राष्ट्रीय समाज पक्ष करणार दक्षिणेकडे कूच
गोवा पणजीत रासप'च्या १८ व्या वर्धापन दिन कार्यक्रमाचे आयोजन, मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्री उपस्थित राहणार
रासप राष्ट्रीय अध्यक्ष एस एल अक्किसागर यांची 'यशवंत नायक'ला माहिती.
मुंबई :(प्रा. आबासो पुकळे, यशवंत नायक ब्यूरो):
येत्या '२९ ऑगस्ट 2021 ला राष्ट्रीय समाज पक्ष दक्षिण भारत - गोव्याकडे कूच करणार आहे. राष्ट्रीय समाज पक्षाचा १८ वा वर्धापन दिन गोव्याची राजधानी पणजी शहरात काँनफ्रेस हॉल, ३ रा मजला, गोवा चेंबर ऑफ कॉमर्स अँड इंडस्ट्रीज, आझाद मैदान शेजारी, पणजी येथे सकाळी : ११.30 ते १:३० या वेळेत आयोजित केला असल्याची माहिती, रासपचे राष्ट्रीय अध्यक्ष एस. एल. अक्कीसागर यांनी 'यशवंत नायक'ला दिली. महाराष्ट्र तसेच इतर राज्यात राज्यस्तरीय वर्धापन दिन साजरे केले जाणार असून पणजी गोवा येथे राष्ट्रस्तरीय कार्यक्रमाचे आयोजन केले असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. महाराष्ट्र राज्यस्तरीय कार्यक्रम दादर मुंबई येथे आयोजित केला आहे.
श्री. अक्कीसागर पुढे म्हणाले, गोवा येथील राष्ट्रीय स्तरावरील वर्धापन दिन कार्यक्रमासाठी मुख्य अतिथी आणि मार्गदर्शक म्हणून रासपचे संस्थापक अध्यक्ष - माजी मंत्री महाराष्ट्र सरकार मा. महादेव जानकर उपस्थित राहणार आहेत. गोवा राज्य कार्यकारणी तसेच राष्ट्रीय कार्यकारणी सभा कार्यक्रमाचे आयोजन करण्यात असल्याचे ही त्यांनी सांगितले. रासपचे गोवा प्रदेशाध्यक्ष श्री. किशोर राव कार्यक्रमाचे आयोजन करत आहेत. राष्ट्रीय कार्यकारणीचे मुख्य पदाधिकारी यांच्यासह गोवा, महाराष्ट्र, कर्नाटक, गुजरात, उत्तरप्रदेश, राजस्थान, तमिळनाडू, केरळ, मध्यप्रदेश, आसाम, दिल्ली येथील मुख्य पदाधिकारी/नेतागण उपस्थित राहणार आहेत. प्रथमच दक्षिण भारतात किनारपट्टीवर रासपचा २०२१ ला १८ वा वर्धापन दिन गोवा येथे साजरा होत असल्याने उत्सुकता निर्माण झाली आहे. गोवा सहीत विविध राज्यातील प्रमुख पदाधिकारी आणि खास निमंत्रित अतिथि उपस्थित राहणार आहेत. गोव्याचे मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री यांना निमंत्रण देणार असल्याचे गोवा प्रदेशाध्यक्ष श्री किशोर राव यांनी यशवंत नायकला माहिती दिली.
No comments:
Post a Comment