Thursday, September 23, 2021

राष्ट्रीय समाज पक्षाच्या संघटनात्मक बांधणीसाठी कोकण दौरा करू : भगवान ढेबे यांची माहिती

राष्ट्रीय समाज पक्षाच्या संघटनात्मक बांधणीसाठी कोकण दौरा करू : भगवान ढेबे यांची माहिती

भगवान ढेबे, कोकण नेते रासप

पनवेल : 'कनेक्ट इंडिया स्वराज' रॅली अंतर्गत 'महात्मा गांधी' जयंतीनिम्मित कोकणात राष्ट्रीय समाज पक्षाची संघटनात्मक बांधणी करण्यासाठी, २ ऑक्टोबर पासून कोकण दौरा करणार असल्याची माहिती, कोकण प्रदेश राष्ट्रीय समाज पक्षाचे नेते भगवान ढेबे यांनी दिली.  पत्रकारांशी गप्पा मारताना पनवेल येथे श्री. ढेबे यांनी माहिती दिली. 

श्री. ढेबे पुढे म्हणाले, आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकात राष्ट्रीय समाज पक्ष स्वबळावर लढण्याची तयारी करत आहे.  गेल्या महिन्यात पेण, माणगाव, खेड येथे पक्षाच्या बैठका पार पडल्या. रायगड जिल्ह्यात कर्जत, अलिबाग, रोहा, पोलादपूर येथे पक्षाच्या बैठकांचे नियोजन केले आहे. रत्नागिरी जिल्ह्यात गुहागर, तर सिंधुदुर्ग जिल्ह्यात वेंगुर्ला येथे पक्षाच्या संघटनात्मक बैठकांचे नियोजन चालू आहे.

यावेळी कोकण प्रदेश प्रभारी अण्णासाहेब रूपनवर सर, मावळ लोकसभा नेते श्रीकांत(दादा) भोईर, रायगड महिला आघाडी जिल्हाध्यक्षा मनीषाताई ठाकूर, रायगड जिल्हा संपर्क प्रमुख संतोष ढवळे, रासपचे ज्येष्ठ नेते मनोज(काका) दुंदरेकर, पनवेल तालुका अध्यक्ष मुकेश भगत आदी उपस्थित होते.

No comments:

Post a Comment

विश्वाचा यशवंत नायक माहे : जून 2025

विश्वाचा यशवंत नायक माहे : जून 2025