Sunday, August 8, 2021

बहुचर्चित माण बाजार समितीवर भाजप-रासपचे वर्चस्व, महाविकास आघाडीला धक्का

बहुचर्चित माण तालुका बाजार समितीवर भाजप-रासपचे वर्चस्व, महाविकास आघाडीला धक्का

राज्यात महाविकास आघाडीचे (Mahavikas Aghadi) सरकार स्थापन झाल्यापासून राज्यातील बाजार समितीवर आघाडीचे वर्चस्व राहणार, असा दावा नेतेमंडळी करताना दिसत आहे. मात्र राष्ट्रवादीचा बालेकिल्ला म्हणून ओळख असलेल्या सातारा जिल्ह्यातील बहुचर्चित माण तालुका कृषी उत्पन्न बाजार समितीवर (Man Bazar Samiti) भाजप(BJP)- रासपने (RSP) एकहाती सत्ता मिळवून महाविकास आघाडीचा दावा खोडून काढला.

माण तालुका कृषी उत्पन्न बाजार समितीच्या निवडणुकीचा निकाल आज जाहीर झाला. बाजार समितीसाठी काल ता. ७ ऑगस्ट रोजी मतदान झाले होते. आज सकाळी ८ वाजता (ता. ८ ऑगस्ट) मतमोजणीला सुरुवात झाली. माण बाजार समितीच्या अटितटीच्या झालेल्या निवडणुकीत भाजपचे आमदार जयकुमार गोरें यांनी रासपच्यासाथीने एक हाती सत्ता मिळवून महाविकास आघाडीच्या नेत्यांना जोरदार धक्का दिला. या निवडणुकीत भाजप -  रासपचे १० सदस्य विजयी झाले आहेत.  त्यांच्या विरोधी गटाचे प्रभाकर देशमुख, अनिल देसाई, रणजित देशमुख या काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेसच्या पॅनेलेला सात जागांवर समाधान मानवे लागले आहे. तर शेखर गोरे यांच्या शिवसेनेच्या पॅनेलला खातेही उघडता आले नाही. त्यांना एकही जागा मिळू शकली नाही. त्यामुळे अटीतटीच्या झालेल्या या निवडणुकीत भाजप- रासपने बाजी मारली आहे. आणि शिवसेनेच्या पदरी निराशा आली आहे.

भाजपचा षटकार- रासपचा चौकार

आ. जयकुमार गोरे यांच्या मार्गदर्शनात भारतीय जनता पार्टीचे सहा उमेदवार जिंकल्याने भाजपने निवडणुकीच्या मैदानात षटकार खेचला तर भाजपचा मित्रपक्ष रासपने श्री. बबनदादा वीरकर, श्री. आप्पासाहेब पुकळे यांच्या मार्गदर्शनात चौकार लगावला. 

कोरोनाच्या प्रादुर्भावामुळे बाजार समितीच्या निवडणुकीला मुदतवाढ देण्यात आली होती. हायकोर्टाच्या आदेशानंतर बाजार समितीच्या निवडणुकीसाठी एकूण ९८ टक्के मतदान झाले होते. आज  दुपारी दीड वाजता मतमोजणी संपली.

- प्रा. आबासो पुकळे

No comments:

Post a Comment

चागंले संस्कार टिकविण्यासाठी वाचन संस्कृतीची गरज : डॉ. शंकर स्वामी वडेपुरीकर

चागंले संस्कार टिकविण्यासाठी वाचन संस्कृतीची गरज : डॉ. शंकर स्वामी वडेपुरीकर ‌पु.अहिल्यादेवी वाचनालयात " वाचन संकल्प महाराष्ट्राचा...