'२०२२'च्या गुजरात विधानसभा निवडणुकीसाठी राष्ट्रीय समाज पक्षाची जोरदार मोर्चेबांधणी : के. प्रसन्नाकुमार
|
पक्ष पदाधिकारी/कार्यकर्ता आढावा बैठकित बोलताना के.प्रसन्ना कुमार व अन्य |
राष्ट्रीय समाज पक्षाच्या वडोदरा, सुरत बैठका, आज सिलवासा येथे बैठकीचे आयोजन
|
सुरत येथे बैठकीत के. प्रसन्नाकुमार, ऋषिराज शास्त्री, सुशील शर्मा महेंद्र राठोड व अन्य. |
मुंबई : यशवंत नायक ब्यूरो
'२०२२'च्या गुजरात विधानसभा निवडणुकीसाठी राष्ट्रीय समाज पक्षाची मोर्चबांधणी सुरू केली असल्याची माहिती, राष्ट्रीय समाज पक्षाचे राष्ट्रीय महासचिव के. प्रसन्नाकुमार यांनी 'यशवंत नायक ब्युरो'शी बोलताना दिली. श्री. के. प्रसन्नाकुमार गुजरात राज्याच्या दौऱ्यावर आहेत. त्यावेळी ते भ्रमणध्वनीद्वारे यशवंत नायक ब्यूरो शी बोलत होते.
|
वडोदरा येथे के. प्रसन्नाकुमार व वडोदरा येथील रासप पदाधिकारी/कार्यकर्ते. |
श्री. के प्रसन्नाकुमार पुढे म्हणाले, डिसेंबर २०२२मध्ये होणाऱ्या गुजरात विधानसभा निवडणुकीची तयारी करत आहोत. गुजरात राज्याची जुनी कार्यकारणी संपुष्टात आली आहे. पक्ष वाढीसाठी उत्कृष्ट काम करणाऱ्या लोकांना नवीन कार्यकारणीत संधी देऊ. विधानसभा निवडणुका डोळ्यासमोर ठेऊन पक्ष कार्यकर्त्यांना कामाला लागण्याचे आदेश दिले आहेत. दि. २६ सप्टेंबर रोजी वडोदरा येथे रासप पदाधिकारी/कार्यकर्ता आढावा बैठक झाली तर दि. २७ सप्टेंबर रोजी सुरत येथे कार्यकर्ता/ पदाधिकारी आढावा बैठक झाली. गुजरात राज्याचा आढावा घेऊन आज २९ सप्टेंबर रोजी दादरा नगर हवेली या केंद्र शासित प्रदेशाकडे रवाना होत असल्याचे श्री. प्रसन्ना कुमार यांनी कळवले आहे. सायंकाळी सिलवासा येथे पक्ष कार्यकर्त्यांची बैठक आयोजित केली आहे.
No comments:
Post a Comment