यवतमाळमध्ये जिल्हाधिकारी कार्यालयावर मेंढपाळांचा धडक मोर्चा
आज दिनांक २८/०७/२०22 रोजी कोणत्याही राजकीय नेत्याविना मेंढपाळ बांधवानी जिल्हाधिकारी कार्यालयावर धडक मोर्चा काढला. मेंढपाळ बांधव मोर्च्यात मोठ्या संख्येने सहभागी झाले होते. मोर्चाचे नेतृत्व युवा नेते वैजनाथ पावडे, पवन थोटे, नत्थूमामा महानर, पार्थ शिंदे, निलेश गादे, प्रशांत गोडसे, यांनी केले होते. मेंढपाळ बांधवांचा भव्य मोर्चा जिल्हाधिकारी कार्यालयावर धडकला. विविध मागण्यांचे शांततेत निवेदन दिले. मेंढपाळ बांधवाना वनविभागाच्या वतीने त्रास दिला जातो, पैशाची मागणी केली जाते, असा आरोप श्री. वैजनाथ पावडे यांनी समाज माध्यमांशी बोलताना केला. श्री. पावडे पुढे म्हणाले, आज आम्ही कळकळीची विनंती करत आहोत, भविष्यात मेंढपाळांना कोणत्याही प्रकारचा त्रास झाल्यास आम्ही शांत बसणार नाही, कर्मचारी असो किंवा अधिकारी यांना रस्त्यावर उतरून धडा शिकवू.
आम्ही इथले मूलनिवासी आहोत, मात्र आम्हला चोर असल्यासारखी वागणूक दिली जाते. खरतर आम्ही वनाच रक्षण करतो. मेंढ्या वनात कुठल्याही प्रकारचे नुकसान करत नाही. तरीही आमचे मूलभूत हक्क डावलून वनविभागाचे अधिकारी अरेरावीची भाषा करतात, हे थांबले पाहिजे, अशी मागणी पार्थ शिंदे यांनी केली.
यवतमाळमध्ये मेंढ्यासाठी वनचराई क्षेत्र उपलब्ध करा, अशा प्रकारचा फलक मेंढपाळ बांधवांनी हातात धरला होता. येत्या हिवाळी अधिवेशनावर २ लाख मेंढपाळ बांधवांचा धडक मोर्चा काढन्याचा इशारा यावेळी मोर्चेकऱ्यांनी दिला.
व्हिडिओ पहा मेंढपाळ धडक मोर्चा
No comments:
Post a Comment