Tuesday, December 28, 2021
Sunday, December 26, 2021
प्रबोधनकार गोविंदराम शूरनर यांचे साहित्य राष्ट्रीय समाजाला मार्गदर्शक : सिद्धप्पा अक्कीसागर
प्रबोधनकार गोविंदराम शूरनर यांचे साहित्य राष्ट्रीय समाजाला मार्गदर्शक : सिद्धप्पा अक्कीसागर
"स्वराज्य रक्षणार्थ क्रांतिवीरांचा संघर्ष" पुस्तकाचे श्री. अक्कीसागर यांचे शुभहस्ते पुण्यात प्रकाशन
पुणे : प्रबोधनकार/लेखक गोविंदराम शूरनर यांचे साहित्य बहुसंख्यांक राष्ट्रीय समाजासाठी मार्गदर्शक आहे, असे प्रतिपादन रासेफचे राष्ट्रीय अध्यक्ष सिद्धप्पा अक्कीसागर यांनी केले आहे. लेखक गोविंदराम शूरनर यांच्या "स्वराज्य रक्षणार्थ क्रांतिवीरांचा संघर्ष" या पुस्तकाचे प्रकाशन राष्ट्रीय समाज पक्षाचे संस्थापक सदस्य/ कानिगेली विश्व धर्मपीठाचे सदस्य, यशवंत नायकचे कार्यकारी संपादक, राष्ट्रीय समाज एम्प्लॉइज फेडरेशनचे राष्ट्रीय अध्यक्ष सिद्धप्पा अक्कीसागर साहेब यांच्याहस्ते पार पडले. दिनांक १० ऑक्टोबर २०२१ रोजी पुण्यात रासेफच्या बैठकीवेळी प्रकाशनाचा कार्यक्रम पार पडला. यावेळी रासेफचे बहुसंख्य सदस्य उपस्थित होते.
पुस्तक प्रकाशनप्रसंगी श्री. अक्कीसागर म्हणाले, प्रबोधनकार गोविंदराम शुरनर यांनी नोकरीत असल्यापासून यशवंत सेना व पुढे रासपच्या कार्यात झोकून दिले. त्यांचे साहित्यातील सामाजिक व राजकीय लिखाण दर्जेदार राहिले आहे. राष्ट्रीय समाजाला मार्गदर्शक आहे. असत्याकडून सत्याकडे घेऊन जाणारे लिखाण केले आहे.
स्वराज्य रक्षणार्थ क्रांतीविरांचा संघर्ष या पुस्तकाची महाराष्ट्र शासनाने महाराष्ट्र शासनाने निवड केली आहे, अशी महिती लेखक गोविंदराम शुरनर यांनी दिली. 'स्वराज्य रक्षणार्थ क्रांतिवीरांचा संघर्ष' पुस्तक प्रकाशन सोहळ्यात उपस्थितांनी टाळ्या वाजवून स्वागत केले.
Monday, December 20, 2021
महात्मा फुलेंच्या सत्यशोधक समाजात संविधानाचे मूळ : अक्कीसागर
महात्मा फुलेंच्या सत्यशोधक समाजात संविधानाचे मूळ : अक्कीसागर
Monday, December 13, 2021
तेलंगणा हैदराबाद येथे राष्ट्रीय संत कणकदास जयंती साजरी
तेलंगणा- हैद्राबाद येथे राष्ट्रीय संत कनकदास यांचा जंयती उत्सव साजरा करण्यात आला.त्यावेळी राष्ट्रिय समाज पक्षाचे राष्ट्रिय महासचिव कुमार सुशील, राष्ट्रिय संघटक गोविंदराम शूरनर, औरंगाबाद चे प्रभारी दत्ता मेहेत्रे मार्गदर्शन करताना, आमदार मल्लया व इतर नागरिक उपस्थित होते.
Sunday, December 5, 2021
मला समजलेले श्री. एस एल अक्कीसागर साहेब
श्री एस. एल अक्कीसागर साहेब यांचा आज 65 वा वाढदिवस त्यानिमित्ताने त्यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा..!
मला समजलेले श्री. एस एल अक्कीसागर साहेब
सिद्धाप्पा लक्ष्मण अक्कीसागर राष्ट्रीय समाज पक्षाचे मावळते राष्ट्रीय अध्यक्ष म्हणून आपणास परिचयाचे आहेत. श्री अक्कीसागर साहेब यांनी त्यांच्या कुटुंबाचा व त्यांचा प्रवास 'माता से जगदर्शन पिता से पहचान' या 'स्व'लिखित लेखात मांडला आहे, त्यातील माहितीची पुनरावृत्ती टाळून 'मला समजलेले अक्कीसागर साहेब, याविषयी त्यांच्या वाढदिवसानिमित्त थोडक्यात लिहत आहे.
श्री एस.एल अक्कीसागर साहेब यांच्या जीवनाची सुरुवात जबलपुर मध्यप्रदेशातुन होते, पुढे तो प्रवास पुणे- मुंबई, महाराष्ट्र, कर्नाटक सर्वत्र देशभर व्यापलेला आहे. मूळचे कर्नाटकचे असलेले श्री. एस. एल अक्कीसागर साहेब यांना वडिलांच्या नोकरीमुळे फुगेवाडी- पुणे येथे राहावे लागले. तेथे त्यांना काही मित्र भेटले- जोडले गेले, त्या परिसरात हुशार असल्यामुळे अक्कीसागर साहेब यांची ओळख निर्माण होत होती, त्यातून त्यांना तेथील स्थानिक पुढाऱ्यांनी शरद पवारांची भेट घडवून देण्याचे ठरवले व त्यांचे मत न जाणताच यांना काँग्रेसचे पद देऊ केले, ही वार्ता कळताच त्यांनी काँग्रेसचे पद नाकारले शिवाय शरद पवारांची भेट टाळली. काँग्रेस उमेदवाराचा प्रचार करावा असा त्यांना त्यांच्या मित्रांनी आग्रह धरला असता, त्यावेळी त्यांनी यापासून दूर राहणे पसंत केले.
रिझर्व बँक ऑफ इंडिया मध्ये ३७ वर्षाची सेवा केली. नोकरीच्या सुरुवातीला पुणे मुंबई डेक्कन एक्सप्रेसने प्रवास केला. त्यांनी त्यांच्या आयुष्यातील पहिले मत राष्ट्रपिता महात्मा ज्योतिराव फुले यांचे वारसदार यांना दिल्याचे श्री. अक्कीसागर सांगतात. श्री अक्कीसागर यांचे हिंदी, मराठी, इंग्रजी, कन्नड अशा विविध भाषांवर प्रभुत्व आहे. रिझर्व बँक ऑफ इंडियातील सेवानिवृत्तीनंतर अक्कीसागर यांच्यावर राष्ट्रीय समाज पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्षपदाची जबाबदारी आली. राष्ट्रीय अध्यक्षपदी असताना बिहार, केरळ, तमिळनाडू,तेलंगणा, छत्तीसगड राजस्थान, मध्य प्रदेश, उत्तर प्रदेश दिल्ली, गुजरात, कर्नाटक, गोवा आदी राज्यात पक्षाचे संघटन उभे करन्यासाठी त्यांनी मेहनत घेतली. बहुसंख्यांक असलेल्या भारतातील पशुपालक समाजात एक ओळख निर्माण करण्याचा प्रयत्न केला. त्यातून त्यांनी पाल -धनगर -गडरिया -रबारी रायका -कुरुबा- मालधारी- भरवाड या नावाने स्नेहसंमेलने आयोजित केली. विविध प्रांतात विखुरलेला विविध भाषिक समाज हा राष्ट्रीय समाज असल्याचे सांगितले. पशुपालक समाज हा विश्वाचा भुपालक समाज आहे.
राजकीय संधी अभावी ठेचा खाणारा, जनजागृती अभावी खच खळग्यातून वाटचाल करणारा बहुसंख्यांक धनगर समाजाची संघटीत शक्ती यशवंत सेनेच्या माध्यमातून तयार होत होती, त्या शक्तीला बुध्दीची युक्ती श्री. अक्कीसागर यांनी दिली. घोषवाक्य दिले, कार्यक्रम दिले, निशाण ठरवले, प्रचार प्रसाराची कोणतीही साधने नसताना कार्यक्रम आखले व ते राबवले.
त्यांनी नोकरी करत असताना बहुसंख्यांक राष्ट्रीय समाजाचा राजकीय पक्ष असावा अशी इच्छा बाळगली, 'आपला पक्ष आपला नेता' हे स्वप्न पाहिले, त्यासाठी त्यांचे मन अस्वस्थ होत होते. पुढे त्यांना राष्ट्रीय समाज पक्ष व नेता महादेव जानकर यांच्या रूपाने ते मिळाले.
महादेव जानकर या नेतृत्वास ते जपण्याचा व वाढवण्याचा आटोकाट प्रयत्न करतात. महादेव जानकर यांचे नेतृत्व हे डबक्यात साचून राहणाऱ्या पाण्यासारखे नसून खळखळत वाहणाऱ्या व प्रवाहाबरोबर वाहत जाणारे परिवर्तनवादी नेतृत्व आहे, असे ते सांगतात. महादेव जानकर यांच्या नेतृत्वाचे अस्तित्व नाकारणाऱ्या लोकांना २५ वर्षापूर्वी, २० वर्षांपूर्वी,१५ वर्षापूर्वी, १० वर्षापूर्वी, ५ वर्षांपूर्वी धनगर समाजाची अवस्था काय होती ? असा प्रश्न करून लक्ष वेधतात.
एस. एल. अक्कीसागर हे महाराजा यशवंतराव होळकर यांना आपले प्रतीक मानतात. कर्नाटकातील त्यांच्या घरी महाराजा यशवंतराव होळकर यांचे तैल चित्र रेखाटले आहे. महाराष्ट्रात मराठी भाषेत प्रकाशित केलेले यशवंत सेनेचे पत्रक त्यांनी पोस्टाने कर्नाटकातील बांधवांना पाठवले, मात्र तेथील कुलकर्णीने ते पत्र वाचून फेकून दिले व अपमानास्पद शब्द वापरले. यावर महाराजा यशवंतराव होळकर यांचे चित्र छापले होते. त्यातील मजकूर जरी वाचता येत नसला तरी, त्यातील चित्र मात्र तेथील बांधवांनी ओळखले होते, या घटनेवर प्रकाश टाकताना श्री. अक्कीसागर यांनी यशवंत नायकमध्ये कुलकर्णीचे ढोंग व माफीनामा यावर लीहले आहे.
30-जानेवारी-2014 हा दिवस राष्ट्रीय समाज पक्ष आणि महादेव जानकर यांच्यासाठी सत्ता संक्रमणाचा दिवस असल्याचे श्री अक्कीसागर म्हणतात, मात्र 2019 साली सत्ता संक्रमणाची वाटचाल करत असलेले महादेव जानकर व राष्ट्रीय समाज पक्ष यांनी महाराष्ट्रात ज्यांच्याशी दोस्ती केली त्यांनीच राजकीय पटलावरून संपवण्यासाठी कटकारस्थान रचले, मात्र दिल्लीच्या सत्तेचे लक्ष्य घेऊन मार्गक्रमण करणारा राष्ट्रीय समाज पक्ष महाराष्ट्राबाहेर लोकसभा निवडणुकीच्या रणसंग्रामात उतरला व आपले दिल्लीचे स्वप्न जिवंत असल्याचे एस. एल अक्कीसागर यांच्या नेतृत्वात सिद्ध करून दाखवले. ओबीसींच्या प्रश्नावर महाराष्ट्रातील कोणताही नेता ईशान्य भारतात पोहचलेला नाही, मात्र राष्ट्रीय समाज पक्षाच्या माध्यमातून महादेव जानकर यांचे नेतृत्व आसाम पर्यंत नेण्याचे काम अक्कीसागर यांनी केले आहे. भारतातील विविध नेतृत्वास महाराणी अहिल्याबाई होळकर जन्मगाव चौंडी येथे आणण्यासाठी एस. एल अक्कीसागरांनी प्रयत्न केले आहेत.
राष्ट्रीय समाज पक्षाचा उमेदवार महाराष्ट्राच्या विधानसभा मतदार क्षेत्रातून पहिल्यांदा जिंकला ,तेव्हा त्यांनी त्यांच्या आईस, ही गोष्ट सांगितली ; पण त्यांच्या अनपढ आईस यातले काहीच समजले नाही. लहानपणापासून श्री. अक्कीसागर चिकिस्तक वृत्तीचे असल्याकारणाने त्यांनी समाजाला अज्ञानाच्या अंधकरात घेऊन जाणाऱ्या, देवा धर्माच्या नावाखाली चालणाऱ्या रूढींना जुमानले नाही. राष्ट्रीय समाजातील महानायक उपेक्षित असल्याकारणाने राष्ट्रीय समाज उपेक्षित असल्याचे श्री अक्कीसागर सांगतात. महाराजा यशवंतराव होळकर यांचा 200 वा स्मृतीदिन भानपुरा येथे पार पाडला, तो दिवस आपल्या आयुष्यातील सर्वात महत्त्वाचा दिवस असल्याचे श्री अक्कीसागर सांगतात. शालेय पुस्तकात दिलेले नेतृत्व हे आमचे नसून महादेव जानकर हे आपले नेते आहेत असे श्री अक्कीसागर ठासून सांगतात. भारतातून गोरे इंग्रज गेले, तरी भारतात काळे इंग्रजांचे राज्य आहे आणि ह्या काळे इंग्रजांना हटवण्याचे काम राष्ट्रीय समाज पक्षाचे महादेव जानकर करतील असा दावा श्री. अक्कीसागर यांचा आहे.राष्ट्रीय समाज पक्षाच्या स्थापनेची आठवण सांगताना श्री अक्कीसागर सांगतात, रिझर्व बँकेच्या पायरीवर महादेव जानकर व आपण असंख्य बैठका घेतल्या. कालांतराने पुढे आम्हाला फोर्टला यशवंत नायकचे ऑफिस मिळाले. मासिक यशवंत नायकमधून श्री अक्कीसागर यांनी दर्जेदार स्फुटलेखन, विविध लेख, कविता, बातम्या, संपादकीय लेख लिहले आहेत. राष्ट्रीय समाज पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष पदाचा कार्यकाळ संपल्यानंतर श्री. अक्कीसागर यांनी 'रासेफ'चे संघटन उभे करण्याकडे जोर दिल्याचे समजते.
श्री. अक्कीसागर यांचे योगदान मोठे आहे. काही लोक जाणीवपूर्वक श्री एस एल अक्कीसागर यांचे नाव लपवतात. श्री एस एल अक्कीसागर यांच्याविषयी लिहिण्या बोलण्यासारखे भरपूर आहे, मात्र आज इतकेच लिहीत आहे.
राष्ट्र भारती द्वारा- आबासो पुकळे, मुंबई.
मो - ९६३७१२०४५३
दिनांक : ०५/१२/२०२१
Saturday, December 4, 2021
वाफगाव येथे महाराजा यशवंतराव होळकर जयंती सोहळा संपन्न
वाफगाव येथे महाराजा यशवंतराव होळकर जयंती सोहळा संपन्न
महाराजा यशवंतराव होळकर यांचा 246 वा जयंती सोहळा काल दि. 3 डिसेंबर 2021 रोजी त्यांचे जन्मस्थळ भुईकोट किल्ला वाफगाव येथे अहिल्यारत्न फौंडेशन संचलित महाराजा यशवंतराव होळकर जयंती उत्सव समितीच्या माध्यमातून साजरा करण्यात आला.
महाराजांच्या प्रतिमेची मिरवणूक काढून कार्यक्रमास सुरुवात झाली. सकाळी 11.30 वाजता मुख्य सभेस सुरुवात झाली. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी पुण्यश्लोक अहिल्यादेवी शेळी मेंढी महामंडळाचे माजी अध्यक्ष माननीय बाळासाहेब दोडतले होते. प्रमुख वक्ते जेष्ठ साहित्यिक व इतिहास संशोधक मा. संजय सोनवणी होते. प्रमुख पाहुणे म्हणून इंदौरच्या होळकर घराण्यातील मा. भूषणसिंहराजे होळकर, डॉ. उज्वलाताई हाके, प्रकाश खाडे, श्री ज्ञानयोग सेवा ट्रस्टचे संस्थापक प्रा. डॉ राजेंद्र खेडेकर, पुण्यश्लोक साप्ताहिकाचे संपादक गणेश पुजारी, समरसता मंचाचे रवी ननावरे, डॉ स्नेहा सोनकाटे, काकासाहेब मारकड, गोविंदराव देवकाते तसेच भगवानराव जऱ्हाड, नवनाथ बुळे, वाफगावचे सरपंच उमेश रामाने, शाळा नियोजन समितीचे धनंजय भागवत, विद्यालयाचे मुख्याध्यापक श. आ. तासगावकर तसेच बहुसंख्येने समाज बांधव व वाफगाव ग्रामस्थ उपस्थित होते.
जयंती उत्सव समितीतर्फे आलेल्या पाहुण्यांचे स्वागत महाराजा यशवंतराव होळकरांची मूर्ती भेट देऊन करण्यात आले. जय मल्हार सेनेच्यातर्फे विद्यार्थ्यांना खाऊ चे वाटप करण्यात आले. संवर्धन समितीच्या वतीने राणी महालातील आकर्षक सजावट करण्यात आली होती.
यावेळी जयंती उत्सव समितीतर्फे अध्यक्ष योगेशराजे होळकर, सचिव योगेश काळे, कार्याध्यक्ष किरण सोनवलकर पाटील, उपाध्यक्ष विकास माने, विक्रांत काळे, राजेश होळकर, तुषार काळे, रंगनाथ होळकर, राहुल सलगर, संदीप वैद्य, संतोष वरक आदींनी कार्याक्रमचे नियोजन केले.
शिक्षक विजय कराळे सर यांनी आद्य स्वातंत्र्य वीर अजिंक्य दादा चक्रवर्ती महाराजाधिराज श्रीमंत यशवंतराव होळकर यांचे अलका वर चित्र रेखाटले होते त्याबद्दल त्यांचा अहिल्या रत्न फाउंडेशन च्या वतीने सत्कार करण्यात आला.
कार्यक्रमास उपस्थित असलेल्या सर्व समाज बांधवांचे, ग्रामस्थांचे, विद्यार्थ्यांचे, मान्यवरांचे अहिल्यारत्न फौंडेशन संचालित, महाराजा यशवंतराव होळकर जयंती उत्सव समिती, महाराष्ट्र राज्य तर्फे आभार मानले.
युवाओं को महाराजा यशवंतराव को मनाना चाहिए अपना आदर्श : दादु महाराज
युवाओ को महाराजा यशवंतराव को मनाना चाहिए अपना आदर्श : दादु महाराज
इंदौर
देश के इतिहास में ख्यात स्वतंत्रता वीर इंदौर महाराजा श्रीमंत यशवंतराव होलकर (प्रथम) की 245वां जन्मोत्सव 3 दिसंबर को मनाई गई । बंगाली चौराहे के समीप महाराजा श्रीमंत यशवंत राव होलकर की प्रतिमा पर यशवंत सेना द्वारा श्रीमंत के जन्मोत्सव पर मार्ल्यापण एवं दीपोत्सव एवं आतिशबाजी का आयोजन शाम 6:30 बजे किया गया। संस्था के संयोजक रविन्द्र होलकर ने बताया की महामण्डलेश्वर श्री दादु जी महाराज के सानिध्य में मार्ल्यापण व दीपोत्सव एवं आतिशबाजी का आयोजन किया गया। श्री दादु जी महाराज ने बताया कि श्रीमंत का जीवन युवाओं के लिए प्रेरणास्त्रोत है। 28/10/1811 को उनका देहावसान भानपुरा, मध्यप्रदेश में हुआ था। वे हिंदी, मराठी, उर्दू, अंग्रेजी, फ़ारसी के भी ज्ञाता थे। वे एक ऐसे भारतीय शासक थे जिन्होंने अंग्रेजो को नाकों चने चबाने पर मजबूर कर दिया था। वे ऐसे शासक थे जिनका ख़ौफ अंग्रेजों में साफ-साफ दिखता था, इनसे अंग्रेज हर हाल में बिना शर्त समझौता करने को तैयार रहते थे। सुमित बोराडे ने कहा की इस वीर योद्धा को भी गुमनामी से इतिहास के पन्नों पर लाना जरूरी है संगठन के अध्यक्ष लक्ष्मण दातीर ने बताया की जिस प्रकार आज शहर में मामा को याद किया जा रहा है आने वाला समय श्रीमंत यशवंत राव होलकर जी का होगा जन-अभियान की शुरुआत करेंगे और स्कूलों में इतिहास के रूप में बच्चों को पाठ्यक्रम आये इसलिए मध्यप्रदेश शासन से प्रतिनिधि मिलेगा ।
इस अवसर पर कौशिक होलकर, धनंजय होलकर, पंडित मीत भवानी कश्यप, जीतू होलकर, मधुकर बुधे, अभिषेक गावड़े, मयूरेश पिंगले, संदीप राहणे, रंजित भांड, जतिन थोरात, सुमित बोराडे, जितेश होलकर, पियूष भिटे,कमल व्यास, सौरभ लांभाते, संदीप नजान,दीपक कोकरे, रामनरेश जादौन, संतोष वडगे, प्रवीण मतकर, गजेन्द्र मतकर, अभिषेक मिश्रा,मोनू साहू आनंद साहू,जय सिंह चौहान,पी. सी मालवीय, प्रणव भोंडवे व कई युवा उपस्थित थे। कार्यक्रम का संचालन यतिश होलकर एवं आभार लक्ष्मण दातीर ने माना।
Friday, December 3, 2021
-
पीडित मुलीच्या न्यायासाठी महादेव जानकर प्रयागराज उत्तरप्रदेश येथे रस्त्यावर! पीडित कुटुंबीयांना भेटण्यासाठी निघालेल्या महादेव जानकर यांना प...
-
शेतकऱ्यांना सरसकट कर्जमाफी द्या; राष्ट्रीय समाज पक्ष तर्फे राज्यभरात तहसीलदार मार्फत सरकारकडे निवेदनशेतकऱ्यांना सरसकट कर्जमाफी द्या; राष्ट्रीय समाज पक्ष तर्फे राज्यभरात तहसीलदार मार्फत सरकारकडे निवेदन फलटण जिल्हा सातारा येथे तहसीलदार यांना ...
-
छ. शाहू राजा शतकातील सर्वश्रेष्ट राजा आहे ! *कारण;* *स्वत:च्या संस्थानाच्या तनख्याच्या प्रश्नाने नव्हे तर 'स्वराज्यात' (ब्रिटीश - ग...