प्रत्येक राजकीय पक्षाने ओबीसीची जातनिहाय जनगणना होण्यासाठी ठराव करावा : महादेव जानकर.
दोदडगाव : प्रा. आबासो पुकळे, यशवंत नायक ब्यूरो.
प्रत्येक राजकीय पक्षाने जातनिहाय जनगणना करण्याचा ठराव केला पाहिजे, असे मत रासपचे संस्थापक अध्यक्ष महादेव जानकर यांनी व्यक्त केले आहे. दोदडगाव ता- अंबड जिल्हा- जालना येथे मंडल स्तंभ उभारण्यात आला. यावेळी श्री. जानकर बोलत होते.
ओबीसी समाज हा दल नसलेला समाज आहे. संसदेत काल चर्चा चालली होती. त्यामध्ये संयुक्त जनता दलाचे खासदार व्यास बोलत होते. त्यांनी एक साधी मागणी केलेली, भारताच्या पंतप्रधानाकडे की, जातनीहाय जनगणना झाली पाहिजे. पण तो विषय दुसरीकडे वळवण्यासाठी मॅगासेस विषय आणण्यात आला. आमचं स्पष्ट म्हणन आहे, राष्ट्रीय समाज पक्ष आज एनडीए बरोबर आहे. काँग्रेस असो की बिजेपी. मंडल आयोग काँग्रेसच्या काळात १००% लागू का झाला नाही. त्या काळात काँगेसच्या काळात जातनिहाय जनगणना का करण्यात आली नाही. आदरणीय ढाकणे साहेब तुम्ही वडीलधारे आहात, तुम्ही केंद्रात मंत्री होता. तुमचं योगदान मोठ आहे. लालू, शरद, मुलायमसिंह यादव यांच योगदान मोठ आहे. वी.पी. सिंगाचे योगदान मोठ आहे. वडेट्टीवार साहेब एनडीएच्या मीटिंगमध्ये राष्ट्रीय समाज पक्षाने ओबिसीला घटनात्मक दर्जा देण्याची मागणी रेटून धरली. ७० वर्षात एससी, एसटी सारखा ओबिसिला घटनात्मक दर्जा का दिला नाही. आम्ही मोदींवर दबाव टाकून ओबीसींचा घटनात्मक दर्जा मिळवण्यात यशस्वी झालो. परंतु जातनिहाय जनगणनेत माशी कुठे शिंकली.
आजवर काँग्रेसचेच सरकार होते, तुमचेच लोकांची सत्ता होती, आमचे बापजादे तुम्हालाच मते देत होती. बबनराव ढाकणे, नारायण मुंडे काँग्रेसचेच होते. माझा बाप आणि आजोबा कॉग्रेसचेच होते. आम्ही त्यावेळेस अज्ञान होतो का?याचे चिंतन आणि मनन ओबीसी समाजाने केलं पाहिजे. जिस समाज का दल है! उस समाज का बल है! मोठे पक्ष आपल्याला उल्लू बनवण्याची तयारी करतात. पण ते कुठतरी बदलल पाहिजे. वड्डेटीवार साहेब, ज्यावेळी तुम्ही बोलत होता, त्यावेळी आमचा राष्ट्रीय समाज पक्ष तुमच्या पाठीमागे उभा होता, रोडवर उभा होता, पक्ष म्हणून मागे उभा नव्हतो तर ओबीसीचा प्रतिनिधी म्हणून उभा होतो. ३६ जिल्ह्यात आम्ही आंदोलन केलं. परंतु प्रस्थापितांची नियत तपासली पाहिजे. नुसते मंत्री, खासदार, आमदार असून चालणार नाही, त्या त्या पक्षाने ठराव केला पाहिजे ओबीसी समाजाची जातनिहाय जनगणना झाली पाहिजे. काँग्रेस ने केली पाहिजे, बिजेपिने केली पाहिजे, सयुक्त जनता दलाने पण केली पाहिजे. सभागृहात प्रत्येक पक्षाचा नेता ठरत असतो. रासपचे लोक सभागृहात पाठवल्यास जनता ठरवेल तो ठराव पास होईल. आम्हाला शिकार करता येते, शिकार करायला आमच्या एवढं लायक कोनच नाही. शिकार केल्यावर आम्हाला वाटून घेता येत नाही. मात्र खाता येत नाही. आम्हाला जातीत वीभागले जाते. हे कुठ तरी बदलले पाहिजे. आम्ही सर्व समाजाला बरोबर घेऊन जातो. आमचा कठल्याही जाती, धर्माला विरोध नाही. ६० टक्के असणाऱ्या समाजाचा न्याय झाला पाहिजे. तमिळनाडूत सत्ताधारी व विरोधक ओबीसींचा असतो. महाराष्ट्रात एखादा दुसरा मंत्री ओबीसींचा असतो. त्यात आमच्यासारख्या एखादा बोलायला लागला की, आमच्याच जातीतला एखादा चमचा तयार केला जातो. पण असली हा असली असतो तर नकली हा नकली असतो. सत्य असेल तर आम्ही एकदिवस सत्ता देऊ शकेल. चीत्रातील बोलक्या पोपटांना ओळखायला शिका.
No comments:
Post a Comment