जोतिरादित्य सिंधियाची अशोभनीय भाषा; आम्ही त्याचा निषेध करतो : ज्ञानेश्वर सलगर
मुंबई : मध्य प्रदेशात गुना जिल्ह्यात लोकमाता महारानी अहिल्यादेवी होळकर यांच्या नावाने असणाऱ्या रस्त्याचे व चौकाचे नाव बदलून भाजपचे राज्यसभा खासदार जोतिरादित्य सिंधियाने अशोभनीय भाषा वापरली आहे, त्याचा धनगर समाज बांधव, राष्ट्रीय समाज पक्ष निषेध करणार, असल्याची प्रतिक्रिया रासपचे नेते ज्ञानेश्वर(माउली) सलगर यांनी दिली आहे.
यात कुणीही राजकारण करायची गरज नाही, सिंधियानां सत्तेचा माज असून, त्यांनी वापरलेल्या अर्वाच्च भाषेचा आम्ही लवकरच समाचार घेऊ. भारताच्या आदर्श महिला राज्यकर्त्या म्हणून ओळखल्या जाणाऱ्या महारानी अहिल्यादेवीं होळकर यांचे रस्त्याला दिलेले नाव बदलायची गरज नव्हती. त्यांनी सिसोदियांचे नाव गुना शहरातच दुसऱ्या रस्त्याला द्यायचे होते. कोणत्याही राष्ट्रीय महापुरुषांचा अपमान सहन केला जाणार नाही, रासप त्याच भाषेत ऊत्तर देईल, असा इशारा सलगर यांनी दिला आहे.
No comments:
Post a Comment