Tuesday, August 31, 2021

राष्ट्रीय समाज पक्ष, राष्ट्रीय अध्यक्षपदी महादेव जानकर यांची निवड

राष्ट्रीय समाज पक्ष, राष्ट्रीय अध्यक्षपदी महादेव जानकर यांची निवड

पणजी : नवनिर्वाचित राष्ट्रीय समाज पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष महादेव  जानकर यांचा सत्कार करताना मावळते राष्ट्रीय अध्यक्ष एस एल अक्कीसागर व अन्य रासपचे माजी राष्ट्रीय कार्यकारणि पदाधिकारी.

एस एल अक्कीसागर यांचा कार्यकाळ संपला; मापसा येथे घोषित, पणजीत नवे राष्ट्रीय अध्यक्ष महादेव जानकर मनोनित


पणजी : प्रा. ए. एस. पुकळे, यशवंत नायक ब्यूरो.

राष्ट्रीय समाज पक्षाचे संस्थापक अध्यक्ष 'राष्ट्रनायक' महादेव जानकर यांची राष्ट्रीय समाज पक्ष, राष्ट्रीय अध्यक्षपदी निवड झाल्याची घोषणा रासपचे मावळते हंगामी राष्ट्रीय अध्यक्ष एस एल अक्कीसागर यांनी पत्रकार परिषदेत केली. गोवा रासपतर्फे दि. २९ ऑगस्ट २०२१ रोजी कॉन्फरेस हॉल, ३ रा मजला, गोवा चेंबर ऑफ कॉमर्स अँड इंडस्ट्रीज, आझाद मैदान येथे दुपारी २ वाजता पत्रकार परिषदचे आयोजन केले होते.


श्री. अक्कीसागर पत्रकार परिषदेत म्हणाले, आमची हॉटेल मेंडरीन, मापसा येथे आज सकाळी ९ वाजता राष्ट्रीय समाज पक्ष राष्ट्रीय कार्यकारी समितीची बैठक पार पडली. या बैठकीसाठी रासपचे संस्थापक अध्यक्ष महादेव जानकर, मी स्वत: राष्ट्रीय अध्यक्ष एस एल अक्कीसागर, राष्ट्रीय महासचिव श्री. कुमार सुशील, श्री. प्रसन्नाकुमार, राष्ट्रीय संघटक बाळासाहेब लेंगरे, गोविंदराम शूरनर, राष्ट्रीय खजिनदार मोहन माने व अन्य साथीदार उपस्थित होते. या बैठकीत राष्ट्रीय अध्यक्ष एस एल अक्कीसागर यांचा कार्यकाळ समाप्त होत असल्याने राष्ट्रीय समाज पक्षाची राष्ट्रीय कार्यकारणी आणि सर्व राज्यातील राज्य कार्यकारिणी स्वयंप्रभावाने संपुष्टात आल्याचे घोषित केले. त्यानंतर पणजीत या ठिकाणी ११ वाजता राष्ट्रीय कार्यकारी समितीची बैठक झाली. या बैठकीत राष्ट्रीय कार्यकारी समितीचे हंगामी राष्ट्रीय अध्यक्ष एस एल अक्कीसागर यांनी सर्वानुमते राष्ट्रीय समाज पक्षाचे पुढील 'राष्ट्रीय अध्यक्ष' पदावर 'संस्थापक अध्यक्ष' महादेव जानकर यांचे नाव मनोनीत केले. त्यास श्री. के प्रसन्नाकुमार यांनी अनुमोदन दिले. राष्ट्रीय कार्यकारणीने एक मताने राष्ट्रीय समाज पक्ष, राष्ट्रीय अध्यक्षपदी महादेव जानकर यांची निवड झाल्याचे घोषित केले.

आझाद मैदान, पणजी येथे एस एल अक्कीसागर आणि महादेव जानकर
श्री. अक्कीसागर पुढे म्हणाले, ३१ मे २००३ ला राष्ट्रीय समाज पक्षाची राजमाता अहिल्या जन्मभूमि चोंडी अहमदनगर येथे घोषणा झाली. २९ ऑगस्ट २००३ रोजी मुख्य निवडणुक आयोग दिल्ली तर्फे अधिकृत घोषणा झाली. गोव्यातील जनतेसाठी हे खास आहे की, आज राष्ट्रीय समाज पक्षास १८ वर्ष पूर्ण होत आहेत. मताधिकार प्राप्त झाला आहे, मताचा अधिकार पूर्वीच मिळाला आहे, परंतु सांगण्याचा हेतू हा आहे की, रासप नावाचे बीज पेरले होते, ते रोपटे बनले. आज वृक्ष बनला आहे. आमच्या गोव्यातील अध्यक्षाने सांगितले आहे, की हा पक्ष ना हिंदूचा, ना मुसलमानांचा, ना कोणत्या धर्माचा. हा पक्ष राष्ट्रीय समाजाचा पक्ष आहे. यात कोण छोटे मोठे नाही. सर्व समान आहेत. देशाच्या कानाकोपऱ्यातील सर्व राज्याचे सर्व जाती, धर्म, भाषा मिळून राष्ट्रीय समाज होतो. राष्ट्र ही देव, राष्ट्र ही जाती, राष्ट्र ही धर्म हमारा ! राष्ट्र बने बलशाली यह भाषा सूत्र हमारा !! १७ राज्यात पक्ष कार्यरत आहे. १३ राज्यात संघटन बनले आहे. ७ राज्यात संघटन ताकदीने काम करत आहे. ३ राज्यात जिंकणारा पक्ष बनला आहे. महाराष्ट्रात दोन मंत्री झाले, एमएलए जिंकले. महाराष्ट्र, गुजरात, कर्नाटक राज्यात पक्षाला यश मिळाले. गोव्यात सुद्धा यश मिळेल.
यावेळी महाराष्ट्र, गुजरात, कर्नाटक, उत्तर प्रदेश, बिहार, तेलगंना, तमिनाडू, केरळ, गुजरात, राजस्थान येथील रासपचे प्रमुख पदाधिकारी व गोवा येथील पदाधिकारी किशोर राव, आनंद मांद्रेकर, गुरूनाम सिंह, सलमान खान, वैभवी सावंत, रमेश भूवी, प्रसाद दळवी, मदनेशवर शूरनर आदी उपस्थित होते.

Thursday, August 26, 2021

रासप राष्ट्रीय अध्यक्ष श्री. एस. एल. अक्कीसागर आणि श्री. शिवलिंगप्पा किन्नुर यांच्यात भेट

रासप राष्ट्रीय अध्यक्ष श्री. एस. एल. अक्कीसागर आणि श्री. शिवलिंगप्पा किन्नुर यांच्यात भेट

डावीकडून श्री. संतोष गोळे, श्री. किन्नुर, श्री. अक्कीसागर, सौ. वृषाली गोळे, सौ. हेमाताई किन्नुर.

रासपा गुलबर्गा, धारवाड बेळगाव महापालिका निवडणुका  स्वबळावर लढविनार

नवी मुंबई : राष्ट्रीय समाज पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष एस. एल. अक्कीसागर यांची आणि रासपचे राष्ट्रीय कार्यकारिणी सदस्य शिवलिंगप्पा किन्नुर (गुलबर्गा - कर्नाटक) यांची नवी मुंबई येथे भेट झाली.  या भेटीदरम्यान कर्नाटक राज्यातील राष्ट्रीय समाज पक्ष संघटन बांधणी व ओबीसी समाजाची आजची दशा आणि उद्याची दिशा या मुद्द्यावर चर्चा पार पडली. लवकरच गुलबर्गा, धारवाड बेळगाव आदि महापालिका निवडणुका जाहीर झाल्या आहेत, त्याबद्दल ही चर्चा झाली. रासपा स्वबळावर या निवडणुका लढविनार आहे.

श्री. किन्नुर हे कर्नाटक राज्यातील रासपचे प्रमुख पदाधिकारी आहेत. कोळी समाजाच्या राष्ट्रीय चळवळीत त्यांनी काम केले आहे. राष्ट्रीय समाज पक्ष दिवसेंदिवस वाढावा यासाठी ते झटत आहेत. सौ. हेमाताई सिद्धराज किन्नुर या रासपच्या राष्ट्रीय मुख्य महासचिव देखील उपस्थित होत्या.

Wednesday, August 25, 2021

रायगड जिल्ह्यात राष्ट्रीय समाज पक्षाची संघटीत ताकद वाढवा : भगवानराव ढेबे

रायगड जिल्ह्यात राष्ट्रीय समाज पक्षाची संघटीत ताकद वाढवा : भगवानराव ढेबे

पेण येथे राष्ट्रीय समाज पक्ष रायगड जिल्हा उत्तर विभागाची आढावा बैठक पार पडली.

पेण : रायगड जिल्ह्यात राष्ट्रीय समाज पक्षाची संघटित ताकद वाढवा असे आवाहान, कोकण रासपाचे नेते श्री भगवानराव ढेबे यांनी केले आहे. श्री. ढेबे हे पेण येथील पक्षाच्या आढावा बैठकीत बोलत होते. आज बुधवार दिनांक २५ ऑगस्ट २०२१ रोजी पेण येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर पुतळ्याजवळ गांधी सभागृहात राष्ट्रीय समाज पक्ष रायगड जिल्हा उत्तर विभागाची आढावा बैठक पार पडली. 

श्री. ढेबे पुढे म्हणाले, सर्व जातीधर्माच्या लोकांसाठी राष्ट्रीय समाज पक्षाची कवाडे खुली असून, छत्रपती शिवरायांनी स्वराज्याची राजधानी उभारलेल्या रायगड किल्याच्या भूमीत महादेव जानकर यांचे हात बळकट करावेत. इतर राजकीय पक्ष आणि रासपात खूप मोठी तफावत आहे. समाजाने डावलेल्या, दिनदूबळ्या लोकांना राजकीय करिअर करण्यासाठी रासपमध्ये स्वातंत्र्य आहे.


या बैठकिसाठी हमुखलाल शहा, संपत  ढेबे, संतोष ढवळे, विनय उघडे, लक्ष्मण मरगळा, आनंद ढवळे, बळीराम ऐनकर, उमेश पाटील, महेश शिंदे, हरेश ढेबे, विलास कोकळे, बबन ढेबे, अनिकेत यादव, दयानंद खरात, नवनाथ खर्जे, सचिन पुकळे, म्हालाप्पा इमडे, सय्यद कुरेशी, आदी उपस्थित होते.

Tuesday, August 24, 2021

प्रत्येक राजकीय पक्षाने ओबीसीची जातनिहाय जनगणना होण्यासाठी ठराव करावा : महादेव जानकर.

प्रत्येक राजकीय पक्षाने ओबीसीची जातनिहाय जनगणना होण्यासाठी ठराव करावा : महादेव जानकर.

दोदडगाव : प्रा. आबासो पुकळे, यशवंत नायक ब्यूरो. 

प्रत्येक राजकीय पक्षाने जातनिहाय जनगणना करण्याचा ठराव केला पाहिजे, असे मत रासपचे संस्थापक अध्यक्ष महादेव जानकर यांनी व्यक्त केले आहे. दोदडगाव ता- अंबड जिल्हा- जालना  येथे मंडल स्तंभ उभारण्यात आला. यावेळी श्री. जानकर बोलत होते.

ओबीसी समाज हा दल नसलेला समाज आहे. संसदेत काल चर्चा चालली होती. त्यामध्ये संयुक्त जनता दलाचे खासदार व्यास बोलत होते. त्यांनी एक साधी मागणी केलेली, भारताच्या पंतप्रधानाकडे की, जातनीहाय जनगणना झाली पाहिजे. पण तो विषय दुसरीकडे वळवण्यासाठी मॅगासेस विषय आणण्यात आला. आमचं स्पष्ट म्हणन आहे, राष्ट्रीय समाज पक्ष आज एनडीए बरोबर आहे. काँग्रेस असो की बिजेपी.  मंडल आयोग काँग्रेसच्या काळात १००% लागू का झाला नाही. त्या काळात काँगेसच्या काळात जातनिहाय जनगणना का करण्यात आली नाही. आदरणीय ढाकणे साहेब तुम्ही वडीलधारे आहात, तुम्ही केंद्रात मंत्री होता. तुमचं योगदान मोठ आहे. लालू, शरद, मुलायमसिंह यादव यांच योगदान मोठ आहे. वी.पी. सिंगाचे योगदान मोठ आहे.   वडेट्टीवार साहेब एनडीएच्या मीटिंगमध्ये राष्ट्रीय समाज पक्षाने ओबिसीला घटनात्मक दर्जा देण्याची मागणी रेटून धरली. ७० वर्षात एससी, एसटी सारखा ओबिसिला घटनात्मक दर्जा का दिला नाही. आम्ही मोदींवर दबाव टाकून ओबीसींचा घटनात्मक दर्जा मिळवण्यात यशस्वी झालो.  परंतु जातनिहाय जनगणनेत माशी कुठे शिंकली. 

आजवर काँग्रेसचेच सरकार होते,  तुमचेच लोकांची सत्ता होती, आमचे बापजादे तुम्हालाच मते देत होती. बबनराव ढाकणे, नारायण मुंडे काँग्रेसचेच होते. माझा बाप आणि आजोबा कॉग्रेसचेच होते. आम्ही त्यावेळेस अज्ञान होतो का?याचे चिंतन आणि मनन ओबीसी समाजाने केलं पाहिजे. जिस समाज का दल है! उस समाज का बल है! मोठे पक्ष आपल्याला उल्लू बनवण्याची तयारी करतात. पण ते कुठतरी बदलल पाहिजे. वड्डेटीवार साहेब, ज्यावेळी तुम्ही बोलत होता, त्यावेळी आमचा राष्ट्रीय समाज पक्ष तुमच्या पाठीमागे उभा होता, रोडवर उभा होता, पक्ष म्हणून मागे उभा नव्हतो तर ओबीसीचा प्रतिनिधी म्हणून उभा होतो. ३६ जिल्ह्यात आम्ही आंदोलन केलं. परंतु प्रस्थापितांची नियत तपासली पाहिजे. नुसते मंत्री, खासदार, आमदार असून चालणार नाही, त्या त्या पक्षाने ठराव केला पाहिजे ओबीसी समाजाची जातनिहाय जनगणना झाली पाहिजे. काँग्रेस ने केली पाहिजे, बिजेपिने केली पाहिजे, सयुक्त जनता दलाने पण केली पाहिजे. सभागृहात प्रत्येक पक्षाचा नेता ठरत असतो. रासपचे लोक सभागृहात पाठवल्यास जनता ठरवेल तो ठराव पास होईल. आम्हाला शिकार करता येते, शिकार करायला आमच्या एवढं लायक कोनच नाही. शिकार केल्यावर आम्हाला वाटून घेता येत नाही.  मात्र खाता येत नाही. आम्हाला जातीत वीभागले जाते. हे कुठ तरी बदलले पाहिजे. आम्ही सर्व समाजाला बरोबर घेऊन जातो. आमचा कठल्याही जाती, धर्माला विरोध नाही. ६० टक्के असणाऱ्या समाजाचा न्याय झाला पाहिजे. तमिळनाडूत सत्ताधारी व विरोधक ओबीसींचा असतो. महाराष्ट्रात एखादा दुसरा मंत्री ओबीसींचा असतो. त्यात आमच्यासारख्या एखादा बोलायला लागला की, आमच्याच जातीतला एखादा चमचा तयार केला जातो. पण असली हा असली असतो तर नकली हा नकली असतो. सत्य असेल तर आम्ही एकदिवस सत्ता देऊ शकेल. चीत्रातील बोलक्या पोपटांना ओळखायला शिका.

Monday, August 23, 2021

राष्ट्रीय समाज पक्ष करणार दक्षिणेकडे कूच

राष्ट्रीय समाज पक्ष करणार दक्षिणेकडे कूच 

गोवा पणजीत रासप'च्या १८ व्या वर्धापन दिन कार्यक्रमाचे आयोजन, मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्री उपस्थित राहणार

रासप राष्ट्रीय अध्यक्ष एस एल अक्किसागर यांची 'यशवंत नायक'ला माहिती.

मुंबई :(प्रा. आबासो पुकळे, यशवंत नायक ब्यूरो):

येत्या '२९ ऑगस्ट 2021 ला राष्ट्रीय समाज पक्ष दक्षिण भारत -  गोव्याकडे कूच करणार आहे. राष्ट्रीय समाज पक्षाचा १८ वा वर्धापन दिन गोव्याची राजधानी पणजी शहरात काँनफ्रेस हॉल, ३ रा  मजला, गोवा चेंबर ऑफ कॉमर्स अँड इंडस्ट्रीज, आझाद मैदान शेजारी, पणजी येथे सकाळी : ११.30 ते १:३० या वेळेत आयोजित केला असल्याची माहिती, रासपचे राष्ट्रीय अध्यक्ष एस. एल. अक्कीसागर यांनी 'यशवंत नायक'ला दिली. महाराष्ट्र तसेच इतर राज्यात राज्यस्तरीय वर्धापन दिन साजरे केले जाणार असून पणजी गोवा येथे राष्ट्रस्तरीय कार्यक्रमाचे आयोजन केले असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. महाराष्ट्र राज्यस्तरीय कार्यक्रम दादर मुंबई येथे आयोजित केला आहे.

श्री. अक्कीसागर पुढे म्हणाले,  गोवा येथील राष्ट्रीय स्तरावरील वर्धापन दिन कार्यक्रमासाठी मुख्य अतिथी आणि मार्गदर्शक म्हणून रासपचे संस्थापक अध्यक्ष - माजी मंत्री महाराष्ट्र सरकार मा. महादेव जानकर उपस्थित राहणार आहेत.  गोवा राज्य कार्यकारणी तसेच राष्ट्रीय कार्यकारणी सभा कार्यक्रमाचे आयोजन करण्यात असल्याचे ही त्यांनी सांगितले. रासपचे गोवा प्रदेशाध्यक्ष श्री. किशोर राव कार्यक्रमाचे आयोजन करत आहेत. राष्ट्रीय कार्यकारणीचे मुख्य पदाधिकारी यांच्यासह गोवा, महाराष्ट्र, कर्नाटक, गुजरात, उत्तरप्रदेश, राजस्थान, तमिळनाडू, केरळ, मध्यप्रदेश, आसाम, दिल्ली येथील मुख्य पदाधिकारी/नेतागण उपस्थित राहणार आहेत. प्रथमच दक्षिण भारतात किनारपट्टीवर रासपचा २०२१ ला १८ वा वर्धापन दिन गोवा येथे साजरा होत असल्याने उत्सुकता निर्माण झाली आहे.  गोवा सहीत विविध राज्यातील प्रमुख पदाधिकारी आणि खास निमंत्रित अतिथि उपस्थित राहणार आहेत. गोव्याचे मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री यांना निमंत्रण देणार असल्याचे गोवा प्रदेशाध्यक्ष श्री किशोर राव यांनी यशवंत नायकला माहिती दिली.

Saturday, August 21, 2021

रायगड जिल्ह्यात रासप स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका स्वबळावर लढवणार : भगवानराव ढेबे

रायगड जिल्ह्यात रासप स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका स्वबळावर लढवणार : भगवानराव ढेबे

पनवेल : प्रतिनिधी

रायगड जिल्ह्यात आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका राष्ट्रीय समाज पक्ष स्वबळावर लढविणार असल्याची महत्वपूर्ण माहिती, रासपचे नेते भगवानराव ढेबे यांनी दिली. श्री. ढेबे पनवेल येथे यशवंत नायक ब्यूरो शी बोलत होते. दिनांक १५/८/२०२१ रोजी कामराज नगर , घाटकोपर - मुंबई येथे राष्ट्रीय समाज पक्ष जिल्हा आढावा बैठकीचे आयोजन केले होते.  या सभेमध्ये मुंबई महानगरपालिकेसह कोकण विभागातील जिल्ह्यांमध्ये (२०२२) स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणूका  स्वबळावर  लढविण्याचे आदेश पक्षश्रेष्ठींकडून देण्यात आले आहेत. यावेळी उमेदवारांची चाचपणी करत  रायगड जिल्ह्यातील निजामपूर जि. प. गट- श्री. संतोष ढवळे-धनवीकर , लोणशी गट- श्री. सुर्यकांतजी टेंबे, माणगाव पं स  निजामपूर गण-  श्री. रविंद्र सुतार  आदि  उमेदवारांची नावे घोषित करण्यात आली आहेत.

Tuesday, August 17, 2021

रासपच्या कर्नाटक राज्य महिला आघाडी सचिवपदी कु.भवानी एल तोंटापुर

रासपच्या कर्नाटक राज्य महिला आघाडी सचिवपदी कु.भवानी एल तोंटापुर यांची नियुक्ती


मुंबई : राष्ट्रीय समाज पक्ष कर्नाटक राज्य महिला आघाडी सचिवपदी कु. भवानी लक्ष्मीकांत तोंटापुर यांची नियुक्ती करण्यात आली आहे. त्यांना कर्नाटक राज्य संयोजक धर्मांन्ना तोंटापुर यांनी नियुक्ती पत्र दिले. कर्नाटकातील लोकप्रिय मासिक 'कुरबरा सुद्दी'च्या संपादिका कु. भवानी लक्ष्मीकांत तोंटापुर यांची निवड करून रासपने कर्नाटक राज्यात महिला आघाडीचे संघटन मजबूत करण्याचे दृष्टीने एक महत्वपूर्ण पाऊल टाकले आहे. 

कु.भवानी तोंटापुर या उच्चशिक्षित आहेत. बंगळुरू महानगरातील मल्लेशवरमच्या रहिवाशी आहेत. त्यांच्या निवडीबद्दल राष्ट्रीय समाज पक्षाचे संस्थापक अध्यक्ष महादेव जानकर, राष्ट्रीय अध्यक्ष एस एल अक्किसागर, राष्ट्रीय महासचिव कुमार सुशील, कर्नाटक युवक आघाडी राज्य सरचिटणीस अनिल पुजारी यांनी अभिनंदन केले आहे.

Monday, August 16, 2021

नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळास दी. बा. पाटील यांच्या नावास रासपचा पाठिंबा

नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळास दी. बा. पाटील यांच्या नावास रासपचा पाठिंबा : भगवानभाई ढेबे



कळंबोली : यशवंत नायक चीफ ब्यूरो

बहुचर्चित नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळास लोकनेते दी. बा. पाटील यांचे नाव देण्यात यावे, दी. बा. पाटील यांच्या नावास राष्ट्रीय समाज पक्षाचा पाठिंबा असल्याचे, रासप नेते भगवानभाई ढेबे यांनी 'यशवंत नायक'शी बोलताना सांगितले.

श्री. ढेबे पुढे म्हणाले, दी.बा. पाटील कोकणातील स्थानिक भूमिपुत्रांसाठी लढले. त्यांच्यामुळे भूमिपुत्रांना भूखंडाचा साडे बारा टक्के वाटा मिळाला. दि. बा. पाटील यांनी प्रकल्पग्रस्तांचे प्रतिनिधित्व केले. साडे पाच दशकाहून अधिककाळ त्यांनी संघर्ष केला. नवी मुंबई शहर वसवताना स्थानिकांना विस्थापित होण्याची वेळ आली होती, मात्र दि. बा. पाटील यांच्यामुळे स्थानिक भूमिपुत्र टिकून राहिले, त्यांना न्याय मिळाला. नवी मुंबई विमानतळास दि. बा. पाटील यांच्या नावासाठी आंदोलने सुरूच आहेत. आमचा कोणाच्या नावास विरोध नाही, मात्र स्थानिक भूमिपुत्रांच्या मागणीस रासपचे जाहीर समर्थन असेल.

Sunday, August 8, 2021

बहुचर्चित माण बाजार समितीवर भाजप-रासपचे वर्चस्व, महाविकास आघाडीला धक्का

बहुचर्चित माण तालुका बाजार समितीवर भाजप-रासपचे वर्चस्व, महाविकास आघाडीला धक्का

राज्यात महाविकास आघाडीचे (Mahavikas Aghadi) सरकार स्थापन झाल्यापासून राज्यातील बाजार समितीवर आघाडीचे वर्चस्व राहणार, असा दावा नेतेमंडळी करताना दिसत आहे. मात्र राष्ट्रवादीचा बालेकिल्ला म्हणून ओळख असलेल्या सातारा जिल्ह्यातील बहुचर्चित माण तालुका कृषी उत्पन्न बाजार समितीवर (Man Bazar Samiti) भाजप(BJP)- रासपने (RSP) एकहाती सत्ता मिळवून महाविकास आघाडीचा दावा खोडून काढला.

माण तालुका कृषी उत्पन्न बाजार समितीच्या निवडणुकीचा निकाल आज जाहीर झाला. बाजार समितीसाठी काल ता. ७ ऑगस्ट रोजी मतदान झाले होते. आज सकाळी ८ वाजता (ता. ८ ऑगस्ट) मतमोजणीला सुरुवात झाली. माण बाजार समितीच्या अटितटीच्या झालेल्या निवडणुकीत भाजपचे आमदार जयकुमार गोरें यांनी रासपच्यासाथीने एक हाती सत्ता मिळवून महाविकास आघाडीच्या नेत्यांना जोरदार धक्का दिला. या निवडणुकीत भाजप -  रासपचे १० सदस्य विजयी झाले आहेत.  त्यांच्या विरोधी गटाचे प्रभाकर देशमुख, अनिल देसाई, रणजित देशमुख या काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेसच्या पॅनेलेला सात जागांवर समाधान मानवे लागले आहे. तर शेखर गोरे यांच्या शिवसेनेच्या पॅनेलला खातेही उघडता आले नाही. त्यांना एकही जागा मिळू शकली नाही. त्यामुळे अटीतटीच्या झालेल्या या निवडणुकीत भाजप- रासपने बाजी मारली आहे. आणि शिवसेनेच्या पदरी निराशा आली आहे.

भाजपचा षटकार- रासपचा चौकार

आ. जयकुमार गोरे यांच्या मार्गदर्शनात भारतीय जनता पार्टीचे सहा उमेदवार जिंकल्याने भाजपने निवडणुकीच्या मैदानात षटकार खेचला तर भाजपचा मित्रपक्ष रासपने श्री. बबनदादा वीरकर, श्री. आप्पासाहेब पुकळे यांच्या मार्गदर्शनात चौकार लगावला. 

कोरोनाच्या प्रादुर्भावामुळे बाजार समितीच्या निवडणुकीला मुदतवाढ देण्यात आली होती. हायकोर्टाच्या आदेशानंतर बाजार समितीच्या निवडणुकीसाठी एकूण ९८ टक्के मतदान झाले होते. आज  दुपारी दीड वाजता मतमोजणी संपली.

- प्रा. आबासो पुकळे

माण तालुका कृषी उत्पन्न बाजार समिती निवडणूकित रासपचा विजयी चौकार

माण तालुका कृषी उत्पन्न बाजार समिती निवडणूकित रासपचा विजयी चौकार

माण तालुका कृषी उत्पन्न बाजार समिती निवडणूक 2021 मध्ये झालेल्या चुरशीच्या निवडणुकीत राष्ट्रीय समाज पक्षाचे युवा नेते श्री. ब्रह्मदेव तुकाराम पुकळे यांनी विजय संपादन केला, त्याबद्दल त्यांचे मनपूर्वक हार्दिक अभिनंदन. तसेच श्री. रमेश यादव, सौ. वैशाली मामुशेठ वीरकर, श्री. अर्जुन बनगर यांनी विजयी चौकार ठोकत गुलाल तर उधळलाच, शिवाय भंडाराही उधळला. निवडणुकीच्या रणांगणात मोजकेच गिने, चूने कार्यकर्ते/पदाधिकारी यांनी मेहनत घेतली व यश मिळाले. विशेषतः श्री. बबनदादा वीरकर, किंगमेकर श्री. आप्पासाहेब पुकळे, श्री. मामुशेठ वीरकर, श्री. दादासाहेब दोरगे यांनी नेतृत्व केले, कार्यकर्त्यांना बळ दिले, त्याबद्दल त्यांचे विशेष अभिनंदन. या विजयाबद्दल रासपचे संस्थापक अध्यक्ष माजीमंत्री महादेव जानकर, राष्ट्रीय अध्यक्ष एस.एल.अक्किसागर, राष्ट्रीय महासचिव कुमार सुशील, के. प्रसन्नाकुमार, महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष आ. रत्नाकर गुट्टे, राज्य महासचिव बाळासाहेब दोडतले, सातारा जिल्हा प्रभारी खंडेराव सरक आदींनी अभिंदन केले. विश्वाचा यशवंत नायक परिवार तर्फे सर्व विजयी उमेदवारांचे हार्दिक अभिनंदन व पुढील कार्यास शुभेच्छा..!

विजया नंतरची काही क्षणचित्रे >










थोडक्यात 'स्व'साधन, आपला पक्ष-आपला नेता- आपला अजेंडा-आपला झेंडा-  सातारा जिल्ह्यातील माण तालुक्यात यशस्वी होत आहे.

- आबासो पुकळे, मुंबई.

(०८/०८/२०२१)

Friday, August 6, 2021

मातोश्री तानुबाई बाबा शेळके अनंतात विलीन

मातोश्री तानुबाई बाबा शेळके अनंतात विलीन;१०५ व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास

तानुबाई बाबा शेळके यांचे आज पुकळेवाडी ता- माण जिल्हा- सातारा येथे  वृद्धापकाळाने राहत्या घरी निधन झाले. आताच्या काळातील सर्वात वयोवृद्ध महिला म्हणून त्यांची ओळख होती. वयाची शंभरी ओलांडलेल्या मातोश्री तानुबाई शेळके यांची प्रकृती उत्तम होती. कोणाच्याही मदतीशिवाय त्या स्वत: दुचाकीवर बसायच्या, असे त्यांचे नातू दिलीप शेळके सांगतात.  

प्रतिकूल परिस्थितीत त्यांनी सुपुत्र रामभाऊ शेळके यांना कराडच्या कृष्णाकाठी कुस्तीचे धडे गिरवायला पाठवले. रामभाऊ शेळके यांनीही मातोश्रींचे ऋण फेडत उपमहाराष्ट्र केसरीचा किताब पटकावला आणि डोंगर रांगाचा सहारा लाभलेल्या पुकळेवाडी नगरीचे नाव क्रीडा विश्वात झळकवले. पुढे, महाराष्ट्र केसरीचे स्वप्न उराशी बाळगणाऱ्या रामभाऊ शेळके यांचे अकाली निधन झाले.  मातोश्रींच्या कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला, तसेच पुकळेवाडी गावाची अपरिमित हानी झाली.

पुकळेवाडीत मायाक्कादेवीच्या दर्शनाला आल्यावर मातोश्री आमच्या जुन्या घरी येत जात होत्या. मला आठवते आहे, माझ्या लहानपणात मला कंबरेला अडकवलेल्या कमळाच्या पिशवीतून दोन, पाच रुपये काढून सहजपणे माझ्या हातावर ठेवायच्या. मातोश्रींचे दातृत्व, मातृत्व, कर्तुत्व मोठे होते. त्या आदर्श माता होत्या. आज त्यांनी वयाच्या १०५ व्या वर्षी अखेरचा श्वास घेतला. मातोश्री तानूबाई शेळके यांच्या पश्चात मुले, मुली, सूना, नातू, नाती, नातसूना, परतवंडे असा मोठा परिवार आहे.  मातोश्री तानूबाई बाबा शेळके यांच्या पवित्र स्मृतीस भावपूर्ण श्रद्धांजली..!

-आबासो सुखदेव पुकळे, मुंबई.

विश्वाचा यशवंत नायक माहे : जून 2025

विश्वाचा यशवंत नायक माहे : जून 2025