राष्ट्रीय समाज पक्ष, राष्ट्रीय अध्यक्षपदी महादेव जानकर यांची निवड
पणजी : नवनिर्वाचित राष्ट्रीय समाज पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष महादेव जानकर यांचा सत्कार करताना मावळते राष्ट्रीय अध्यक्ष एस एल अक्कीसागर व अन्य रासपचे माजी राष्ट्रीय कार्यकारणि पदाधिकारी. |
एस एल अक्कीसागर यांचा कार्यकाळ संपला; मापसा येथे घोषित, पणजीत नवे राष्ट्रीय अध्यक्ष महादेव जानकर मनोनित
पणजी : प्रा. ए. एस. पुकळे, यशवंत नायक ब्यूरो.
राष्ट्रीय समाज पक्षाचे संस्थापक अध्यक्ष 'राष्ट्रनायक' महादेव जानकर यांची राष्ट्रीय समाज पक्ष, राष्ट्रीय अध्यक्षपदी निवड झाल्याची घोषणा रासपचे मावळते हंगामी राष्ट्रीय अध्यक्ष एस एल अक्कीसागर यांनी पत्रकार परिषदेत केली. गोवा रासपतर्फे दि. २९ ऑगस्ट २०२१ रोजी कॉन्फरेस हॉल, ३ रा मजला, गोवा चेंबर ऑफ कॉमर्स अँड इंडस्ट्रीज, आझाद मैदान येथे दुपारी २ वाजता पत्रकार परिषदचे आयोजन केले होते.
श्री. अक्कीसागर पत्रकार परिषदेत म्हणाले, आमची हॉटेल मेंडरीन, मापसा येथे आज सकाळी ९ वाजता राष्ट्रीय समाज पक्ष राष्ट्रीय कार्यकारी समितीची बैठक पार पडली. या बैठकीसाठी रासपचे संस्थापक अध्यक्ष महादेव जानकर, मी स्वत: राष्ट्रीय अध्यक्ष एस एल अक्कीसागर, राष्ट्रीय महासचिव श्री. कुमार सुशील, श्री. प्रसन्नाकुमार, राष्ट्रीय संघटक बाळासाहेब लेंगरे, गोविंदराम शूरनर, राष्ट्रीय खजिनदार मोहन माने व अन्य साथीदार उपस्थित होते. या बैठकीत राष्ट्रीय अध्यक्ष एस एल अक्कीसागर यांचा कार्यकाळ समाप्त होत असल्याने राष्ट्रीय समाज पक्षाची राष्ट्रीय कार्यकारणी आणि सर्व राज्यातील राज्य कार्यकारिणी स्वयंप्रभावाने संपुष्टात आल्याचे घोषित केले. त्यानंतर पणजीत या ठिकाणी ११ वाजता राष्ट्रीय कार्यकारी समितीची बैठक झाली. या बैठकीत राष्ट्रीय कार्यकारी समितीचे हंगामी राष्ट्रीय अध्यक्ष एस एल अक्कीसागर यांनी सर्वानुमते राष्ट्रीय समाज पक्षाचे पुढील 'राष्ट्रीय अध्यक्ष' पदावर 'संस्थापक अध्यक्ष' महादेव जानकर यांचे नाव मनोनीत केले. त्यास श्री. के प्रसन्नाकुमार यांनी अनुमोदन दिले. राष्ट्रीय कार्यकारणीने एक मताने राष्ट्रीय समाज पक्ष, राष्ट्रीय अध्यक्षपदी महादेव जानकर यांची निवड झाल्याचे घोषित केले.
आझाद मैदान, पणजी येथे एस एल अक्कीसागर आणि महादेव जानकर |
यावेळी महाराष्ट्र, गुजरात, कर्नाटक, उत्तर प्रदेश, बिहार, तेलगंना, तमिनाडू, केरळ, गुजरात, राजस्थान येथील रासपचे प्रमुख पदाधिकारी व गोवा येथील पदाधिकारी किशोर राव, आनंद मांद्रेकर, गुरूनाम सिंह, सलमान खान, वैभवी सावंत, रमेश भूवी, प्रसाद दळवी, मदनेशवर शूरनर आदी उपस्थित होते.
No comments:
Post a Comment