Tuesday, September 28, 2021

'खोपोली ताबांटी युनिटमध्ये अभियांत्रिकी क्षेत्रातील एका कंपनीकडून कामगारांची पिळवणूक'; रासपचे कामगार राज्यमंत्र्यांना निवेदन

'खोपोली ताबांटी युनिटमध्ये  अभियांत्रिकी क्षेत्रातील एका कंपनीकडून कामगारांची पिळवणूक'; रासपचे कामगार राज्यमंत्र्यांना निवेदन

खोपोली : येथील ताबांटी युनिटमध्ये  अभियांत्रिकी क्षेत्रातील एका कंपनीत कामगारांना किमान वेतन व इतर सोई सुविधा देण्यात याव्या, अशी मागणी सरकारी कामगार अधिकारी यांच्या मार्फत कंपनीकडे राष्ट्रीय समाज पक्ष रायगड जिल्हा शाखेने केली होती. परंतु कंपनी मालकाने कामगारांना किमान वेतनाचे मागणीपत्र मागे घ्या, नाहीतर १ ऑक्टोबरपासून कामावरून काढून टाकण्यात येईल असे सांगितले आहे. याविरुद्ध आता राष्ट्रीय समाज पक्ष रायगड जिल्हा शाखेमार्फत कोकण रासपचे नेते श्री. भगवान ढेबे यांनी कामगारांना न्याय द्यावा, मुजोर कंपनी व्यवस्थपनाला कामगार कायद्याची अंमलबजावणी करण्यास भाग पाडावे, अशा प्रकारचे निवेदन महाराष्ट्र कामगार राज्यमंत्री बच्चू कडू यांना दिले आहे.  श्री. कडू यांचे स्विय सहाय्यक श्री. मनोज निकम यांनी निवेदन स्वीकारले.

यावेळी कोकण प्रांत शाखेचे अध्यक्ष श्री. भगवान ढेबे, रायगड उत्तर जिल्हा शाखेचे अध्यक्ष श्री. संपतराव ढेबे,  रायगड महिला आघाडी जिल्हा शाखेच्या अध्यक्षा सौ. मनिषाताई ठाकूर, दिव्यांग आघाडीचे रायगड जिल्हाध्यक्ष श्री. आनंद ढवळे, पनवेल तालुका शाखेचे अध्यक्ष श्री. मुकेश भगत आदी.

No comments:

Post a Comment

स्वबळावर ताकदीने महानगरपालिका निवडणुक लढवण्यासाठी राष्ट्रीय समाज पक्षाची मोर्चेबांधणी

स्वबळावर ताकदीने महानगरपालिका निवडणुक लढवण्यासाठी राष्ट्रीय समाज पक्षाची मोर्चेबांधणी  मुंबई (७/१०/२५) : स्वबळावर ताकदीने महानगरपालिका निवडण...