Saturday, December 4, 2021

वाफगाव येथे महाराजा यशवंतराव होळकर जयंती सोहळा संपन्न

वाफगाव येथे महाराजा यशवंतराव होळकर जयंती सोहळा संपन्न

महाराजा यशवंतराव होळकर यांचा 246 वा जयंती सोहळा काल दि. 3 डिसेंबर 2021 रोजी त्यांचे जन्मस्थळ भुईकोट किल्ला वाफगाव येथे  अहिल्यारत्न फौंडेशन संचलित महाराजा यशवंतराव होळकर जयंती उत्सव समितीच्या माध्यमातून साजरा करण्यात आला.

महाराजांच्या प्रतिमेची मिरवणूक काढून कार्यक्रमास सुरुवात झाली. सकाळी 11.30 वाजता मुख्य सभेस सुरुवात झाली. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी पुण्यश्लोक अहिल्यादेवी शेळी मेंढी महामंडळाचे माजी अध्यक्ष माननीय बाळासाहेब दोडतले होते. प्रमुख वक्ते जेष्ठ साहित्यिक व इतिहास संशोधक मा. संजय सोनवणी होते. प्रमुख पाहुणे म्हणून इंदौरच्या होळकर घराण्यातील मा. भूषणसिंहराजे होळकर, डॉ. उज्वलाताई हाके, प्रकाश खाडे, श्री ज्ञानयोग सेवा ट्रस्टचे संस्थापक प्रा. डॉ राजेंद्र खेडेकर, पुण्यश्लोक साप्ताहिकाचे संपादक गणेश पुजारी, समरसता मंचाचे रवी ननावरे, डॉ स्नेहा सोनकाटे,  काकासाहेब मारकड, गोविंदराव देवकाते तसेच भगवानराव जऱ्हाड, नवनाथ बुळे, वाफगावचे सरपंच उमेश रामाने, शाळा नियोजन समितीचे धनंजय भागवत, विद्यालयाचे मुख्याध्यापक श. आ.  तासगावकर तसेच बहुसंख्येने समाज बांधव व वाफगाव ग्रामस्थ उपस्थित होते.

जयंती उत्सव समितीतर्फे आलेल्या पाहुण्यांचे स्वागत महाराजा यशवंतराव होळकरांची मूर्ती भेट देऊन करण्यात आले. जय मल्हार सेनेच्यातर्फे विद्यार्थ्यांना खाऊ चे वाटप करण्यात आले. संवर्धन समितीच्या वतीने राणी महालातील आकर्षक सजावट करण्यात आली होती.

यावेळी जयंती उत्सव समितीतर्फे अध्यक्ष योगेशराजे होळकर, सचिव योगेश काळे, कार्याध्यक्ष किरण सोनवलकर पाटील, उपाध्यक्ष विकास माने, विक्रांत काळे, राजेश होळकर, तुषार काळे, रंगनाथ होळकर, राहुल सलगर, संदीप वैद्य, संतोष वरक आदींनी कार्याक्रमचे नियोजन केले.


शिक्षक विजय कराळे सर यांनी आद्य स्वातंत्र्य वीर अजिंक्य दादा चक्रवर्ती महाराजाधिराज श्रीमंत यशवंतराव होळकर यांचे अलका वर चित्र रेखाटले होते त्याबद्दल त्यांचा अहिल्या रत्न फाउंडेशन च्या वतीने सत्कार करण्यात आला.

कार्यक्रमास उपस्थित असलेल्या सर्व समाज बांधवांचे, ग्रामस्थांचे, विद्यार्थ्यांचे, मान्यवरांचे अहिल्यारत्न फौंडेशन संचालित, महाराजा यशवंतराव होळकर जयंती उत्सव समिती, महाराष्ट्र राज्य तर्फे आभार मानले.

No comments:

Post a Comment

चागंले संस्कार टिकविण्यासाठी वाचन संस्कृतीची गरज : डॉ. शंकर स्वामी वडेपुरीकर

चागंले संस्कार टिकविण्यासाठी वाचन संस्कृतीची गरज : डॉ. शंकर स्वामी वडेपुरीकर ‌पु.अहिल्यादेवी वाचनालयात " वाचन संकल्प महाराष्ट्राचा...