रायगड जिल्ह्यात राष्ट्रीय समाज पक्षाची संघटीत ताकद वाढवा : भगवानराव ढेबे
पेण येथे राष्ट्रीय समाज पक्ष रायगड जिल्हा उत्तर विभागाची आढावा बैठक पार पडली.
पेण : रायगड जिल्ह्यात राष्ट्रीय समाज पक्षाची संघटित ताकद वाढवा असे आवाहान, कोकण रासपाचे नेते श्री भगवानराव ढेबे यांनी केले आहे. श्री. ढेबे हे पेण येथील पक्षाच्या आढावा बैठकीत बोलत होते. आज बुधवार दिनांक २५ ऑगस्ट २०२१ रोजी पेण येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर पुतळ्याजवळ गांधी सभागृहात राष्ट्रीय समाज पक्ष रायगड जिल्हा उत्तर विभागाची आढावा बैठक पार पडली.
श्री. ढेबे पुढे म्हणाले, सर्व जातीधर्माच्या लोकांसाठी राष्ट्रीय समाज पक्षाची कवाडे खुली असून, छत्रपती शिवरायांनी स्वराज्याची राजधानी उभारलेल्या रायगड किल्याच्या भूमीत महादेव जानकर यांचे हात बळकट करावेत. इतर राजकीय पक्ष आणि रासपात खूप मोठी तफावत आहे. समाजाने डावलेल्या, दिनदूबळ्या लोकांना राजकीय करिअर करण्यासाठी रासपमध्ये स्वातंत्र्य आहे.
या बैठकिसाठी हमुखलाल शहा, संपत ढेबे, संतोष ढवळे, विनय उघडे, लक्ष्मण मरगळा, आनंद ढवळे, बळीराम ऐनकर, उमेश पाटील, महेश शिंदे, हरेश ढेबे, विलास कोकळे, बबन ढेबे, अनिकेत यादव, दयानंद खरात, नवनाथ खर्जे, सचिन पुकळे, म्हालाप्पा इमडे, सय्यद कुरेशी, आदी उपस्थित होते.
No comments:
Post a Comment