रायगड जिल्ह्यात रासप स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका स्वबळावर लढवणार : भगवानराव ढेबे
पनवेल : प्रतिनिधी
रायगड जिल्ह्यात आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका राष्ट्रीय समाज पक्ष स्वबळावर लढविणार असल्याची महत्वपूर्ण माहिती, रासपचे नेते भगवानराव ढेबे यांनी दिली. श्री. ढेबे पनवेल येथे यशवंत नायक ब्यूरो शी बोलत होते. दिनांक १५/८/२०२१ रोजी कामराज नगर , घाटकोपर - मुंबई येथे राष्ट्रीय समाज पक्ष जिल्हा आढावा बैठकीचे आयोजन केले होते. या सभेमध्ये मुंबई महानगरपालिकेसह कोकण विभागातील जिल्ह्यांमध्ये (२०२२) स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणूका स्वबळावर लढविण्याचे आदेश पक्षश्रेष्ठींकडून देण्यात आले आहेत. यावेळी उमेदवारांची चाचपणी करत रायगड जिल्ह्यातील निजामपूर जि. प. गट- श्री. संतोष ढवळे-धनवीकर , लोणशी गट- श्री. सुर्यकांतजी टेंबे, माणगाव पं स निजामपूर गण- श्री. रविंद्र सुतार आदि उमेदवारांची नावे घोषित करण्यात आली आहेत.
No comments:
Post a Comment