Friday, July 1, 2022

जातीनिहाय जनगणनेसाठी महादेव जानकर यांच्या नेतृत्वात संसदेवर मोर्चा : काशिनाथ (नाना) शेवते

जातीनिहाय जनगणनेसाठी महादेव जानकर यांच्या नेतृत्वात संसदेवर मोर्चा : काशिनाथ (नाना) शेवते 

नागपुर येथे प्रा.रमेश पिसे यांच्यासह शेकडो कार्यकर्त्याचा रासपमध्ये जाहीर प्रवेश 

राष्ट्र भारती द्वारा, नागपूर (२८/०६/२०२२)

ओबीसींची जातीनिहाय जनगणना करून, संपूर्ण मंडल कमिशन लागू करा, क्रिमिलेरची अट रद्द करा, खासगीकरनात आरक्षण लागू करा आदी मागण्यांना घेऊन राष्ट्रीय समाज पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष महादेवजी जानकर यांच्या नेतृत्वात पावसाळी अधिवेशनात संसदेवर मोर्चा काढण्यात येणार आहे, अशी माहिती रासपचे महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष काशिनाथ शेवते यांनी दिली. श्री. शेवते नागपूर प्रेस क्लबमध्ये रासप आढावा बैठकीवेळी पत्रकार परिषदेत बोलत होते.

यावेळी रासपचे राष्ट्रीय संघटक, तेलंगणा राज्य प्रभारी गोविंदराम शुरनार, महाराष्ट्र प्रदेश सचिटणीस ज्ञानेश्वर सलगर, विदर्भ संपर्क प्रमुख राजेंद्र पाटील, नागपूर जिल्हा परिषद माजी अध्यक्ष पुरुषोत्तम डाखोळे, प. महाराष्ट्र युवक अध्यक्ष अजित पाटील, नागपूर शहर अध्यक्ष डॉ. अनंत नास्नुरकर, प्रा. बलदेव आडे, हरिकिसन हटवार, संजय कन्नमवार (चंद्रपूर जिल्हा प्रभारी), एड. दीप्ती सुर्वे, कामराज मापाडी, प्रदीप पातूर्डे( अमरावती जिल्हा प्रभारी), दत्ता मेश्राम (नागपूर जिल्हा प्रभारी) आदी मान्यवर उपस्थित होते. 

श्री. शेवते पत्रकार परिषदेत पुढे म्हणाले, सर्वसामान्यांच्या प्रश्नावर राष्ट्रीय समाज पक्ष लढणार आहे. महागाईचा आगडोंब उसळला आहे. शेतकऱ्यांच्यासाठी रासायनिक खतांच्या किंमती भरमसाठ वाढल्या आहेत. महागाई गगनाला भिडत चाललेली असून बेरोजगार युवकांची संख्या वाढत आहे. शासकीय संस्थाच्या खासगिकरणास राष्ट्रीय समाज पक्ष विरोध दर्शवणार आहे. विदर्भ राज्याच्या मागणीस राष्ट्रीय समाज पक्षाने वेळोवेळी समर्थन दिले आहे. विदर्भात सर्वच स्तरातील, समविचारी लोकांना पक्षात स्थान दिले जाणार आहे.  पक्ष संघटन बांधणीकडे लक्ष केंद्रित केले आहे. आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकात सर्वच जागावर लढण्याचे आदेश देण्यात आले आहेत. 

आढावा बैठकीत ओबीसी समाजाचे नेते प्रा. रमेश पिसे यांनी राष्ट्रनायक महादेव जानकर यांच्या नेतृत्वावर, विश्वास ठेवून राष्ट्रीय समाज पक्षात जाहीर प्रवेश केला. पक्ष प्रवेशावेळी प्रा. पिसे म्हणाले, मी योग्य नेतृत्वाच्या शोधात होतो. एससी एसटी ओबीसी सर्वच समाजासाठी महादेव जानकर यांचे योग्य नेतृत्व आहे. राष्ट्रीय समाज पक्षात येण्यास उशीर झाला. भाजप, काँग्रेस, राष्ट्रवादी शिवसेनासारखे प्रस्थापित पक्ष बहुजनांच्या प्रश्नांना कधीच प्राधान्य देत नाहीत. आता स्वतःची लढाई, स्वत:च करावी लागेल यावर आम्ही ठाम आहोत. डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी प्रती माणसाचे मूल्य एकच ठरवले आहे, याची जाणीव बहूसंख्याक राष्ट्रीय समाजाला होत आहे. येणारा काळ सर्वसामान्यांचा असेल.

प्रा. रमेश पिसे यांच्यासोबत नरेंद्र चौधरी, रणजीत चंदनखेडे, अनिल गुल्हाने, ऋषिकेश भांडारकर, सीमा वाडबुदे, ताराचंद मेंढे, रामदास माहुरे, देविदास आगरकर, दत्ता मेश्राम, निलेश चांडक, रोशन गायकवाड, प्रशांत शिंगाडे, अतुल पांडे, सुनील शेंडे, पांडुरंग सेबे, राजन गोंडाने, अरुण चुरड, बेबी गाडेकर, अशा खंडाते, पंचफुला नाईक, बबीता कासबांडे, विकास पांडे, अजय नाखले, उमाजी गजभिये, नरेंद्र चौधरी, रंजीत चंदनखेडे, अजय गुल्हाने, पालाश सांडेल, अर्चना चव्हाण, कविता सहारे, संदेश गवई आदी प्रमुख पदाधिकऱ्यांनी राष्ट्रीय समाज पक्षात प्रवेश केला. प्रा. पिसे यांच्या प्रवेशाने राष्ट्रीय समाज पक्षाचे बळ वाढले असल्याची चर्चा चालू आहे.









विदर्भ राष्ट्रीय समाज पक्षाचे अध्यक्ष श्री. प्रा. रमेश पिसे व विदर्भ संपर्क प्रमुख राजेंद्र पाटील दिनांक ३ जुलै २०२२ रोजी अमरावती जिल्हा दौऱ्यावर जाणार आहेत, अशी माहिती राष्ट्रीय संघटक गोविंदराम शुरणर यांनी दिली.

1 comment:

  1. येणार काळ नक्कीच रासपा चा राहणार आहे ,जय भारत🙏

    ReplyDelete

चागंले संस्कार टिकविण्यासाठी वाचन संस्कृतीची गरज : डॉ. शंकर स्वामी वडेपुरीकर

चागंले संस्कार टिकविण्यासाठी वाचन संस्कृतीची गरज : डॉ. शंकर स्वामी वडेपुरीकर ‌पु.अहिल्यादेवी वाचनालयात " वाचन संकल्प महाराष्ट्राचा...