Sunday, December 1, 2019

माणदेश मॅरेथॉन स्पर्धा - डिसेंबर २०१९

माणदेश मॅरेथॉन स्पर्धेत पुकळेवाडीचा बाळू पुकळे तिसरा



माणदेशात आज ‍१ डिसेंबरला पार पडलेल्या राष्ट्रीय पातळीवरील धावण्याच्या स्पर्धेत पुकळेवाडीच्या बाळु पोपट पुकळे या गुणवंत खेळाडूने तिसरा क्रमंक पटकावलाय. 'वडूज रनर्स फौंडेशन'च्यावतीने माणदेश मॅरेथॉन स्पर्धा आयोजीत केली होती.  या स्पर्धेच्या ब्रँड ऍम्बीसिडर होत्या माणदेशी कन्या आतंरराष्ट्रीय धावपटू अर्जुन पुरस्कारप्राप्त ललिता बाबर. 

पुकळेवाडीचा धावपट्टू बाळू पुकळे या खेळाडूने जीवाची बाजी लावून २१ किलोमीटरचे अंतर १ तास १३ मिनीटं ३३ सेकंदात पार केल. माणदेश मॅरेथॉन स्पर्धेत बाळू पुकळे विजयी धाव घेताच पुकळेवाडी ग्रामस्थांनी कौतुक आणि अभिनंदनाचा वर्षाव केला. या स्पर्धेत पुकळेवाडी गावातून २० खेळाडूंनी सहभाग घेतला.  पुकळेवाडीतील सहभागी खेळाडूंसाठीचा खर्च तुषार जालिंदर पुकळे यांनी केला.  स्पर्धेतील सहभागी खेळाडूंना ग्रामस्थांनी प्रोत्साहन दिले.
माण-खटाव तालुक्यातील ही हाफ मॅरेथॉन स्पर्धा दक्षिण आफ्रिकेच्या धर्तीवर आयोजीत केली होती. माण-खटाव तालुक्यातील एका शहरापासून दुसर्‍या शहरापर्यंत म्हणजे गोंदवले ते वडूज अशी स्पर्धा होती. २१ किलोमीटर धावण्याची स्पर्धा सकाळी ६ वाजता, ५ किलोमीटर सकाळी ८:३० वाजता व दोन किलोमीटर ९ वाजता सुरू झाली. २१ किलोमीटरच्या स्पर्धेची सुरवात गोंदवले बुद्रुक, दहिवडी, पिंगळी, मांडवे ते वडूज या मार्गे होती. धावपटूंना चेअरअप देण्यासाठी दर १ किलोमीटर वर पारंपरिक सांस्कृतिक कार्यक्रमाचे नियोजन, तसेच ऊर्जा येण्यासाठी अंडी, केळी, पिण्याचे पाणी, थंड पेये, ओआरएस ठेवण्यात आले होते. 
सहभागी झालेल्या स्पर्धकांना टी-शर्ट, टायमिंग चिप, मेडल व जेवण देण्यात आले. स्पर्धेसाठी २१ किलोमीटरसाठी  १०५४ तसेच २ व ५ किलोमीटरसाठी १५०० धावपटूंनी सहभाग घेतला. या स्पर्धेत महिला-पुरुष सहभागी झाले होते.




1 comment:

  1. 'राष्ट्र भारती' ला भेट दिल्याबद्दल आपला आभारी आहे. आपल्या प्रतिक्रिया जरुर कळवा.

    ReplyDelete

चागंले संस्कार टिकविण्यासाठी वाचन संस्कृतीची गरज : डॉ. शंकर स्वामी वडेपुरीकर

चागंले संस्कार टिकविण्यासाठी वाचन संस्कृतीची गरज : डॉ. शंकर स्वामी वडेपुरीकर ‌पु.अहिल्यादेवी वाचनालयात " वाचन संकल्प महाराष्ट्राचा...