आमदार दत्तात्रेय भरणे यांनी घेतली राज्यमंत्रीपदाची शपथ
महाराष्ट्र विधानसभेतील धनगर समाजाचे एकमेव सदस्य आमदार दत्तात्रय भरणे यांनी आज दिनांक ३० डिसेंबर २०१९ रोजी महाराष्ट्र राज्याच्या राज्यमंत्री पदाची शपथ घेतली. राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी त्यांना गोपनियतेची शपथ दिली.
इंदापूर विधानसभा मतदार क्षेत्राचे आमदार दत्तात्रेय भरणे शेतकरी कुंटूबातील साधे व्यक्तीमत्व म्हणून परिचित आहे. कुंटूबाला राजकारणातील घराणेशाहीचा वारसा नाही. केवळ पक्षनिष्ठा व विकासकामांच्या जोरावर आज मंत्रीपदापर्यंत मजल मारली आहे.
१९९२ साली वयाच्या २२ व्या वर्षी भवानीनगरमधील श्री छत्रपती सहकारी साखर कारखान्याचे संचालकपदापासून त्यांची सुरवात झाली. १९९६ साली पुणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बॅंकेचे संचालकपदी काम करण्याची संधी मिळाली. संचालक पदाच्या संधीचे सोने करुन शेतकऱ्यांच्या अनेक प्रश्न मार्गी लावले. २००१ साली जिल्हा बॅंकेचे अध्यक्ष होण्याचा बहुमान भरणे यांना मिळाला.
यानंतर २००३ ते २००८ पर्यत भवानीनगरच्या श्री छत्रपती सहकारी साखर कारखान्याची अध्यक्ष म्हणून धुरा संभाळली. २००९ च्या विधानसभा निवडणूकीमध्ये बंडखाेरी करुन निवडणूक लढविली. मात्र निवडणूकीमध्ये थोड्या मतांनी पराभव झाला. २०१२ साली भरणे यांनी जिल्हा परिषदेची निवडणूक लढवून थेट पुणे जिल्हा परिषदेचे अध्यक्षच झाले.
इंदापूर तालुक्यामध्ये जिल्हा परिषदेच्या माध्यमातून कोट्यावधी रुपयांचा विकासनिधी आणून विकासकामांच्या जोरावर भरणे यांनी २०१४ ची विधानसभा निवडणूक सहज जिंकली. पाच वर्षामध्ये विराेधी पक्षाचा आमदार असतानाही जिल्हामध्ये सर्वाधिक निधी खेचून आणून तालुक्याचा विकास केला. याच काळामध्ये सत्ताधारी भाजपने अनेक आमिष दाखवून पक्षामध्ये घेण्यासाठी प्रयत्न केले. मात्र या आमिषाला भरणे बळी पडले नाहीत. त्यांनी पक्षनिष्ठा सोडली नाही. विकासाच्या जोरावर २०१९ च्या विधानसभा निवडणूकीमध्ये भरणे यांनी माजी सहकारमंत्री हर्षवर्धन पाटील यांचा दुसऱ्यादां पराभव केला. महाविकासआघाडीच्या सरकारमध्ये त्यांना राज्यमंत्री म्हणून काम करण्याची संधी मिळाली असून संधीचे सोने केल्याशिवाय राहणार नाही.
आमदार दत्तात्रेय भरणे यांनी २०१४ च्या विधानसभागृहात धनगर समाजाच्या आरक्षण प्रश्नावर आवाज उठविला होता. ७ ऑगस्ट २०१८ ला मराठा, धनगर समाज्याच्या आरक्षण प्रश्नावर विधानसभा सदस्यत्वचा राजिनामा देण्याची घोषणा केली होती. आ. भरणे यांनी राज्यमंत्रीपदाची शपथ घेतल्यानंतर महाराष्ट्रातील धनगर समाजात उत्साहाचे वातावरण आहे.
नाव- दत्तात्रेय विठोबा भरणे
वय- ५०
मतदार संघ- इंदापूर
शिक्षण- पदवीधर (बी.कॉम)
पक्ष- राष्ट्रवादी कॉग्रेस पार्टी
राजकीय कारर्किद -
श्री छत्रपती सहकारी साखर कारखाना संचालक - १९९२ ते
श्री छत्रपती सहकारी साखर कारखान्याचे अध्यक्ष- २००३ ते २००६
पुणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बॅंकेचे संचालक - १९९६
पुणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बॅंकेचे अध्यक्ष - २००१ते २००३
पुणे जिल्हा परिषदेचे सदस्य व अध्यक्ष- २०१२ ते २०१४
इंदापूर तालुक्याचे आमदार - २०१४ ते २०१९
इंदापूर तालुक्याचे दुसऱ्यांदा आमदार- २०१९, आता महाराष्ट्राचे राज्यमंत्री
'राष्ट्र भारती' ला भेट दिल्याबद्दल आपला आभारी आहे. आपल्या प्रतिक्रिया जरुर कळवा.
ReplyDelete