राष्ट्रनायक माजी मंत्री महादेव जानकर यांना मातृशोक
कणखर माणदेशी माता गुणाताई जानकर काळाच्या पडद्याआड
राष्ट्रीय समाज पक्षाचे संस्थापक अध्यक्ष माजी मंत्री महादेव जानकर साहेब यांच्या मातोश्री गुणाताई जगन्नाथ जानकर (९८) यांचे आज पळसावडे ता-माण, जि-सातारा येथे वृद्धापकाळाने निधन झाले आहे. त्यांच्या स्मृतीस समस्त पुकळे परिवाराकडून भावपूर्ण श्रध्दांजली.
श्री. दादा जानकर, सतिष जानकर, रत्नाबाई वीरकर, महादेव जानकर ही त्यांची मुले आहेत. सतिश जानकर यांना वकिलीचे शिक्षण दिले तर महादेव जानकर यांना अभियांत्रिकीचे शिक्षण दिले. या दोन बंधूनी अखंड अविवाहित राहण्याचे ठरवून यशवंत सेनेच्या माध्यमातून महाराष्ट्र राज्यात प्रस्थापित व्यवस्थेविरुद्ध जोरदार रान उठवले. २० वर्षाच्या संघर्षानंतर महादेव जानकर यांनी महाराष्ट्र राज्याच्या मंत्री मंडळात कॅबिनेट मंत्रिपदाची शपथ घेतली, त्यावेळी लाल दिव्याच्या गाडीत न बसता जमिनीवर बसणारी माता म्हणजे गुणाताई जानकर. "चांगल काम कर नाहीतर मारीन", अशी आपल्या पुत्रास आज्ञा देणारी कणखर माणदेशी माता गुणाताई जानकर यांनी आज जगाचा निरोप घेतला. त्यांच्या स्मृतीस भावपूर्ण श्रद्धांजली!
भाजपचे महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष चंद्रकांतदादा पाटील, रासपचे राष्ट्रीय अध्यक्ष एस एल अक्कीसागर, महासचिव कुमार सुशील, के. प्रसन्नकुमार, रासपचे महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष आ. रत्नाकर गुट्टे, खा. सुप्रिया सुळे यांनी शोक संदेश जारी करत श्रद्धांजली वाहिली आहे.
💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐
शोकाकूल : आबासो पुकळे, मुंबई.
No comments:
Post a Comment