले.
रासपला प्रसिध्दी देऊ नये यासाठी विविध वृत्तवाहिन्यांवर दिल्लीतून दबाव टाकला जात असल्याचा आरोप श्री. गोहिल यांनी यशवंत नायकशी बोलताना व्यक्त केला. कोणासोबतही युती न करता राष्ट्रीय समाज पक्ष सार्वत्रिक विधानसभा निवडणुक लढवनार आहे. किरणभाई कनसारा (अहमदाबाद) यांची गुजरात प्रदेश प्रवक्तेपदी घोषणा केली. ते अहमदाबाद येथील पक्ष कार्यालयात पक्षाची भूमिका मांडतील. प्रकाश पटेल यांची वडोदरा शहर सोबत मध्य गुजरात येेेथील जबाबदारीही सोपवली.
बैठकीत गुजरात राज्य समन्वयक जतीन शेठ, प्रविणभाई नाहरिया (सौराष्ट्र), सुरेंद्रसिंग यादव, हरिजिवन पंचमतिया (जमखंबलिया, जामनगर), डॉ. शैलेश जोशी ( उपाध्यक्ष भुज, कच्छ रासप), वत्साभाई जापडा (जामनगर), अहजाभाई जापडा, प्रकाश पटेल (वडोदरा शहर अध्यक्ष) नगाजिभाई जापडा, लखाभाई जापडा, लखमणभाई करमुर ( जिल्हाध्यक्ष जामनगर जिल्हा रासप), रोहित बदियानी (प्रसिध्दी प्रमुख गुजरात रासप), दादासाहेब कोडलकर, रौनक चव्हाण आदी उपस्थित होते.
या विधानसभा मतदार क्षेत्रात रासपचे उमेदवार जाहीर
अन्य क्षणचित्रे:
ओबीसी जनमोर्चा संघटनेच्या राज्य कार्यकारिणी व जिल्हा पदाधिकारी यांचे चर्चासत्र सेमिनार सोमवार दि.१० ऑक्टोबर २०२२ रोजी मुंबई मराठी पत्रकार संघ हॉल,फोर्ट येथे अध्यक्ष माजी आमदार प्रकाश आण्णा शेंडगे यांच्या अध्यक्षतेखाली पार पडले.
दीपप्रज्वलन करून पहिल्या सत्राला सुरुवात झाली. सकाळी ठीक १० वाजता सुरु झालेले सेमिनार संध्याकाळी ६ वाजेपर्यंत चालले,या चर्चासत्रात पदाधिकारी,विद्यार्थी तसेच महिला प्रतिनिधींनी सहभाग घेतला.
ओबीसी जनमोर्चाचे कार्याध्यक्ष चंद्रकांत बावकर यांनी प्रस्तावना मांडली तसेच उपाध्यक्ष जे.डी.तांडेल,टी.पी.मुंडे साहेब यांनी विषयाची मांडणी करून जनमोर्चा निर्मिती व रोखठोक भूमिका यावर विवेचन केले.
महाराष्ट्र राज्यातील बहुसंख्येने पदाधिकारी उपस्थित राहिले होते.महिला राज्य अध्यक्षा प्रेमललाताई साळी,कार्यकारणी सदस्य सुवर्णाताई पाटील यांनी विचार मांडले तर सरचिटणीस अरविंद डाफळे, प्रा.दिगंबर लोहार, चिटणीस कृष्णा वणे यांनी स्वागत केले.
अध्यक्ष प्रकाश आण्णा शेंडगे यांनी जनमोर्चाचा प्रवास आणि आरक्षण बाबत भूमिका स्पष्ट केली. राज्यभरातील आंदोलने, सरकार सोबत बैठका आणि मिळालेलं यश याबाबत त्यांनी कार्यकर्त्यांना धन्यवाद दिले. जातनिहाय जणगणनेसाठी आंदोलनात्मक भूमिका निश्चित करण्यासाठी विविध उपस्थित पदाधिकारी यांनी आपली मते व्यक्त केली. राज्यभरातील विविध संघटना सोबत घेवून ओबीसी जातनिहाय जनगणना व्हावी म्हणून लोक प्रतिनिधीना घेराव,ओबीसी जनजागृती रथयात्रा तसेच रस्त्यावर उतरून आंदोलन करण्यात यावे. तसेच प्रत्येक जिल्ह्यात ओबीसी महामोर्चा काढून जिल्हाधिकारी यांना निवेदन देणे,यापुढे ओबीसी सोडून कुणाही प्रस्थापित आमदार खासदार यांना ओबीसींनी मतदान करू नये अशा प्रकारचे आंदोलन घेण्यात यावीत व यापुढे आक्रमक लढाई सुरु करावी अशा सूचना करण्यात आल्या.
सुप्रीम कोर्टाने मराठा समाजाला दिलेले घटनाबाह्य आरक्षण रद्द ठरविलेले आहे.आजवर ६ मागासवर्गीय आयोगांनी मराठा समाज मागास नाही असे अहवाल दिले आहेत.मंडल आयोगाला मराठा समाजाने कडाडून टोकाचा विरोध केला आहे.मराठा कुणबी एक आहेत म्हणून आम्हाला आरक्षण द्या सांगणारे महाराष्ट्रातील प्रस्थापित मराठा समाज आता ओबीसी मध्ये घुसखोरी करू पाहत आहे.मराठा समाजात गरीब लोक आहेत परंतु त्यांची गरिबी दूर करण्याला आरक्षण हा पर्याय नाहीच,सरकारने योजना निर्माण करून मराठा समाजासह सर्वच समाजाची गरिबी दूर करावी.
आरक्षण हे प्रतिनिधित्व असून मराठा समाजातील आम जनतेला गुमराह केले जात आहे. मराठा समाज जर ओबीसीत आला तर ओबीसीच्या पिढ्यांचे वाटोळे होईल.आधीच जातीय व्यवस्थेत भरडणारा हा गोरगरीब ओबीसी समाज नेस्तनाबुत होईल म्हणून मराठा समाजाचा ओबीसी प्रवर्गात समाजात समावेश नको अशी भूमिका ओबीसी जनमोर्चा व सहयोगी संस्था यांनी घेतली आहे. यासाठी राज्यसरकारला व मागासवर्गीय आयोगाला भेट घेवून लिखित पत्र देण्यात येणार आहे.
ओबीसी जनमोर्चा आगामी काळात जिल्हा व तालुका पातळीवरील संघटना बांधणीचे मोहीम हाती घेणार आहे.गाव तिथे शाखा तसेच तालुका,जिल्हा कार्यकारणी बांधणीचे काम पुढील महिन्यापासून सुरु करण्यात येणार आहे.ओबीसींच्या प्रलंबित मागण्याबाबत येणाऱ्या विधिमंडळ अधिवेशन सुरु होण्याच्या पूर्वी मोठे आंदोलन ओबीसी जनमोर्चाच्यावतीने होणार आहे.ओबीसींची राजकीय भूमिका काय असावी ? यावर विचारविनिमय करण्यात आले.ओबीसींचा नवीन स्वतंत्र पक्ष काढावा असे बहुसंख्येने पदाधिकारी यांनी सूचना मांडली,भविष्यात नक्कीच ओबीसी नेते एकत्र येवून याबाबत भूमिका घेण्यात येईल आजतरी निवडणुकीत ओबीसी जनमोर्चा महत्वाची भूमिका पार पाडेल व येणाऱ्या निवडणुकीत ओबीसी मुख्यमंत्री व्हावा म्हणून प्रयत्नशील राहील. करणे.या विषयावर विचार मंथन करण्यात आले.
तसेच,ओबीसी जनमोर्चाचा 10 नोव्हेंबरला रायगड जिल्हा कलेक्टर कार्यालयावर ओबीसींचा प्रचंड मोर्चा निघणार याची ओबीसी नेते मा आ प्रकाश आण्णा शेंडगे व रायगड जिल्हाध्यक्ष सुरेश मगर यांनी घोषणा केली घोषणा. शेवटी जे. डी तांडेल यांनी समारोप करून चर्चा सत्राची सांगता केली.
यासाठी मा. आ. प्रकाश आण्णा शेंडगे, चंद्रकांत बावकर, जे.डी.तांडेल, प्रा.टी. पी.मुंडे, प्रेमलता साळी, लक्ष्मण गायकवाड, रमेश पिसे, शिवाजीराव ढेकले, मच्छिद्र भोसले, अरविंद डाफळे, तुकाराम साठे, अँड.पल्लवी रेणके, दिगंबर लोहार, दीपक म्हात्रे, कृष्णा वने, गजानन राठोड, राजेंद्र वणारसे, शांताराम दिघे, संगीता ढोके, सुवर्णाताई पाटील, उमेश कोरम, नितीन आंधळे, रफीक कुरेशी, गजेंद्र भोसले, अनिल शिंदे, अनिल आप्पा धायगुडे, संभाजी काजरेकर, सुरेश मगर, डी. टी.पवार व इतर पदाधिकारी उपस्थित होते !
नातेपुते : शहरामध्ये मुस्लिम बांधवांच्या वतीने दिनांक 9 ऑक्टोंबर रविवार रोजी ईद-ए-मिलादुन्नबी अर्थात पैगंबर जयंती मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली. यानिमित्त विविध सामाजिक उपक्रमांचे आयोजन करण्यात आले होते,यानिमित्त काढण्यात आलेल्या झेंडा मिरवणुकीत तरुणांचा लक्षणीय सहभाग होता,पारंपारिक पध्दतीने मोठ्या उत्साहात दोन वर्षानंतर जुलूस मिरवणुक निघाली असल्याने सुमारे शकडो जणांच्या सहभागाने प्रतिकात्मक मिरवणूक काढण्यात आली.या मिरवणुकीत मुस्लीम बांधव मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.पवित्र ईद-ए-मिलाद जयंतीची तयारी मुस्लिम बांधवांनी जोरदार केली होती.ईदनिमित्त शाही मस्जिद प्रार्थनास्थळ या परिसर मध्ये ठिकाणी आकर्षक सजावट करण्यात आली होती,विशेषता भारतीय महापुरुष सुफी संत यांचे इस्लाम आणि प्रेषित हजरत मोहम्मद पैगंबरांचे या सृष्टीसाठी व मानवता कल्याणासाठी असलेले पावित्र्य योगदान व विचार पोस्टर पाठीच्या माध्यमातून मिरवणुकीमध्ये प्रकाशित करण्यात आले होते, यावेळी नातेपुते पोलिस ठाण्याचे पोलीस निरीक्षक सो.प्रवीण संपागे यांच्या मार्गदर्शानाखाली पोलिसांनी मिरवणुकीसह पुणे सोलापूर महामार्गावर चोख बंदोबस्त ठेवला होता.