Sunday, December 26, 2021

प्रबोधनकार गोविंदराम शूरनर यांचे साहित्य राष्ट्रीय समाजाला मार्गदर्शक : सिद्धप्पा अक्कीसागर

प्रबोधनकार गोविंदराम शूरनर यांचे साहित्य राष्ट्रीय समाजाला मार्गदर्शक : सिद्धप्पा अक्कीसागर

"स्वराज्य रक्षणार्थ क्रांतिवीरांचा संघर्ष" पुस्तकाचे श्री. अक्कीसागर यांचे शुभहस्ते पुण्यात प्रकाशन

पुणे : प्रबोधनकार/लेखक गोविंदराम शूरनर यांचे साहित्य बहुसंख्यांक राष्ट्रीय समाजासाठी मार्गदर्शक आहे, असे प्रतिपादन रासेफचे राष्ट्रीय अध्यक्ष सिद्धप्पा अक्कीसागर यांनी केले आहे. लेखक गोविंदराम शूरनर यांच्या "स्वराज्य रक्षणार्थ क्रांतिवीरांचा संघर्ष" या पुस्तकाचे प्रकाशन राष्ट्रीय समाज पक्षाचे संस्थापक सदस्य/ कानिगेली विश्व धर्मपीठाचे सदस्य, यशवंत नायकचे कार्यकारी संपादक,  राष्ट्रीय समाज एम्प्लॉइज फेडरेशनचे राष्ट्रीय अध्यक्ष सिद्धप्पा अक्कीसागर साहेब यांच्याहस्ते पार पडले.  दिनांक १० ऑक्टोबर  २०२१ रोजी पुण्यात रासेफच्या बैठकीवेळी प्रकाशनाचा कार्यक्रम पार पडला. यावेळी रासेफचे बहुसंख्य सदस्य उपस्थित होते.

पुस्तक प्रकाशनप्रसंगी श्री. अक्कीसागर म्हणाले, प्रबोधनकार गोविंदराम शुरनर यांनी नोकरीत असल्यापासून यशवंत सेना व पुढे रासपच्या कार्यात झोकून दिले. त्यांचे साहित्यातील सामाजिक व राजकीय लिखाण दर्जेदार राहिले आहे. राष्ट्रीय समाजाला मार्गदर्शक आहे. असत्याकडून सत्याकडे घेऊन जाणारे लिखाण केले आहे.

स्वराज्य रक्षणार्थ क्रांतीविरांचा संघर्ष या पुस्तकाची महाराष्ट्र शासनाने महाराष्ट्र शासनाने निवड केली आहे, अशी महिती लेखक गोविंदराम शुरनर यांनी दिली. 'स्वराज्य रक्षणार्थ क्रांतिवीरांचा संघर्ष' पुस्तक प्रकाशन सोहळ्यात उपस्थितांनी टाळ्या वाजवून स्वागत केले.

No comments:

Post a Comment

चागंले संस्कार टिकविण्यासाठी वाचन संस्कृतीची गरज : डॉ. शंकर स्वामी वडेपुरीकर

चागंले संस्कार टिकविण्यासाठी वाचन संस्कृतीची गरज : डॉ. शंकर स्वामी वडेपुरीकर ‌पु.अहिल्यादेवी वाचनालयात " वाचन संकल्प महाराष्ट्राचा...