Friday, August 6, 2021

मातोश्री तानुबाई बाबा शेळके अनंतात विलीन

मातोश्री तानुबाई बाबा शेळके अनंतात विलीन;१०५ व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास

तानुबाई बाबा शेळके यांचे आज पुकळेवाडी ता- माण जिल्हा- सातारा येथे  वृद्धापकाळाने राहत्या घरी निधन झाले. आताच्या काळातील सर्वात वयोवृद्ध महिला म्हणून त्यांची ओळख होती. वयाची शंभरी ओलांडलेल्या मातोश्री तानुबाई शेळके यांची प्रकृती उत्तम होती. कोणाच्याही मदतीशिवाय त्या स्वत: दुचाकीवर बसायच्या, असे त्यांचे नातू दिलीप शेळके सांगतात.  

प्रतिकूल परिस्थितीत त्यांनी सुपुत्र रामभाऊ शेळके यांना कराडच्या कृष्णाकाठी कुस्तीचे धडे गिरवायला पाठवले. रामभाऊ शेळके यांनीही मातोश्रींचे ऋण फेडत उपमहाराष्ट्र केसरीचा किताब पटकावला आणि डोंगर रांगाचा सहारा लाभलेल्या पुकळेवाडी नगरीचे नाव क्रीडा विश्वात झळकवले. पुढे, महाराष्ट्र केसरीचे स्वप्न उराशी बाळगणाऱ्या रामभाऊ शेळके यांचे अकाली निधन झाले.  मातोश्रींच्या कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला, तसेच पुकळेवाडी गावाची अपरिमित हानी झाली.

पुकळेवाडीत मायाक्कादेवीच्या दर्शनाला आल्यावर मातोश्री आमच्या जुन्या घरी येत जात होत्या. मला आठवते आहे, माझ्या लहानपणात मला कंबरेला अडकवलेल्या कमळाच्या पिशवीतून दोन, पाच रुपये काढून सहजपणे माझ्या हातावर ठेवायच्या. मातोश्रींचे दातृत्व, मातृत्व, कर्तुत्व मोठे होते. त्या आदर्श माता होत्या. आज त्यांनी वयाच्या १०५ व्या वर्षी अखेरचा श्वास घेतला. मातोश्री तानूबाई शेळके यांच्या पश्चात मुले, मुली, सूना, नातू, नाती, नातसूना, परतवंडे असा मोठा परिवार आहे.  मातोश्री तानूबाई बाबा शेळके यांच्या पवित्र स्मृतीस भावपूर्ण श्रद्धांजली..!

-आबासो सुखदेव पुकळे, मुंबई.

1 comment:

चागंले संस्कार टिकविण्यासाठी वाचन संस्कृतीची गरज : डॉ. शंकर स्वामी वडेपुरीकर

चागंले संस्कार टिकविण्यासाठी वाचन संस्कृतीची गरज : डॉ. शंकर स्वामी वडेपुरीकर ‌पु.अहिल्यादेवी वाचनालयात " वाचन संकल्प महाराष्ट्राचा...