Friday, January 3, 2020

विद्येची स्फूर्तिनायिका सावित्रिबाई फुले

विद्येची स्फूर्तिनायिका सावित्रिबाई फुले यांच्या १८९ व्या जयंती निमित्त विनम्र जय मल्हार !


‘शूद्रांना सांगण्याजोगा। आहे शिक्षणमार्ग हा शिक्षणाने मनुष्यत्व। पशुत्व हाटते पहा’ ‘विद्या हे धन आहे रे। श्रेष्ठ साऱ्या धनाहून तिचा साठा जयापाशी। ज्ञानी तो मानती जन’‘उठा बंधूंनो अतिशूद्रांनो, जागे होऊन उठा परंपरेचि गुलामगिरी ही तोडणेसाठी उठा बंधूंनो, शिकण्यासाठी उठा’-सवित्रीबाई फुले

विद्येची स्फूर्तिनायिका सावित्रिबाई फुले 


सवित्रीबाईंचा जन्म ३ जानेवारी १८३१ चा. जन्मगांव सातारा जिल्ह्यातील नायगांव ता- खंडाळा होय. वयाच्या ९ व्या वर्षी १८४० मध्ये महात्मा फुले यांच्याशी विवाह झाला. राष्ट्रपिता महात्मा जोतीराव फुले यांनी त्यांना घरीच शिक्षण देऊन साक्षर बनविले. ज्यावेळी १८४८ ला पुण्यातल्या बुधवार पेठेत भिडे वाड्यात मुलींची पहिली शाळा काढली, त्यावेळी त्या शिक्षिका होत्या. पूर्णवेळ विनावेतन सेवाभावी वृत्तीने शाळेत त्या शिकवत. सनातनी वृत्तीच्या लोकांच्या टिकेला, विरोधाला, दगड शेणफेकिला न घबरता त्यांनी आपले अध्यापनाचे कार्य चालूच ठेवले. 



१८४८ ते १८५२ पर्यंत पुणे परिसरात २० शाळांची सुरुवात करुन आधुनिक भारताच्या इतिहासात अजोड़ असे कार्य करणारे फुले दांपत्य श्रेष्ठ आहे. खरी विद्येची देवता मानायची असेल तर ती सावित्रीबाई फुले होय. 
८ मार्च हा आतंरराष्ट्रीय महिला दिन पाळला जातो. मात्र ज्या सावित्रीबाई फुले यांच्यामुळे ब्राम्हण, बहुजन तळागळातील स्त्री मनुस्मृतिच्या अतिभयंकर जाचातुन सर्वकष गुलामीच्या बेड्या तोड़ू शकली. ज्या रुढि, परंपरानी स्त्रीला उपेक्षित ठेवले. त्यविरुद्ध पहिले बंड करुन ज्ञान देऊन बहुजनांना माणूस म्हणून जगण्याचा हक्क देणाऱ्या सावित्रीबाई फुले ग्रेट आहेत. 
सत्य हे महान असते व महानतेत सुंदरता असते. विद्येची स्फूर्तिनायिका क्रांतिज्योति सावित्रीबाई फुले याच होय.  सत्य आणि खरा इतिहास ग्राह्य धरला पाहिजे.  आज प्रत्येक स्त्री केवळ सावित्रीबाईच्या सर्वागींण योगदानामुळेच विकसित होउ शकली. हा सत्य इतिहास कोणी विसरु शकत नाही. फक्त सावित्रीबाई फुले जयंती साजरी करुन समारंभापुरती मर्यादित न ठेवता सर्वसमावेशक विचार करुन फुले दांपत्याच्या मानवतावादी विचारांची चर्चासत्रे, परायणे घेऊन गावागावात, घराघरात पोहचवले पाहिजेत. विद्येची स्फूर्तिनायिका 'सरस्वती' नसून सावित्रीबाई याच आहेत असे ठणकावून सांगितले पाहिजे. हीच खरी त्यांना आदरांजली ठरेल. 
विद्येच्या कल्पोकल्पित देवीने (सरस्वतीने) एकाही स्त्रीला शिक्षण दिले नाही. एकही शाळा काढली नाही व तिने शिक्षण दिले नाही. तीचे शिक्षण किती? हेही माहित नाही. मात्र धर्मवाद्यांच्या गौड़बंगालने तिला विद्येचा मुकूट घालून दिला.  याउलट, सावित्रीबाई नी संपूर्ण भारतीय स्त्रीला शिक्षणाच्या अलंकारने सुसंस्कृत सुशोभित केले.  एखादी स्त्री आज चार ओळी लिहू शकते.  हे सर्व कशामुळे साध्य झाले? तर स्त्री शक्तिमुळे आणि स्त्रीशक्ति कशामुळे वृधिंगत झाली तर स्त्री शिक्षणामुळे, शिक्षण कोणी दिले.  तर सवित्रीबाईंनी दिलेल्या योगदानामुळे स्त्री शक्तिचा सर्वांगीण विकास झाला. 'महात्मा जोतिबा फुले' आणि 'सावित्रीबाई फुले' यांनी भिडे वाडा येथे देशातील मुलींची पहिली शाळा सुरू केली. सध्या या ऐतीहासिक वास्तुची दुरावस्था झाली आहे.  ही वास्तू सामाजिक, ऐतिहासिकदृष्ट्या अत्यंत महत्त्वाची आहे; पण त्याचे अद्यापही योग्य प्रकारे जतन होत नसून, भिडे वाड्याला लवकरात लवकर राष्ट्रीय स्मारक म्हणून घोषित करण्यात यावे आणि त्याचे राष्ट्रीय स्मारक व्हायलाच हवे.
- आबासो पुकळे, मुंबई 
३ जानेवारी २०२०.

2 comments:

  1. 'राष्ट्र भारती' ला भेट दिल्याबद्दल आपला आभारी आहे. आपल्या प्रतिक्रिया जरुर कळवा.

    ReplyDelete

चागंले संस्कार टिकविण्यासाठी वाचन संस्कृतीची गरज : डॉ. शंकर स्वामी वडेपुरीकर

चागंले संस्कार टिकविण्यासाठी वाचन संस्कृतीची गरज : डॉ. शंकर स्वामी वडेपुरीकर ‌पु.अहिल्यादेवी वाचनालयात " वाचन संकल्प महाराष्ट्राचा...