'दमन आणि दिव'मध्ये राष्ट्रीय समाज पक्षाची संघटनात्मक ताकद वाढवू : के. प्रसन्नाकुमार
सिल्वासा येथे राष्ट्रीय समाज पक्ष बैठकीस उपस्थित पदाधिकारी समवेत राष्ट्रीय महासचिव के. प्रसन्नाकुमार |
सिल्वासा येथे राष्ट्रीय समाज पक्षाची बैठक पार पडली.
सिल्वासा : यशवंत नायक ब्यूरो
'दमन आणि दीव'मध्ये राष्ट्रीय समाज पक्षाची संघटनात्मक ताकद वाढवू, असे मत रासपचे राष्ट्रीय महासचिव के. प्रसन्नाकुमार यांनी व्यक्त केले आहे. श्री. प्रसन्नाकुमार हे 'दमन आणि दिव' या केंद्र शासित प्रदेशाच्या दौऱ्यावर आहेत. राजधानी सिल्वासा येथे राष्ट्रीय समाज पक्षाची आढावा बैठक घेतली.
भविष्यातील येणाऱ्या सर्व निवडणुका डोळ्यासमोर ठेवून राष्ट्रीय समाज पक्षाची संघटनात्मक ताकद वाढवण्यावर चर्चा करण्यात आली. यावेळी दमणआणि दिव अध्यक्ष अनुप कुमार सिंह, महासचिव सोमरंजन, सचिव विश्वनाथ, उपाध्यक्ष कालुराठरणी, कार्यकारणी सदस्य संदीप चौधरी, दीक्षित पांचाळ, अमित कुमार, अंकुश कुमार, अभिषेक कुमार, रितेश सिंह आदी उपस्थित होते.
No comments:
Post a Comment