Tuesday, March 30, 2021

महाराष्ट्रात शरद पवारांचे बोट पकडून बाळासाहेब ठाकरेंच्या मुलाचे राजकारण : एस एल. अक्कीसागर

महाराष्ट्रात शरद पवारांचे बोट पकडून बाळासाहेब ठाकरेंच्या मुलाचे  राजकारण : एस एल. अक्कीसागर

मुबंईशरद पवार चाणक्य वैगेरे काही नाही. ते महाराष्ट्रातील प्रत्येक गावातील नागरिकाला नावानिशी ओळखतात, हे पूर्णपणे खोटे आहे. राजकारणात कोणी कोणाचा शत्रू नसतो. "स्व. बाळासाहेब ठाकरे यांनी शरद पवारांना विरोध केला, आता त्यांचाच मुलगा शरद पवारांचे बोट पकडुन महाराष्ट्रात राजकारण करत आहे", अशा शब्दात  शहा- पवार भेटीवर रासपचे राष्ट्रीय अध्यक्ष एस एल अक्कीसागर यांनी प्रतिक्रिया दिली.

राष्ट्रीय समाज पक्षाचे संस्थापक राष्ट्रीय अध्यक्ष महादेव जानकर यांचे नेतृत्व राष्ट्रीय समाजातून खोडून काढण्यासाठी अनेक शक्ती कार्यरत आहेत, असा सनसनाटी आरोपही श्री.अक्कीसागर यांनी केला. काल मुंबईत यशवंत नायकच्या खास प्रतिनिधींशी श्री. अक्कीसागर यांनी मनमोकळेपणाने विविध विषयांवर भाष्य केले.

पादरा नगरपालिका विजय हा रासपचा राजकीय विजय

गुजरात राज्यात वडोदरा महानगरपालिकेत राष्ट्रीय समाज पक्षाने भाजप, कॉग्रेसच्या मानाने लक्षणीय मते मिळवली. पादरा नगर पालिका निवडणुकीत भाजप समोर रासपने प्रमुख राजकीय विरोधी पक्षाचे स्थान प्राप्त केले. कॉग्रेसला खातेही उघडता आले नाही. पादरा पालिकेतील विजय हा रासपचा राजकीय विजय आहे. पुढील ५ वर्ष प्रमुख विरोधी पक्ष म्हणून रासप कार्यरत राहील.

बेळगाव लोकसभा पोटनिवडणूक रासप लढणार

बेळगाव लोकसभा पोटनिवडणूक रासप लढवणार आहे, तीन उमेदवार इच्छुक असून, तिथे कर्नाटक राज्य संयोजक धर्मन्ना तोंटापूर मुलाखत घेऊन उमेदवार लवकरच निश्चित करतील. शिंधगी विधानसभा पोटनिवडणुकीसाठी चाचपणी सुरु आहे. दरम्यान रासप संस्थापक अध्यक्ष महादेव जानकर कर्नाटक राज्याच्या दौऱ्यावर आहेत.

तमिळनाडू  विधानसभा निवडणुकीत रासपचे २ उमेदवार

सार्वत्रिक तमिळनाडू विधानसभा निवडणुकीसाठी रासपने दोन उच्चशिक्षित उमेदवार मैदानात उतरवले आहेत. दिंडीगुल जिल्ह्यातील वेदसांडुर आणि  तिरिचरापल्ली जिल्ह्यतील मुसीरी मतदार क्षेत्रात रासपचे उमेदवार निवडणूक लढवत आहेत.

2 comments:

चागंले संस्कार टिकविण्यासाठी वाचन संस्कृतीची गरज : डॉ. शंकर स्वामी वडेपुरीकर

चागंले संस्कार टिकविण्यासाठी वाचन संस्कृतीची गरज : डॉ. शंकर स्वामी वडेपुरीकर ‌पु.अहिल्यादेवी वाचनालयात " वाचन संकल्प महाराष्ट्राचा...