Monday, December 20, 2021

महात्मा फुलेंच्या सत्यशोधक समाजात संविधानाचे मूळ : अक्कीसागर

महात्मा फुलेंच्या सत्यशोधक समाजात संविधानाचे मूळ : अक्कीसागर


रासेफतर्फे राष्ट्रपिता महात्मा ज्योतिबा फुले स्मृतिदिन व संविधान दिन साजरा

मुंबई :  महात्मा फुलेंच्या सत्यशोधक समाजात संविधानाचे मूळ सापडते असे मत रासेफचे राष्ट्रीय अध्यक्ष एस एल अक्कीसागर यांनी व्यक्त केले आहे. दि. २८ नोंव्हे २०२१ रोजी राष्ट्रपिता महात्मा जोतिराव फुले यांच्या  स्मृतिदिन व संविधान दीन रासेफ तर्फे साजरा करण्यात आला. 

ऑनलाईन मीटिंगद्वारे अनेक मान्यवर सहभागी झाले.  रासेफचे महाराष्ट्र अध्यक्ष सतीश नाजरकर यांनी संविधानाला पुष्प अर्पण करुन कार्यक्रमाची सुरुवात केली. स्वातंत्र्य ,समता, बंधुता व न्याय प्रस्थापित करण्यासाठी संविधानाची गरज आहे. केडर घेण्यासाठी प्रत्येक जिल्हातून दहा रा-सेफ सदस्याची यादी देण्याचे आवाहन श्री. नाजरकर यांनी केले.
रा-सेफचे राष्ट्रीय अध्यक्ष एस.एल.अक्कीसागर यांनी मध्ययुगीन, अर्वाचीन भारताचा इतिहासात राज्यकारभारामध्ये कोण लोक होते, त्यांनी आपल्या बुद्धिचातुर्याने राज्यकारभारामध्ये कसा सहभाग घेतला, याची  सखोल आणि सविस्तर माहीती दिली. इंग्रज राजवटीमध्ये अनेक लोकांनी  केलेल्या समाज हितासाठीच्या कार्याचा उल्लेख त्यांनी यावेळी केला. न्यायमूर्ति महादेव गोंविद रानडे, महात्मा जोतिराव फुले सहित दादाभाई नवरोजी, टिळक, आगरकर, गोपालकृष्ण गोखले, लोकहितवादी अशा विविध जाती धर्माच्या समाज सुधारक  महानुभाव यांच्या कार्याचे वस्तुनिष्ठ मुल्यमापन केले. सर्वधर्मीय पुराणमतवादी आणि नवमतवादी यांच्या झगडयात मध्यममतवादी विचार मांडला जात असताना  जोतिबा फुले यानी 24 सप्टेंबर 1871 रोजी 'सत्यशोधक समाज' स्थापन केला.   आर्य समाज, ब्राम्हो समाज, प्रार्थना समाज, थियोसोफिकल समाज यापेक्षा 'सत्यशोधक समाज'  आगळा वेगळा राहिला आहे. महात्मा फुलेंनी स्थापन केलेल्या सत्यशोधक समाजाचे कार्य 'असत्याचा पर्दाफाश' करणारे तसेच 'सत्याचा आग्रह' धरणारे होते. फुलेवादाचे विचार मुलभुत आणि मानवी मूल्य जोपसणारे समतेवर आधारित होते.  जोतिबा फुले आधुनिक सामाजिक भारताचे आद्य पितामह होते. त्यांनी निर्माण केलेल्या सत्यशोधक समाजात संविधानाचे मूळ सापडते, असा दावा श्री. अक्किसागर यांनी केला.  श्री. अक्कीसागर पुढे म्हणाले, 1870 साली पुण्यात पुणे सार्वजनिक सभेची स्थापना झाली . सार्वजनिक सभेचे 1885 मध्ये इंडियन न‍ॅशनल काॅग्रेसमध्ये रुपांतरित झाले, नेमस्त व जहाल गटाची उभारणी,  ब्रिटिश सरकारशी संवाद साधने हा सार्वजनिक सभेचा उद्धेश होता. इंग्रज सर ह्यूम यांनी स्थापन केलेल्या कॉंग्रेसचा भारताचे स्वातंत्र्य हा  उद्धेश होता.  या सर्व  विचार प्रवाहावर अभ्यास केला पाहिजे, त्यातून शिकले पाहिजे. कॉंग्रेसमध्ये  जहाल आणि गांधी नेमस्त मानले गेले. पुढे कोंग्रेस नेमस्त तर भाजपा जहाल पक्ष बनले असल्याचा मत श्री. अक्कीसागर यांनी व्यक्त केले. बिरसा मुंडा,भगतसिंग अशा अनेक क्रांतिकारक राष्ट्रीय समाज घटकानी केलेले कार्य, त्याग व बलीदान यांच्या राष्ट्र निर्माण कार्यातील महत्व पटवून दिले. आपण मध्ययुगीन भारत व आधुनिक भारत अभ्यास करत असताना त्यांतील बारकावे लक्षात घेवून  त्यांच्या कार्यातून प्रेरणा, धड़े- घेवून आपण काम केले पाहिजे, तेव्हांच आपण बलशाली भारत निर्माण करु शकतो. असे श्री अक्कीसागर  यानी नमूद केले. भारतामध्ये जगभरातून अनेक समुदाय लोकसमूह आले. त्यानी येथे राज्यकारभार केला. आपण मात्र सुवर्ण मध्यमवाद स्विकारुन, फुलेवादाच्या मार्गावर स्वातंत्र्य,  समता,बंधुता व न्यायावर आधारित कार्य करुन राष्ट्रीय समाजाच्या जीवनामध्ये परिवर्तन घडवून , बलशाली भारत निर्माण करण्यासाठी प्रयत्न करणार आहोत.
कार्यक्रमामध्ये अनेक रा-सेफ सदस्य उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन रा-सेफचे सचिव जयसिंग राजगे यांनी केले. रा-सेफचे खजिनदार राजेंद्र कोकरे यांनी सर्वाचे आभार मानले.

No comments:

Post a Comment

चागंले संस्कार टिकविण्यासाठी वाचन संस्कृतीची गरज : डॉ. शंकर स्वामी वडेपुरीकर

चागंले संस्कार टिकविण्यासाठी वाचन संस्कृतीची गरज : डॉ. शंकर स्वामी वडेपुरीकर ‌पु.अहिल्यादेवी वाचनालयात " वाचन संकल्प महाराष्ट्राचा...