पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांचा अवमान केल्याप्रकरणी सकल धनगर समाज आक्रमक; भाजपने सिंधियाची हकालपट्टी करावी
तर भाजपचे खासदार सिंधियांना महाराष्ट्रात पाय ठेवू देणार नाय : किरण गोफणे यांनी दिला इशारा
मुंबई : आबासो पुकळे
मध्य प्रदेशातील गुना या ठिकाणी नगरपालिकेने देवी लोकमाता अहिल्याबाई होळकर चौक व रस्त्याचे नाव बदलून सागरसिंह सिसोदिया असे केले आहे. त्यामुळे सकल धनगर समाज आक्रमक झाला असून इंदापूर (जि-पुणे) येथे सदरील घटनेचा निषेध व्यक्त करून इंदापूरचे तहसीलदार अनिल ठोंबरे यांना याबाबतचे निवेदन सकल धनगर समाजच्यावतीने देण्यात आले आहे.बेजबाबदार वर्तन करणाऱ्या जोतिरादित्य सिंधिया यांची भाजपने हकालपट्टी करावी, जोतिरादित्य सिंधियांनी धनगर समाजाची माफी मागावी, तसे न झाल्यास सिंधिया फिरत फिरत जर महाराष्ट्रात आले, तर त्यांना येथे पाय ठेवू देणार नसल्याचा गंभीर इशारा, रासपचे नेते किरण गोफने यांनी सकल धनगर समाजाच्यावतीने दिला आहे.सकल धनगर समाजच्यावतीने इंदापूर तहसीलदार यांना निवेदन देण्यात आले. |
यावेळी राष्ट्रीय समाज पक्षाचे नेते किरण गोफणे यांनी सांगितले की, कोणताही मंत्री असला किंवा कोणत्याही राजकीय पक्षाचा नेता असू द्या, तो कधीही महापुरुषापेक्षा मोठा नसतो. महापुरुषांचा अवमान करणाऱ्या नेत्यांचा माज आम्ही उतरवल्याशिवाय राहणार नाही. त्याठिकाणी पुन्हा एकदा सन्मानाने देवी लोकमाता अहिल्यादेवी होळकर रस्ता व चौकाचे नावाचा फलक लावण्यात यावा, अशी मागणी सकल धनगर समाजाच्यावतीने करत आहोत.
यावेळी रासपचे पुणे जिल्हा प्रभारी किरण गोफणे, रासपचे तालुकाध्यक्ष सतीश शिंगाडे, प्रकाश पवार, अविनाश मोहिते, तानाजी मारकड, अविनाश भाळे, गणेश घोडके, अक्षय मारकड यांच्यासह अन्य समाजबांधव उपस्थित होते.
No comments:
Post a Comment